Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

तुम्ही या १० पैकी कोणत्या प्रकारातील पत्नी आहात ?

 

 स्त्री हे निसर्गाने बनविलेले अद्भुत रसायन आहे. कधी ती प्रेमळ,महत्वाकांक्षी,बुद्धिमान,सुंदर ,परिसमान,उत्साही असते तर कधी रागावलेली,हेवा करणारी,हक्क गाजवणारी,सतत तुमच्यावर अवलंबून असणारी व्यक्ती असते. जेव्हा एक स्त्री बायको बनते ,तेव्हा तिच्यातील काही गुण विशेष ठळकपणे समोर येतात. तर मग आज आपण स्त्रीच्या स्वभाव आणि गुणांवर आधारित पत्नीचे वेगवेगळे १० प्रकार बघूया. 

१. कधीच पाठ न सोडणारी

या प्रकारची पत्नी म्हणजे अगदी चिपकू असते. आत्मविश्वासाचा अभाव आणि थोडीशी किंवा खूप जास्त अपरिपक्वता यामुळे त्या पतीवर अति अवलंबून असतात आणि कोणतेही काम पूर्ण करतांना अगदी छोट्या -छोट्या गोष्टीसाठी त्यांना पतीची मदत हवीच असते. या प्रकारच्या पत्नीचे आयुष्य फक्त घर आणि मुलांना वाढवणे याभोवतीच फिरत असते आणि त्यांना बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा फक्त घरातच राहायला आवडते. 

२. सतत वैतागलेली पत्नी

या प्रकारच्या पत्नी सतत वैतागलेल्या आणि तणावात असल्यासारख्या किंवा अतिशय गंभीर आजारी असल्यासारख्या वागतात. ''मला वैताग आलाय... '' हे त्यांचे आवडते वाक्य असते. जगातील प्रत्येक गोष्टीवर त्या वैतागू शकतात. काहीतरी वाईट होईल या भीतीत त्या जगात आणि नेहमीच बेचैनीत जगतात.

४. 'दंगल गर्ल' प्रकारची पत्नी

यांना 'बॉक्सिंग पत्नी' म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पतीच्या अगदी क्षुल्लक चुकांवर ही ह्या काली मातेचा अवतार धारण करू शकतात. बरेचदा यांचे वागणे आक्षेपार्ह असू शकते आणि ह्या कधी कधी हिंसक हि बनू शकतात.

५. चिडखोर पत्नी

लहान मुलांना जेव्हा स्वतःचे लाड करवून घ्यायचे असतात किंवा कडेवर यायचे असते किंवा कुणीतरी उचलून घ्यावे असे त्यांना वाटते तेव्हा ती चिडचिडी आणि तापट पणाने वागतात आणि चिडखोर पत्नी अशीच वागते. या अति भावनिक असतात आणि अगदी क्षुल्लक कारणांमुळे यांचे डोळे पाणावतात. यामुळे त्यांना कधी कधी सहानुभूती मिळू शकते पण यांच्या अश्रूंना घाबरून पती यांना काहीही बोलायचे टाळतात.

६. जागच्या न हलणाऱ्या

या प्रकारच्या पत्नी अतिशय आरामात रहाणाऱ्या,आळशी,संभ्रमित आणि अस्ताव्यस्त असतात. शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे कि आळशी पालकांची मुले आनंदी बनतात आणि काऊच पोटॅटो पत्नी असेही म्हणतात. पण हा गुण फक्त बायकांमध्ये नसतो तर हा गोष्ट पुरुषांमध्ये आढळतो.

७. थोडे नखरे आणि लाडिक स्वभावाची

या प्रकारच्या पत्नीला सर्व गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे घडायला हव्या असतात आणि यासाठी पतीची खुशामत करतील,विनंती करतील किंवा अगदी धमकी हि देतील.पण लाडीकपणे आपल्या गोष्टी मान्य करून घेतील

८. खंबीर व्यक्तिमत्व असणारी

या प्रकारच्या पत्नी खंबीर व्यक्तिमत्वाच्या आणि धाडसी निर्णय घेणाऱ्या असतात. कठीण काळात कोलमडून न जाता जबाबदारी वाटून घेतात आणि पतीच्या खांद्याला खांदा लावून जिद्दीने उभ्या राहून परिस्थितीशी दोन हात करतात

९. करियर वूमन

या प्रकारच्या पत्नी पूर्णपणे स्वतःच्या करियरला समर्पित असतात.स्वतःचे आर्थिक,भावनिक स्वातंत्र्य त्याना मनापासून आवडते आणि स्वतःची अशी नेमकी मते ही असतात. थोडक्यात सांगायचे तर,प्रत्येक दृष्टीने ती एक आधुनिक ' करियर वूमन' असते.

१०. सर्वांना हवं-हवंस व्यक्तिमत्व असणारी

वर सांगितलेल्या सर्व पत्नीच्या गुणांचे मिश्रण असलेली आणि सर्वाना प्रिया व्यक्ती, जी भावनिक असते आणि खंबीर,प्रेमळ पण अधिकार गाजवणारी तरी स्वतंत्र विचारांची अशी

तुम्ही वरच्या कोणत्याही प्रकारत येत असाल तरी लक्षात ठेवा. तुम्ही खूप सुंदर आणि एकमेव आहात तुमच्या सारखं दुसरं कोणीही नाही. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि आदर करा. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon