Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

या उपायांनी नैसर्गिकरित्या नखे वाढवा.

काही प्रमाणात वाढवलेली नखे ही सौंदर्यात भर घालतात. नखे हि केराटीन (Keratin) नावाच्या प्रोटीन ने बनलेली असता. नख दर महिन्याला १ इंचाच्या १० व्या भागाएवेढे वाढतात, कधी कधी नख वाढण्याचा वेग कमी होतो. आणि कमी झालेला वेग हा तुमच्या शरीरात आवश्यक घटकांची कमतरता दर्शवते. नखांची वाढ नैसर्गिकरित्या होण्याकरता पोषक आहारची आवश्यकता असते. परंतु याच बरोबर पुढील काही उपाय केल्यावर नैसर्गीकरित्या नखे वाढविण्याकरता पुढील उपाय करा. 

१. खोबरेल तेल

सगळ्यात सोप्पा उपाय नारळाच्या म्हणजेच खोबरेल तेलाने रात्री झोपायच्या आधी आपल्या हाताची व नखांची मालिश करा यामुळे आपली नखे वाढण्यास मदत होईल व नख चमकदार होतील.

२. ऑलिव्ह ऑईलचा वापर 

झोपण्या च्या आधी ऑलिव्हचे तेल गरम करून ५ मिनिटा साठी या तेलाने आपल्या नखांची मालिश करावी, १५ ते ३० मिनिटासाठी ऑलिव्हच्या तेलामध्ये नख बुडून ठेवा.

३. संत्र्याची साल किंवा रस

 संत्राची साले जर नखावर घासवी आणि नंतर गरम पाण्याने धुवून घ्यावी किंवा संत्र्याच्या रसामध्ये कमीत कमी १० मिनिटासाठी आपली नख बुडून ठेवा व नंतर गरम पाण्याने धुतल्यास देखील नखे वाढण्यास उपयोग होतो. 

४. लिंबाची फोड किंवा रस 

 संत्र्याप्रमाणेच लिंबाची फोड नखावर घास आणि नंतर गरम ऑलिव्ह ऑइल लावा. किंवा  लिंबाचा रस व ऑलिव्हचे  तेल गरम करा.त्यात लिंबाचं रस टाक कोमट झाल्यावर १० मिनिटासाठी त्यात आपली नखे बुडवून ठेवा.

५. बदामाचे तेल 

बदामाच्या तेलाने नखांना मसाज केल्यावर नखे वाढण्यास मदत होते 

 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon