Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

झणझणीत कटाची आमटी

 


व्हिडीओ आणि प्रिव्हयु इमेज स्त्रोत -बिंग मराठी 

साहित्य 

१. पुरणाच्या पोळीसाठी डाळ शिजवल्यावर जे पाणी उरतं  ते पाणी किंवा  एक ते दीड वाटी पुरण,

२.  एक चमचा टेबलस्पून चिंचेचा कोळ

३. आवडीनुसार प्रमाणात काळा मसाला साधारण ३ चमचे, एक ते दीड  चमचे लाल तिखट तिखट, अर्धा चमचा हळद, कढीपत्त्याची पानं

 ४.  तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार , थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

(वाटण )मसाल्याचे साहित्य 

एक मोठा कांदा, एक मोठा चमचा सुकं खोबरं, ७-८ लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा  

हा मसाला करताना कांदा भाजा. गॅसवर भाजावा कढईत सुकं खोबरं कोरडं भाजा. थोड्याशा तेलावर आलं-लसूण आणि भाजलेल्या कांद्याच्या फोडी परतून घ्या. या वाटणाचा गोळा करा.

आमटीची कृती 

१. एका पातेल्यात तेलाची फोडणीचे साहित्य घालून खमंग फोडणी करा..(पातले स्टीलचे नसावे)

२. आता त्यात चिंचेचा कोळ, गूळ, काळा मसाला, तिखट, मसाल्याचा गोळा आमटी मसालेदार किती हवी या अंदाजनुसार घाला. आणि त्यात मीठ घालून २ वाट्या पाणी घाला.

३.  खळखळून उकळी आली की पुरण पाण्यात कालवून घाला. पुरण वापरणार असाल तर गूळ घालू नका.

४. कोथिंबीर आणि थोडे ओले खोबरे घालून परत चांगली उकळी येऊ द्या.

ही  आमटी  प्यायला तसेच भाताबरोबर खायला चांगली लागते. काही जण यात तळलेली कुरडई  घालून देखील खातात .  

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon