Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

तुमच्या योनीबद्दल असणाऱ्या काही शंका व त्याची उत्तरे


तुमच्या मनात योनीबाबत खूप प्रश्न येत असतात पण तुम्ही घरात, कुणालाही विचारायला घाबरतात. आणि आपल्याकडे अशा प्रश्नाविषयी जास्त बोलले जात नाही. तुम्ही मैत्रिणींशी ह्या विषयी बोलतात पण तिलाही ह्याबाबत ठाऊक नसल्याने खूप गोंधळ होतो. आणि काही मैत्रिणी ह्या काहीही अवाजवी सांगतात. तेव्हा ह्याविषयी काही शंकांचे निरसन व्हायला हवे. आणि ह्या गोष्टीविषयी कुठे बोलता येत नसल्याने मुलगीची खूपच अडचण होत असते.

१) तुमच्या डिस्चार्ज मधून दुर्गंधी का येते

पांढरा डिस्चार्ज होणे काही चिंता करण्याची गोष्ट नाहीये. काही प्रमाणात जर डिस्चार्ज जर निघत असेल तर ते नॉर्मल आहे. ते हार्मोनल बदलामुळे होत असते. पण ज्यावेळी डिस्चार्जमधून दुर्गंधी येते त्यावेळी काय करायचे ? तर ह्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला बॅक्टरीयल इन्फेक्शन झाले आहे. तेव्हा ह्यासाठी डॉक्टरांना भेटून घ्या कारण बॅक्टरीयल इन्फेक्शनचे नेमके काय कारण आहे. ते तुम्हाला माहिती होईल. ह्यात खूप घाबरण्यासारखे काही नाही.

२) तुम्हाला महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी का येते ?

 

सामान्यतः एका स्त्रीची पहिली आणि दुसरी मासिक पाळीत २५ ते ३५ दिवसाचे अंतर असते पण जर तुमची पाळी कमी वेळात होऊन जात असेल तर काहीतरी हार्मोनल प्रॉब्लेम (समस्या) असू शकते. किंवा ह्य्पोथयरॉइडिस्म सारखा आजार असू शकतो. तेव्हा ह्याविषयी एकदा डॉक्टरांना भेटून विचारून घ्या. त्याचे नेमके कारण माहिती पडेल.  

३) तुमच्या योनीला फार्ट( हवा निघणे) करण्यापासून कसे थांबवणार ?

ह्या प्रकारे फ्रटिंगमध्ये तुमच्या योनीत हवा थांबून राहते. तुम्ही जसे चालायला लागतात तशी हवा थोडी -थोडी हवा निघायला आणि खासकरून कोणत्या वेळी होते ज्यावेळी सर्व शांत असते आणि तेव्हाच तुमची योनीमधून हवा निघायला लागते. ह्यावर मुलींना व स्त्रियांना शरमेचे वाटते पण तसे काहीच वाटून घेऊ नका. आणि जर ह्यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर हवा निघण्यापासून वाचण्यासाठी टेम्पोने घालू शकता. आणि त्यातून हवा निघणार नाही आणि येणार नाही. आणि योनीतुन काही आवाज येत असेल तर तोही थांबून जाईल.

४) योनीवर असणारे दाण्यासारखे कण 

काही वेळा योनीमध्ये दाण्या - दाण्या सारखे दिसते तर ते इन्फेक्शन असते. आणि ते इन्फेक्शन जेव्हा तुम्ही योनीवरील केसांना काढत असतात त्यावेळी ते इन्फेक्शन होत असते. त्यामुळे ती केस काढण्यासाठी रेजरचा वापर करू नका. तर वैक्स चा वापर करा. ह्यामुळे योनीवर रैश व काही जखमही होणार नाही.

५) मासिक पाळी च्या अगोदर योनीत खाज का सुटते ?

हे मुखत्वे हार्मोनल बदलामुळे होत असते. मासिक पाळीच्या अगोदर काही हार्मोन वेगळ्या पद्धतीतीने काम सुरु करून देतो आणि त्यामुळे तुमची योनीची त्वचा पातळ होऊन जाते. आणि त्या कारणाने योनी कोरडी होऊन जाते. आणि म्हणून योनीत खाज सुटते. आणि खाज खूपच सुटत असेल तर इन्फेक्शन झाले असेल.

जर तुम्हाला अशा काही समस्यांमध्ये शंका असतील किंवा तुम्हाला बऱ्याच दिवसापासून काही त्रास होत असेल तर आमच्याशी नक्कीच शेअर करू शकतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon