Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

प्रसूतीच्या काही क्षणाअगोदर तिला कळले की, ती गरोदर आहे ......

गरोदरपणा हा एक प्रवास असतो; जो साधारण नऊ महिन्यांपर्यंत चालतो. सामान्यतः काय होते की, आपल्याला आपण गरोदर असल्याचे पहिल्या महिन्यात वा त्याच्या आसपास कळून येते. तथापि फराह आणि तिचा जोडीदार डेरेक यांच्याबाबत असे काहीच घडले नाही. त्यांना ती गरोदर आहे; हे प्रसूतीच्या अवघ्या काही मिनिटांअगोदरच कळाले!

फराह म्हणाली की, ते दोघे जेव्हा जिममध्ये होते; तेव्हा तिची पोटदुखी (क्रॅम्प्स) चालू झाली आणि त्यानंतर तिच्या गर्भाशयातून जलस्त्राव सुरू झाला. तिला वाटले की, तिने तिची पँट ओली केलेली आहे! म्हणून ते घरी गेले; म्हणजे तिला कपडे बदलून विश्रांती घेता येईल.

पण पोटदुखी तीव्र होत गेली आणि शेवटी अशी वेळ आली की, तिला इस्पितळात जावेच लागले. ते स्टॅम्फर्ड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात पोहोचले आणि तेथे त्यांना कळाले की त्यांना बाळ होणार आहे.

नैसर्गिकपणे ही अविश्वसनीय गोष्ट होती आणि त्यांचे बाळ सुरक्षित असेल की नाही, याची चिंता दांपत्याला सतावत होती. पण त्यांच्या म्हणण्यानुसार प्रसूती लवकर झाली असली; तरी त्यांचे बाळ लुकास हे निरोगी आणि सुदृढ आहे.

जरी फराहला वजन वाढणे, पाय सुजणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या अशी वेगवेगळी लक्षणे जाणवत होती; तरी त्यामधून गरोदरपणा असल्याचे उघड होत नव्हते. कारण मुख्यतः तिचे वजन सामान्यपणेच वाढले; त्यातून तिला कोणतीही जाणीव झाली नाही. तिने या लक्षणांसाठी तणावाला कारणीभूत ठरवले; कारण तिने नव्यानेच नोकरी सुरु केली होती, एक नवीन घर आणि कार खरेदी केली होती आणि या सर्व लक्षणांमागील कारणे शोधण्यात अपयश येत होते. उलट तिने सर्व लक्षणांना वेगवेगळे मानले. फक्त खूपच त्रासदायक पोटदुखीमुळेच तिला अतिदक्षता विभागात जावे लागले आणि तेव्हाच तिच्या गर्भवती असल्याचा उलगडा होऊ शकला.

ही असामान्य बाब असली; तरी याला क्रिप्टीक प्रेग्नेंसी असे म्हटले जाते. काही स्त्रिया त्यांच्याही नकळत पोटात अर्भकाची वाढ करत असतात. डॉ स्कॉट चडनॉफ (स्टॅम्फर्ड हॉस्पिटलच्या ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी विभागाचे प्रमुख) म्‍हणाले की, त्यांनी अशा प्रकारची पाच ते सहा बाळंतपणे पाहिलेली आहेत. ते म्‍हणाले की, पुष्कळ महिलांना बाळंतपणाची वाटणारी लक्षणे म्हणजे पोटाविषयक समस्याच वाटतात आणि या दोघांमधील फरक ओळखता येत नाही.

प्रसुतीविषयक वेदना होईपर्यंत क्रिप्टीक प्रेग्नेंसी ओळखता न येणे शक्य असते; कारण क्रिप्टीक प्रेग्नेंसी असलेल्या स्त्रियांमध्ये HCG (ह्यूमन कोरिओनिक गॉनडोट्रोपिक) हे अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असते वा कधीकधी नसतेही! हे एक असे हार्मोन आहे, जे डॉक्टरांना तुम्ही गरोदर आहात की नाही; हे ओळखायला मदत करते. म्हणूनच प्रेग्नेंसी टेस्ट, यूरिन टेस्ट आणि ब्लड टेस्टनंतरही बाळंतपण ओळखता येत नाही.

यामागे अनेक कारणे असू शकतात आणि त्यातीलच काही म्हणजे पीसीओएस, तणाव वा शरीरातील कमी फॅट हे असू शकतात. तथापि ही गोष्ट धक्कादायक आणि भीतीदायक असूनही फराह आणि डेरेक हे त्यांचा मुलगा लुकासचे जगामध्ये स्वागत करण्यास अतिशय उत्साही आहेत आणि त्यांच्या कथेला सुखद शेवटाची किनारही लाभली आहे!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon