Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

योनीची स्वच्छता आणि काळजी घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.

योनीची नियमित स्वच्छता राखणं आवश्यक आहे. कोणताही साबण न वापरता स्वच्छ पाण्याने योनीची स्वच्छता केलेली नेहमीच फायदेशीर राहते. अनेकवेळा साबण किंवा रसायनयुक्त क्रीम्स किंवा वॉश अश्या गोष्टींचा वापर केल्यामुळे योनीमार्गातील नैसर्गिक थराचे तसेच संप्रेरकांचं संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे या भागाची स्वच्छता करताना पुढील काळजी घेणे आवश्यक आहे. 

१. योनीच्या आजूबाजूचा भाग साबणाने धुतला तरी चालेल मात्र योनीच्या आतमध्ये तो जावू नये ही काळजी घ्यावी. योनीची स्वच्छता ठेवण्यासाठी शरीरात विविध संप्रेरक काम करत असतात. विविध स्त्राव योनीमार्गातून शरीर सोडत असतं. पाढंरा स्त्राव योनीमधून जात असतो तो सतत साफ केला पाहिजे.

२.  पाळीच्या काळात येणारं रक्त योनीच्या आसपास जास्त काळ राहिलं तर त्या रक्तांवर विविध किटाणू वाढू शकतात. त्यामुळं मासिक पाळीच्या काळात विशेष काळजी घेवून योनीची स्वच्छता राखली पाहिजे. 

३. महत्वाचं म्हणजे योनी आणि गुदद्वारामध्ये खूप कमी अंतर असल्यामुळे गुदद्वाराची स्वच्छता करताना ती योनीच्या विरुध्द दिशेने करावी.

 ४. या भागातील केस काढण्यासाठी हेअर रिमुव्हर क्रीम्सचा वापर करणे शक्यतो टाळावे, हा भाग फार नाजूक असतो. यामुळे इंन्फेक्शनचा धोका आहे. त्याऐवजी शेव किंवा वॅक्स करा. वॅक्स करताना देखील सहन होईल अश्या पद्धतीने वॅक्स करा. आणि स्वच्छतेची काळजी घ्या. 

५. योनीमार्गातून बऱ्याच वेळा दुर्गंध येतो, हा दुर्गंध दूर करण्यासाठी स्प्रेचा वापर करण्याऐवजी स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्या तसेच ब्लिचिंग चेहरा काळवंडला की आपण जसे ब्लिचिंग करतो तसेच 'त्या' भागावर काळवंडल्यासारखे वाटत असल्यास ब्लिचिंग करू नका. हे त्रासदायक ठरू शकते.

६. प्रसूती, वयोमान अश्या अनेक कारणांमुळे योनी सैल होती त्यासाठी टाईटनिंग क्रिम किंवा सर्जरी असे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु शक्यतो अशा प्रकारच्या सर्जरी करून योनीत  काही बदल करणे टाळावे. यामुळे इतर समस्या वाढण्याची शक्यता असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon