Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

तुम्हांला झोपेत बडबडण्याची सवय आहे ? मग हे नक्कीच वाचा

घरात लहान मुले झोपेत बडबडतात ही गोष्ट लहान मुले असलेल्या प्रत्येकाने नक्कीच अनुभवली असले. काही वेळा मोठी माणसेही झोपेत बडबड करताना अगदी कोणाला तरी प्रश्नांची उत्तरे दिल्यासारखी बडबडतात असा अनुभव आलेला असेल. मुख्य म्हणजे आपण झोपेत बडबडत होते ते मात्र त्यांना मुळीच आठवत नसते. सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला झोपेत बडबडण्याची सवयच आहे असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र झोपेत बडबडणे हे आजाराचे लक्षणही असू शकते. झोपेत बडबडण्याच्या या शारिरीक अवस्थेला किंवा डिसऑर्डरला सोम्निलोक्वाय असे म्हणतात. सर्वसाधारणपणे लहान मुले आणि पुरुषांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात असते.

भीतीदायक आणि मजेशीर 

झोपेत बडबडण्याच्या सवयीमध्ये अगदी गप्पा मारणे, प्रश्नांना उत्तरे देणे, एकपात्री संवादासारखे संवाद म्हटले जातात. काही वेळा ही सवय इतरांसाठी मजेशीर तर काहीवेळा भीतीदायकही असते. झोपेशी संबधित ही समस्या आहे आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला ती असते तिला याची खबरही नसते. काही वेळा समस्याग्रस्त व्यक्ती सर्वसाधारणपणे जागेपणी ज्या पद्धतीने, ज्या भाषेत बोलतो त्यापेक्षा झोपेतील भाषा, पद्धत ही खूप वेगळी असू शकते. तसेच व्यक्ती जे बोलते ते अर्थवाही असेलच असेही नाही काही वेळा ते अगदी निरर्थकही असू शकते. या सवयीने नुकसान होत नाही पण काही वेळा शरमल्यासारखे होते. मोठ्या माणसांमध्ये काही वेळा जोडीदाराची नाराजी सहन करावी लागू शकते. तर समूहात असाल तर इतरांना भीतीही वाटू शकते शिवाय त्यांना झोप न येण्याची तक्रार जाणवू शकते.

 

कोण बोलते झोपेत-

अनेकांना झोपेत बोलण्याची सवय असते. बहुतेक मुलांमध्ये वयाच्या ३ ते १० वर्षांपर्यंत ही सवय आढळून येते. मुले बहुतांश वेळा रोज बडबडू शकतात. प्रौढांपैकी ५ टक्के लोकांना झोपेत बोलण्याची सवय असते. तेही क्वचित किंवा रोजच बडबडू शकतात. कदाचित ही अनुवांशिकता असू शकेल असे तज्ज्ञांचा अंदाज आहे मात्र त्याचे काही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

झोपेत बडबडण्याचे टप्पे-

१ आणि २ -

झोपेच्या या टप्प्यांमध्ये झोपलेली व्यक्ती गाढ झोपेत नसते त्यामुळे त्यांचे बोलणे सहजपणे कळू शकते. त्यामुळे या टप्प्यातील बडबड ही अर्थवाही असू शकते.

३ आणि ४-

या टप्प्यात व्यक्ती गाढ झोपेत असते. त्यामुळे त्या काय बोलतात हे समजायला कठीण असते. काही वेळा ती तक्रार किंवा नाराजी असू शकते किंवा काही वेळा चक्क गप्पाही मारलेल्या असू शकतात.

लक्षणे आणि विकाराचे गांभीर्य

झोपेत बडबड क़रणे हे झोपेच्या कोणत्याही टप्प्यात होऊ शकते. हलकी झोप असेल तर अर्थपूर्ण बडबड असते. गाढ झोप असेल तर मात्र ती अनेकदा निरर्थक असू शकते. किंवा यावेळी व्यक्ती चिडलेली असू शकते.

हलका त्रास-

महिन्यातून एखाद वेळा झोपेत बडबडणे

मध्यम-

आठवड्यातून एखाद वेळा बोलणे. त्यामुळे खोलीतल्या इतरांना फारसा त्रास होत नाही.

गंभीर

दररोज अगदी न चुकता झोपेत बडबडणे. इतके की खोलीतल्या इतरांच्या झोपा त्यामुळे मोडतील.

झोपेत बडबडण्याची कारणे

तणाव, नैराश्य, अपुरी झोप, दिवसा झोपणे, मद्यपान आणि आत्यंतिक ताप येणे ही प्राथमिक कारणे दिसून येतात. त्याशिवाय अनुवांशिक कारणेही यामागे असू शकता. काही वेळा भीतीदायक स्वप्न पडणे, झोपेत श्वसनक्रिया थांबणे आदी त्रासांमुळेही ही समस्या निर्माण होते. प्रौढांमध्ये झोपेत सातत्याने बडबड करणे ही गोष्ट काही मानसिक विकारांशीही निगडीत असू शकते.

उपचार आणि डॉक्टरी मदत

मुळात या आजारासाठी उपचारांची गरजच नाही. मात्र झोपेत बडबडण्याची समस्या खूप काळ सुरु राहिली तर मात्र डॉक्टरी सल्ला जरुर घ्यावा. कारण झोपेत बडबडण्याशी काही तणाव, नैराश्य किंवा इतर काही झोपेशी निगडीत समस्या असू शकतात त्याचे निदान होण्यास मदत होते. खूप गंभीर आजार नसला तरी काही वेळा डॉक्टरी उपचार घेणे इष्ट ठरते. कारण झोपेत बडबडणे हे एखाद्या आजाराचे पूर्वलक्षण ठरु शकते.

झोपेत बडबडणे यासाठी विशिष्ट काही औषध योजना नाही. मात्र निद्रा समस्याविषयक तज्ज्ञ या समस्येशी निगडीत उपाय सुचवण्यास जरुर मदत करतील. या सवयीमुळे खोलीतील इतर व्यक्तींना त्रास होत असल्यास काही गोष्टी कराव्या लागतील जसे वेगळ्या खोलीत झोपावे, जोडीदाराला कानात इअरप्लग घालून झोपण्यास सांगावे. झोपेतली बडबड ऐकू येऊ नये म्हणून व्हाईट नॉईज मशीन वापरावे.

जीवनशैलीतील बदल

झोपेत बडबडण्याची सवय कमी करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करुन पाहणे योग्य ठरते. जसे रात्री झोपताना खूप जड जेवण घेऊ नये. मद्यपान करणे टाळावे. नियमित झोपेचे वेळापत्रक ठरवावे. त्यामुळे मेंदूला सवय लागेल. तसेच तणावाचे प्रसंग किंवा विचार टाळावेत.

 झोपेत बडबडणे ही अगदीच निरुपद्रवी गोष्ट आहे. मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये आढळणारी सर्वसामान्य गोष्ट आहे. त्याला विशेष औषधोपचारांची गरज लागत नाही. अगदीच गंभीर स्थिती असल्यास औषधोपचार जरुर घ्यावे. कदाचित हा त्रास काही वर्षांसाठी गायब होऊन पुन्हा उद्भवू शकतो. पण हा काही दीर्घकालीन गंभीर आजार वगैरे निश्चितच नाही. पण त्याकडे दुर्लक्षही करता उपयोगी नाही.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon