Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

या उपायांद्वारे बाळाला येणारे यीस्ट डायपर रॅश बरे करा.

    आजकालची जीवनशैली बघता लहान मुल घरात असताना डायपर शिवाय बाळाला सांभाळणं म्हणजे आजच्या आईसाठी दुःस्वप्नच. परंतु तुम्ही कितीही चांगल्या प्रतीचे डायपर वापरा पण बाळाला शीच्या जागी त्याचा नाजुकश्या नितंबावर लालसरपणा आणि पुरळ ही येतेच. या लालसरपणामुळे आणि पुरळ आल्यामुळे बाळ अस्वस्थ होतं आणि त्याची सतत चीड-चीड होते. या रॅशेस पैकी यीस्ट रॅशेस हे फार त्रासदायक असतात जे कॅन्डीडा या बुरशीच्या प्रजतीमुळे येतात. ज्यामुळे बाळ अस्वस्थ होते.

यीस्ट रॅशेसची कारण 

१. घरगुती कापडी/विकतचे डायपर स्वच्छ नसणे.

२. अस्वच्छ लंगोट/डायपर लवकर न बदलणे.

३.बाळचे पोट बिघडले असेल किंवा अतिसार झाला असेल तर

४. मूत्रातील अमोनियाचे अधिक प्रमाण

५. डायपरमुळे बाळाच्या नितंबाला (bum) वारा न लागणे

त्यांना कसे बरं कराल ?

खूप लालसर असणारे किंवा उभार असलेले आणि पु असलेले फोड जर तुम्हांला बाळाच्या नितंबाला दिसले आणि जर तुम्ही बाळाची शी-शू झाल्यावर पुसून काढताना जर बाळला रडत असेल तर हे बरं करण्याकरता पुढील गोष्टी करा

१. स्वच्छता

 बाळाला यीस्ट आणि इतर कोणत्याही प्रकारचे रॅशेस होऊ नये याकरता सर्वप्रथम बाळाचे डायपर,लंगोट स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आपण जर कापड डायपर वापरत असल्यास, ते खराब झाल्यावर बाळाची ती जागा हळुवारपणे धुवा आणि आणि ती जागा कोरडी करा आणि बाळाला स्वच्छ करताना साफ करताना प्रत्येक वेळी स्वच्छ कपड्यांचा वापर करा.

२. बाळाला काही वेळ लंगोट/डायपर शिवाय ठेवा

तुमच्या बाळाला तुम्ही आसपास असताना आणि घरी असताना लाँगट किंवा डायपर शिवाय एका स्वच्छ दुपट्यावर काही काळ ठेवा. त्यांना थोडा वेळ चड्डी शिवाय ठेवा. किंवा घरात असताना सुती मऊसर कपड्याची चड्डी किंवा लंगोट घाला.

३.जास्त द्रव शोषणारे डायपर

ज्या डायपरची शोषण्याची क्षमता जास्त असले अश्या प्रकारचे डायपरचा वापर करा. यामुळे तुमचं लहानगे आनंदी राहतील आणि त्यांना रॅशेस देखील येणार नाहीत

४. रॅश क्रीम्स

बाळाला रॅशेस येऊ नये म्हणून बाळाला डायपर घालण्याआधी काही क्रीम्स औषधें मिळतात ते लावा. तसेच ज्यावेळी बाळालाबिना चड्डीचे ठेवलं त्यावेळी त्वचा कोरडी राहावी व इन्फेक्शन होऊ नये याकरता काही पावडर मिळतात त्या लावाव्यात.

५. वॉटर वाईप्सचा वापर करा.

या प्रकारचे वाईप्स हे बहुतांशी नैसर्गिक घटकांनी बनलेले असतात.जे त्वचेसाठी चांगले असतात. ते त्वचेची स्वच्छता करतात आणि संसर्ग होण्यापासून वाचवत. आणि रॅशेस आले असतील तर ते यीस्ट आणि इतर प्रकारचे रॅशेस बार करण्यास मदत करतात.

६.खोबरेल तेल

अनेक माता लहान मुलांना रॅशेस आल्यावर हा उपाय वापरतात. हे अनेक पिढ्यां-पिढ्या चालत आलेला सोप्पा उपाय आहे. खोबरेल तेलाच्या वापराने बाळाची त्वचा मऊ होते , आणि रॅशेस आलेल्या ठिकाणी बाळाला आराम पडतो. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon