Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

या ६ टिप्सने गर्भावस्थेत फक्त पोटाचा आकार वाढेल वजन नाही.

गर्भावस्थेत तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे वजन वाढणे साहजिक असते. हे वाढलेले वजन फक्त पोट आणि गर्भाचा आकार वाढल्यामुळे नसते तर इतर भागात चरबी साठून राहिल्यामुळे हि वाढते जे अनेकदा lलक्षात येत नाही आणि यामुळे तुमच्या पूर्ण शरीराचे एकूणच वजन भरपूर प्रमाणात वाढते. गर्भावस्थेत जेवढे वजन वाढणे गरजेचे असते त्यापेक्षा जास्त वाढलेले हे वजन प्रसूतीनंतर कमी करणे हे अवघड समस्या बनू शकते.या साठीच गर्भावस्थेत वाढणाऱ्या वजनावर लक्ष असू द्या. या अवस्थेत तुम्ही हवे ते काहीही खाऊ शकता आणि हवे तसे वागू शकता,हि एक भ्रामक कल्पना आहे.

तर या ६ टिप्स चा अवलंब करा आणि गर्भावस्थेत स्वतःच्या शरीराचे कमी आणि पोट आणि गर्भाचे वजन वाढू द्या!

१. ठराविक अंतराने थोडे थोडे खा.

       बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर खूप खाणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरते. याऐवजी ठराविक अंतराने ५-६ वेळा योग्य प्रमाणात खात राहा. या आहाराला तुम्ही दिवसभरात ३ वेळचे जेवण आणि २ वेळची न्याहारी असे हि विभागून खाऊ शकता. प्रत्येक जेवणात तुमच्या आहारात प्रथिनांचा समावेश करा यामुळे तुम्हाला पोट भरलेले वाटत राहील आणि सतत भूक जाणवणार नाही. जंक फूड खाणे टाळा आणि आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश असू द्या.

२. व्यायाम

हो हे अगदी खरे आहे! गर्भावस्थेत व्यायाम करू नये ,हा चुकीचा समज आहे. तुमच्या गर्भावस्थेच्या सुरवातीच्या महिन्यांत अगदी सुरक्षित असते आणि खरे तर बहुतेक डॉक्टरांकडून हि व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी स्वतःला दमवणारे व्यायाम प्रकार करण्याची गरज नाही. आठवड्यातून पाच दिवस आणि कमीत कमी ३० मिनिटांचा व्यायाम करणे पुरेसे आहे.

३. कमी कॅलरीज घ्या.

गर्भावस्थेत चमचमीत आणि हवे ते हवेसे वाटणे अगदी नैसर्गिक आहे पण तुमच्या पोटात अति प्रमाणात कॅलरीज जात नाहीत ना, या कडे लक्ष असू द्या.अतिरिक्त कॅलरीज तुमचे व्यायाम करणे निष्फळ ठरवतात. गरोदर असतांना सुमारे १००-३०० अधिकच्या कॅलरीज घेण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला एखादा पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर कमी किंवा अजिबात कॅलरी नसणाऱ्या पर्यायी पदार्थ खा. तुम्ही रोज किती कॅलरी घेत आहेत याची मोजणी करणारी अनेक ऑनलाईन मापके हि उपलब्ध आहेत.

४. तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष द्या.

गर्भवती स्त्रियांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे सर्वांत जास्त महत्वाची गोष्ट नव्हे तर त्यांची सर्वांत मोठी प्राथमिकता असायलाच हवी. सकारात्मकता असू द्या आणि तुम्हाला नैराश्य आणणाऱ्या आणि नकारत्मक गोष्टींना तुमच्या आयुष्यात थारा देऊ नका. शरीराच्या आरोग्य चांगले राखण्यासाठी तुमचे मन आनंदी असणे गरजेचे आहे!

५. सगळ्यांमध्ये मिसळा

गरोदर असणे म्हणजे केवळ आपल्या दिवाणखान्यात सोफ्यावर बसून पॉपकॉर्न खात नेटफ्लिक्स खात बसणे आणि गरोदर पणात कसा वेदनादायक आहे याची तक्रार करत बसणे नव्हे. वर सांगितल्या प्रमाणे,मानसिक आरोग्याची काळजी घेणे अपरिहार्य आहे आणि यासाठी तुमच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी बाहेर पडा आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा . समाजात मिसळणे आणि लोकांशी बोलणे यामुळे तुम्ही उत्साही आणि आनंदी रहाल.

६. हालचाल करा,चाला 

पूर्ण शरीराचे वजन अति प्रमाणात वाढू नये यासाठी व्यायाम आणि ध्यान करण्यासाठी जिम आणि योगा सेंटरला जाण्याची गरज नाही. भरपूर हालचाल करा आणि एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नका. चालण्याचे अनेक फायदे आहेत जसे कि स्नायूंच्या कार्यात समन्वय वाढणे आणि मेंदू तल्लख होणे.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon