Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

यापैकी तुमचे पती कोणत्या प्रकारचे बाबा आहेत.

तुमचा पती हे खूप संवेदनशील आहे, खूप काळजी घेणारा आहे.आणि त्याला माहिती आहे तुमच्या चेहऱ्यावर आनंद कसा आणायचा. पण ज्यावेळी तुमचे पती बाबा होतात त्यावेळी तुमच्या प्रमाणे त्यांचा आयुष्यात देखील बदल होतात. त इतर वेळचे आणि बाबा म्हणून वेगळे असतात.तर अश्या काही प्रकारचे बाबा आपण पाहणार आहोत यापैकी तुमचे पती कोणत्या प्रकारचे बाबा आहेत.

१. हेलिकॉप्टर बाबा

या प्रकारतील बाबा हे फार काळजी करणारे.आणि हेलिकॉप्टरच्या पंखासारखे मुलाचा आसपास फिरत असतात. बाळाला काय हवं नको याच्यावर त्याचे बारीक लक्ष असते.

२. सारखे काम करणारे बाबा

एकदा का लहान बाळ आलेकी या प्रकारातील बाबा खूप तणावाखाली येतात. आपल्या बाळाच्या सगळ्या गरजा पुरण्यासाठी आणि त्याला सगळ्या उत्तम गोष्टी देण्यासाठी ते खूप काम करतात, त्यामुळे ते बाळाला कमी वेळ देतात. इच्छा असून त्यांना बाळाला वेळ दयायला जमत नाही.

३. लाड करणारे बाबा

याप्रकारतील बाबा आपल्या मुलाचे खूप लाड करतात, आई रंगवते पण बाबा आपल्या मुलाचे गुपचूप लाड करत असतात.

४. धडपडे बाबा

या प्रकारातील बाबांना आपल्या मुलांसाठी सगळं काही आणि खूप काही करायचं असतं आणि ते तसा कसोशीने प्रयन्त देखील करतात पण ते करायला एक जातात आणि होतं काहीतरी वेगळंच त्यामुळे हे बाबा काहीतरी करायला जातात आणि धडपडतात

५. खेळप्रेमी बाबा


हे बाबा स्वतः खेळप्रेमी असतात आणि आपल्या मुलाला पण प्रत्येक खेळात सहभागी करून घेतात किंवा त्यांच्याबरोबर खेळतात आणि मुलांना खेळायला प्रवृत्त करतात

६. अति संवेदनशील बाबा

या प्रकारचे बाबा खूप संवेदनशील असतात आपल्या मुलांला थोडं काही लागलं-खुपलं तर ते लगेच अस्वस्थ होतात. आपल्या बाळाला इंजेक्शन देताना रडताना बघून त्यांचं डोळ्यात देखील पाणी येते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon