Link copied!
Sign in / Sign up
88
Shares

यापैकी तुमचे पती कोणत्या प्रकारात येतात ?

प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वेगळा असतो.प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगवेगळे असते. प एका पुरुष ज्यावेळी पती बनतो. त्यावेळी त्याचे त्याची वागण्याची पद्धत आणि स्वभाव यावरून ते कोणत्या प्रकारात येतात हे ठरवत येतं. अश्याच काही जोडप्यांच्या निरीक्षणांवरून किंवा स्त्रियांशी मारलेल्या गप्पमधून पतींचे पुढील प्रकार ठरवण्यात आले आहे. यापैकी कोणत्या प्रकारात तुमचे पती येतात.

१. पतीपेक्षा बाळाच जास्त वाटणारे 

काही पुरुषांना मोठं व्हायचं नसते. आणि खासकरून लग्न झाल्यावर देखील. अगदी कपड्याचे सिलेक्शन करण्यापासून ते महत्वाचा निर्णय घेण्यापर्यंत सगळ्यांसाठी ते पत्नीवर अवलंबुन असतात. तर काही-काही पुरुषांना त्याचे पत्नीकडून लाड करून घ्यायला आवडते.कोणत्याही गोष्ट मागे लागल्याशिवाय पूर्ण करत नाहीत. असे पती पतीपेक्षा बाळच जास्त असतात.

२. आधी ऑफिस मग बायको

अशी तक्रर बहुतेक पत्नीची आपल्या पतीबाबत असते. याप्रकारातील पती हे आपल्या पत्नीपेक्षा आपल्या कमला जास्त महत्व देतात. मुद्दाम नाही पण काही कारणास्तव किंवा नाईलाजाने त्यांना आपल्या कमला प्राधान्य द्यावे लागते. या प्रकारातील पती कधी-कधी कामात एव्हढे बुडालेला असतात की, घरात अगदी पाहुण्यासारखेच असतात. सकाळी लवकर जाणे रात्री उशिरा परतणे. असे पतीची पत्नी नेहमी तक्रार करत असतात.

३. खेळवेडे

 ज्या प्रकारे बहुतांश स्त्रियांना शॉपिंग आवडते तसेच बहुतांश पुरुष हे खेळवेडे असतात. क्रिकेट, टेनिस फुट बॉल, किंवा हॉकी किंवा इतर काही खेळांसाठी इतके वेडे असतात. की खेळाचे सामने असले की हे काहीही कारण सांगून सुट्टी घेतील,शक्य नसेल तर ऑफिस मध्ये सामान बघण्याची सोय करतील,पण सामन्याचा एक क्षण हुकू देणारा नाहीत. आणि जर हे वेड पत्नीला देखील असेल तर या सारखे सुखी जोडपे नाही. तुमचे पती देखील असे खेळवेडे आहेत का?

४. पसारा करण्याचा छंद असणारे पती

अनेक पत्नीची आपल्या पती बाबत हि तक्रर असते. पतीला कोणतीच गोष्ट जागेवर ठेवली तर आवडत नाही. साधा अंग पुसलेला टॉवेल देखील ते जिथे उभे असतील तिथेच ठेवतात. एक दिवस स्वयंपाक घर जर त्यांच्या ताब्यात गेले तरमी त्या एक दिवसाची साफ-सफाई करण्यात तुमचा अख्ख्या आठवडा जातो. दारवेळी असं होणार नाही कबूल करतात पण दुसऱ्याच क्षणी ती गोष्ट विसरून देखील जातात. आणि पुनः ये रे माझ्या मागल्या.

५. लोकांची ऍलर्जी असणारे

काही पतींना सगळ्यात मिसळायला, विविध कार्यक्रमांना जायला फार आवडत नाही त्यांना त्याच्या निवडक लोकांबरोबरच मजा-मस्ती आणि वेळ घालवायला आवडते. आणि समजा पत्नीच्या दबाबाखाली येऊन ते जर इतर लोकांमध्ये गेले तरी किंवा एखादा कार्यक्रमाला गेले, तर ते खूप शांत-शांत असतात. किंवा आपल्यातच मग्न असतात. आणि अवघडल्यासारखे दिसतात

६. उत्तम स्वयंपाक येणारे

हा गुण असणारे पती हे पत्नीसाठी अभिमानाची गोष्ट असतात. हा गन असणारा पती मिळणे म्हणजे बहुतेक पत्नीसाठी मिळालेला बोनस असतो. भांडण किंवा मतभेदाचा शेवट पतीच्या एखाद्या मस्त डिशने होतो.

७. विनोदी

काही पती जन्मजात विनोदी असतात. नातेवाईकांच्यात मित्रमंडळीत ते फार लोकप्रिय असतात. हे लोक चार लोकं जमले की त्यांची आपल्या विनोदबुद्धीने करमणूक छान प्रकारे करतात.

८. परफेक्शनिस्ट

काही पतींना आपल्या कोणतंही गोष्टी इकडच्या तिकडे केलेल्या आवडत नाही, तसेच प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते.तसेच घराला कोणत्याही गोष्टीची जाग बदलली तर ते अस्वस्थ होतात.

९. स्वप्नातील राजकुमार

काही पती हे प्रत्येक मुलीला हवे तसे तिची प्रत्येक गोष्टी ना सांगत ओळखणारे. प्रत्येक बाबतील पत्नीला पाठींबा देणारे,प्रत्येक बाबतीत तिच्या पाठीशी कायम खंबीर उभे असणारे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon