Link copied!
Sign in / Sign up
152
Shares

यशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.

बाळ झाल्यावर दिवसाचे २४ तास देखील कमी पडत असतात अश्यावेळी आईला मातृत्व पेलताना नाना गोष्टींना सामोरे जावे लागते. पण असे असताना देखील काही सवयी लावून घेतले तर तुमचे मातृत्व नक्की यशस्वी होईल

१. वेळेचे नियोजन

तुम्ही तुमच्या वेळचे आणि दिवसाचे जर नियोजन योग्य प्रकारे केले तर तुम्हांला मुलांना सांभालणे सोप्पे झाले आणि त्यामुळे तुम्ही मुलांना सांभाळून इतर गोष्टीना वेळ देऊ शकता. तसेच जर तुमची प्रसूती नुकतीच झाली असेल तर तुम्हांला बाळाच्या स्तनपानाचे आणि झोपेचे वेळापत्रक समजण्यास थोडे दिवस लागतात पण एकदा हे वेळा पत्रक कळल्यावर मात्र तूम्हाला वेळचे नियोजन करणे सोप्पे जाते.

२. एकाच वेळी अनेक काम करण्याची क्षमता (मल्टिटास्किंग)

आजकाल बहुतांश महिलांमध्ये ही क्षमता असतेच या क्षमतेचा वापर तुम्ही मुल झाल्यावर तुम्ही झाल्यावर केल्यास तुम्हांला याचा खूप उपयोग होतो. परंतु असे असताना देखील कामाचा ताण वाढवून घेऊ नका.

२. वेळच्या-वेळी स्वच्छता करा 

जर नुकतीच प्रसूती झाली असेल तर कामे करताना आणि स्वच्छता करताना मदत घ्या. परंतु बाळाच्या कपड्याची आणि बाळाच्या गोष्टींची आणि घरातील स्वच्छता करणे आवश्यक असते कारण लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असत त्यामुळे या स्वच्छता वेळच्या-वेळी करा. आणि वेळच्या वेळी स्वच्छता केल्यामुळे कामाचा डोंगर साचत नाही.

४. मदत मागा, घ्या

मुल झाल्यावर कामाचा ताण वाढतो तसेच अश्यावेळी तुम्हांला देखील आरामाची आवश्यकता असते अश्यावेळी तुम्ही मदत मागा. मदत मागण्यासाठी लाज वाटून घेऊ नका घरातली माणसे देखील तुम्ही मदत मागतील तर नाही म्हणणार नाही. मदत मागून तर बघा. जर मुल थोडं मोठं झाला असेल तर तुम्ही त्याला घरातल्या मोठ्या व्यक्तीकडे सोपवू शकता.

५.प्राधान्य ठरावा

बाळ झाल्यावर कोणत्या गोष्टी आधी करण्याची आवश्यकता आहे, कोणत्या गोष्टी लगेच करणे आवश्यक आहे हे निश्चित करा एखादा कोणतं काम उद्या केले तर चालेल कोणते काम अत्यावशक आहे याची यादी करून ठरून ती कामे करा अनावश्यक कामे उरकायची म्हणून भरपूर ताण घेऊन कामे करू नका.

६. स्वतःसाठी वेळ काढा.

तुम्ही म्हणाल मुल झाल्यावर आईला २४ तास कमी पडत असतात,यात स्वतःसाठी वेळ कसा काढणार. सुरवातीचे काही दिवस बाळ सतत झोपत असते अश्यावेळी बाळ झोपल्यावर इतर काम आटपल्यावर थोडावेळ शकता. किंवा घरात वरिष्ठ व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला बाळाकडे लक्ष दयायला सांगून तुम्ही आरामात अंघोळ करा, हवं असेल तर एखादं आवडीचे गोष्ट करा पुस्तक वाचा, गाणी ऐका पण स्वतःसाठी वेळ काढा त्यामुळे तुम्हांला बाळाला सांभाळण्यासाठी ऊर्जा निर्माण होते 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon