Link copied!
Sign in / Sign up
76
Shares

झोपण्याअगोदर ह्यासाठी दूध प्यायला हवेच

खूप स्त्रियांना आणि आईंना दूध आवडत नसते. पण काही मातांना ते आवडत असते. पण दूध हे आवडत असेल किंवा नसेल तरीही प्यायला हवे. कारण दूध हे शाकाहारी आणि खूप काही पौष्टिक घटक त्यातून मिळत असतात. त्यामुळे तुमचे शरीर तर सशक्त होतेच पण होणाऱ्या किंवा झालेल्या बाळाला खूप लाभदायक आहे. ह्यातून तुम्हाला खूप सारे पौष्टिक घटक मिळतात. लहान बाळासाठी पूर्णान्न असलेले दूध. दुधात आयर्न, मॅग्नेशियम, मँगेनीज, तांबे, पोटॅशियम, सेलेनियम, झिंक, फॉस्फरस ही खनिजे उत्तम प्रमाणात उपलब्ध असतात. एक कप जरी दूध घेतले तरी तुम्हाला त्यातून १३० कॅलरीज मिळतात. 

शांत व गाढ झोप लागण्यासाठी कोमट दूध घेतलेले बरे. कोमट दूध प्यायल्याने खूप गाढ झोप लागत असते. पण ह्यासोबतच इतरही फायदे तुम्हाला मिळतात ते ह्या ब्लॉगमधून बघू. 

१) रात्री झोपताना दूध प्यायले तर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास रात्री झोपताना दूध पिणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. प्रक्रिया केलेले दूध पिणे जास्त चांगले.

 

३) कोमट दूध प्यायल्याने शरीरातील स्नायू शिथिल होण्यास मदत होते. स्नायू शिथिल झाले की शांत आणि चांगली झोप लागते. त्यामुळे झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे गाढ झोप लागण्यासाठी उपयुक्त असते. आणि  ऍसिडिटी वरती थंड दूध खूप लाभदायक ठरत असते.

४) दूधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित राहील्यास हृदयावर ताण येत नाही आणि हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवण्यापासून आपली सुटका होऊ शकते.

आणि जर तुम्हाला खोकला किंवा कफ किंवा सर्दीही असेल तर तुम्ही आयुर्वेदाप्रमाणे दूधामध्ये हळद टाकून दूध प्यायला हवेच. आले टाकून प्यायल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. विविध कारणांनी होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी हे उपयोगी ठरते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon