Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

व्यायामाचे तीन प्रकार ज्यामुळे कंबरेखालील (सेल्युलाईट)चरबी कमी होईल

वाढणारी चरबी ही अशी एक समस्या आहे जी जगभरातील लाखो स्त्रियांना भेडसावते.

सेल्युलाईट म्हणजे काय?

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सेल्युलाईट म्हणजे चरबी आहे ज्यामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि सुरकुतलेली दिसते. ही चरबी शक्यतो स्तन आणि मांडीच्या जवळ आढळते.

ही चरबी विविध कारणांमुळे तयार होऊ शकते जसे की :

संप्रेरकांचा अभाव

व्यायाम न करणे

अतिरिक्त चरबी साठणे

रक्ताभिसरण नीट न होणे

त्यामुळे, गर्भारपणात अशी चरबी जमा होणे हे अगदीच नैसर्गिक आहे. ज्या महिलांना गर्भवती होण्याअगोदर देखील ही समस्या आहे त्यांना गर्भवती असताना आपली परिस्थिती काही प्रमाणात अजून वाढली आहे असे वाटते, पण या वर नियंत्रण मिळवता येते. खरं तर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही गर्भारपणात अशी चरबी वाढण्यापासून रोखू शकता.

व्यायामाचे तीन प्रकार ज्यामुळे चरबी नाहीशी होईल :

या लेखात, आपण गर्भधारणे दरम्यान चरबीवाढण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशी पद्धत पाहणार आहोत ती म्हणजे योगासनांचा सराव करणे आणि घरात ठराविक व्यायाम करणे. ही चरबी कमी करण्याचे बरेच उपाय आहेत पण त्यातला व्यायाम हा सगळ्यात प्रभावी आहे आणि यामुळे तुम्ही या समस्ये पासून कायमची सुटका देखील करून घेऊ शकता. या व्यायामाचे खरे उद्दिष्ट हे तुमच्या स्नायूंमधून चरबी काढून टाकणे, तजेलदार त्वचा तयार करणे आणि चरबी जाळून स्नायू तयार करणे आहे.

१. सिंगल लेग हिप रेज (एकावेळी एक पाय वरती उचलून नितंब वर उचलणे)

(अ) जमिनीवर पाठ टेकवून झोप आणि मग आपला एक पाय गुडघ्यात वाकवा व दुसरा सरळ ठेवा.

(आ) पोटाचे स्नायू आत ओढून कसून घ्या.

(इ) मांडीच्या मागील स्नायू कडक करून नितंब वर उचला, खांद्याच्या रेषेत येई पर्यंत.

(ई) या स्तिथीत तीन सेकंद थांबा.

(उ) परत सुरवातीच्या स्थितीत या आणि असे किमान दहा वेळा करा. एका पायाचे झाले की तसे परत दुसऱ्या पायानी करा.

हा व्यायाम प्रकार करताना तुमच्या मांडीच्या मागील स्नायूंमध्ये ताण जाणवला पाहिजे ना की तुमच्या कंबरेत किंवा गुडघ्याच्या मागच्या स्नायूंमध्ये. जर का व्यायाम करणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर एक पाय गुडघ्यात वाकवून ठेवण्याऐवजी, दोन्ही पाय जमिनीवर सरळ ठेवा.

२. योग्य वजन उचलून स्क्वॅट्स (उठाबशा काढणे) मारणे

(अ) आपण सहज उचलू शकू एवढे वजन घ्या.

(आ) हे वजन हातात उचलून तुमच्या खांद्याच्या रेषेत सरळ धरा.

(इ) आता आपण उठाबशा काढतो तसे खाली जा आणि असा विचार करा की, तुम्ही खुर्चीवर बसत आहात.

हा व्यायाम प्रकार करताना, तुमचे गुडघे थोडे वाकवून एकाच स्थितीत असायला हवे, आणि याची काळजी घ्या की, तुमचे गुडघे तुमच्या पावलांच्या पुढे जाणार नाहीत. या प्रकारात तुमच्या गुडघ्यांच्या मागील स्नायूत ताण जाणवला पाहिजे.

३. स्टेप-अप (जिन्याची एक पायरी चढतो तसे)

(अ) आपण सहज उचलू शकू एवढे वजन घ्या.

(आ) हे वजन हातात उचलून तुमच्या कंबरेजवळ सरळ खाली धरा.

(इ) हे करताना तुमच्या समोर एखादा थोडा उंच पाट किंवा फळी घ्या.

(ई) एकावेळी एक पाय त्या पाटावर ठेवा.

(उ) आता जो पाय पाटावर ठेवला आहे त्याची टाच दाबा व स्वतःला वर उचलून तो पाय सरळ करा व दुसरा पाय हवेत तरंगत ठेवा.

(ऊ) नंतर परत आधी होतात त्या स्थितीत या, असे करताना जो पाय हवेत आहे तो खाली टेकवा.

(ए) दोन्ही पायानी असे किमान दहा वेळा तरी करा.

हा व्यायाम प्रकार करताना जर का काही अडचण येत असेल तर हातात वजन न घेता हे करा.

आपल्या कंबरेखाली साठलेली चरबी कमी करण्यासाठी या तीन व्यायामांशिवाय आपण प्लेट्स ब्रिज, योग, किक-बॉक्सिंग किंवा नृत्यावर आधारित कार्डियो वर्कआउट देखील करून बघू शकता. पोहणे, चालणे, सायकल चालविण्यासारख्या लहान क्रियांसह आपल्या कंबरेखाली चरबी कमी करण्यास मदत होते. या चरबीचा जर आपल्याला प्रचंड त्रास होत असेल तर तो प्रभावीपणे हाताळण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon