Link copied!
Sign in / Sign up
58
Shares

यापैकी तुमचे बाळ कोणत्या प्रकारचे आहे ?

प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, तशी बाळं देखील. काही लहानपणा पासून धडपडी,काही जिद्दी किंवा काही वेंधळी तर काही कायम शांत असतात. तर काही मूडी असतात. या छोट्याश्या पिल्लांचे काही वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. यापैकी तुमचं बाळ कोणत्या प्रकारात येत जाणून घ्या.

१. मांजरी सारखी बाळं 

जसा मांजराच्या पावलाचा आवाज येत नाही ते कधी येत कधी जातं कळत नाही तशी अगदी शांत कधीतरीच गडबड करणारी उगाच रडून गोंधळ नाही कीं जोर- जोरात आवाज नाही आपल्या सगळ्या गोष्टी कसं निमूटपणे आणि शांतपणे पार पाडणारी. ही अशी बाळं सांभाळायला तशी सोप्पी असतात. त्यांना सांभाळण्याचा काही त्रास नसतो. यांचे आई-वडील एकदम आरामात असतात

२.आव्हान स्वीकारणारी

जर, तुम्ही आव्हान स्वीकारणारे आणि साहसी असाल तर तुम्हांला आपलं मुल देखील असंच असावे असं वाटत असेल तर या प्रकारातलं तुमचं बाळ असावं अशी तुम्ही अपेक्षा करू शकता अन्यथा या प्रकारातील बाळे सांभाळणं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर पहारा ठेवण्यासारखे आहे. कारण ही आव्हान स्वीकारणारी खुप ऊर्जा घेऊन आलेली असतात. हे उघड -ते उघड याच्यावर चढ-त्याच्यावर-चढ, हे तोंडात घाल ते तोंडात घाल. स्वतःच्या वजनापेक्षा एखादी पिशवीच उचलायचं प्रयत्न कर, तुम्ही नाही म्हणाल ती गोष्ट ते नक्कीच करतील. पिठाचा डब्बाच उघडून ठेव असे प्रकार यांना करायला आवडतात. स्वतःच्या शक्ती पलीकडची उदयोग करणे यांना खुप आवडते.

३. नाजूक, शांतता प्रिय बाळं.

या प्रकारातील बाळे खूप नाजूक असतात. एखादं मखमली पीस सुद्धा त्यांना स्पर्श करताना विचार करतं. त्यांना जास्त कोणी कडेवर घेतलेलं आवडत नाही की त्यांना कोणी जास्त आवाज केलेला आवडत नाही. ते फक्त ओळखीच्याच माणसांकडे जातात. त्यांना खोलीत एखाद्या खेळ्ण्याशी किंवा पंख्याकडे बघत एकट्यानेच खेळायला आवडतं.

४. वेंधळी आणि मजेशीर बाळं.

या प्रकारातील बाळं चालत-चालता धडपडतील, कशाला तरी घाबरतील, कशाचा तरी मागे-मागे फिरतील मांजराची शेपूट पकडतील, कशावर तरी चढतील आणि पडतील. स्वतःच पडतील आणि हसतील असे काही उद्योग करत असतात.

५. दंगा करणारी आणि चिडखोर

या प्रकारातील बाळं ही राग आणि दबंगगिरीचे भारी मिश्रण असतात. प्रत्येक बाळ हे थोडं चीड-चीड असतं पण ही बाळं काही आवडलं नाही की दंगा करतात,रडा-रड करतात आणि आपला राग व्यक्त करतात. त्यांना हवी असलेली वस्तू खेळणं मिळे पर्यंत गोंधळ घालतात. आणि कधी -कधी हवी ती वस्तू मिळाली तर त्यांचा दंगा हा चालूच असतो.

६. सतत मूड बदलणारी बाळं

या प्रकारातील बाळं ही वरील सगळ्या प्रकारांचा मिश्रण असतात. एक क्षण शांत असतात, तर दुसऱ्या थोडं काही बदललं कि लगेच रडायला लागतात. खेळता-खेळता मधेशी शांत बसतील कधी एकदम दंगा करतील तर कधी शांत-शांत राहतील. कधी खाताना खुप दंगा करतील तर कधी गुपचूप शांतपणे खातील. या बाळांचा सतत मूड बदल असतो.

बाळं ही वरील प्रकारची असली तरी ती खुप गोड  आणि आपल्या आई-वडलांना  प्रिया असतात.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon