Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

योनीमार्गात ह्या गोष्टी का त्रासदायक ठरतात ?


योनीची स्वच्छता जर व्यवस्थित ठेवली नाहीतर योनीचा जंतुसंसर्ग होत असतो. आणि खूप वेळा योनीची स्वच्छता ठेवली तरी योनीचा त्रास होत असतो. आणि ह्या गोष्टीमुळे तुम्हाला बरेच अस्वस्थ व्हायला होते. तेव्हा त्या स्त्रीलाही आश्चर्य वाटते की, मी योनीची दररोज स्वच्छता करते तरीही, योनीचा जंतुसंसर्ग कसा होतो. तेव्हा त्याविषयीची काही इतर कारणही जाणून घ्या. हा प्रश्न एका मुलीने विचारला पण ही गोष्ट सर्वच स्त्रियांना लागू होते म्हणून जाणून घ्या. ह्यासंदर्भात.

१) योनीमार्गात खाज सुटणे, आग होणे, अंगावरून जास्त जाणे, अंगावरून जाणाऱ्या म्हणजेच योनीमार्गातून येणाऱ्या स्रावाचा रंग, वास बदलून जाणे, त्या स्रावाच प्रमाण वाढणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे अशा अनेक प्रकारे आपल्याला योनीमार्गात जंतुसंसर्ग झाल्याची जाणीव होते. महत्वाचा गैरसमज म्हणजे योनीमार्गातील जंतुसंसर्ग केवळ लैंगिक संबंधांमधून होतो ? त्याला कोणती कारणे आहेत ते बघू.

योनीत जंतुसंसर्ग ह्या गोष्टीमुळे होत असतो.

* तुमच्या शरीरात जर कुठेही जंतुसंसर्ग असल्यास त्याचा प्रभाव हा योनीच्या संसर्गावर पडतो.

* काहीवेळा आहार व्यवस्थित नसल्यास

* काही मुलींना / स्त्रियांना झोप कमी लागत असेल किंवा झोप होत नसेल

* जर तुम्ही जंतुप्रतिबंधक (antibiotics) औषधं घेत आहात

* खूप मानसिक ताण-तणावात तुम्ही असाल तर हे मुलींबाबत होत असते.

* एकदम लैंगिक संबंधांचं प्रमाण वाढल्यास

* रक्तपांढरी

* मासिक पाळीच्या वेळी कापड वापरले आणि ते अस्वच्छ असेल तर

योनीचा जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून

* मासिक पाळीच्या वेळेस खूप धुतलेले आणि स्वच्छ कापड वापरा.

* पॅड वापरत असल्यास ते दर 3-4 तासांनी बदला. आणि उत्तम कंपनीचे वापरा.

* शौचाची जागा धुताना शौचाचे कण योनीमार्गात जाणार नाहीत याची काळजी घ्या. आधी लघवीची जागा धुवा त्यानंतर शौचाची जागा व्यवस्थित धुवून घ्या.

* तुमचे ड्रेस व साडी रोजच्या रोज धुऊन वापरा.

तुमच्या काही शंका असतील आमच्याशी निसंकोचपणे बोला. व लिहा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon