आई व्हायचा आनंद प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटत असतो, त्यासाठी प्रसूतीदरम्यानच्या साऱ्या कष्टाला व त्रासाला सहन करण्याची तिची इच्छा असते. पण प्रसूतीदरम्यान शरीराची झालेली झीज व त्यामुळे आलेले स्थूलत्व आणि अनेक शाररिक बदल यामुळे स्त्रियांना स्वतःबद्दल न्यूनगंड वाटायला लागतो . तेव्हा काळजी करू नका. सात उपायांनी तुम्ही पुन्हा सुंदर दिसू लागाल.
१) शरीराची हालचाल करा
प्रसूतीनंतर हलका व्यायाम करायला हवा. दिवसभर तुम्हाला शरीराची जितकी हालचाल करता येईल तितकी करावी.जसे दरवाज्याची बेल वाजली तर उठणे. बाळाला घेऊन फिरणे. संध्याकाळी मोकळ्या हवेत थोडे भराभर चालणे. प्रसूतीनंतर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने हलकी योगासने करता येतील. परंतू खूप कठीण व्यायाम करणे टाळावे.
२) जीवनसत्त्वयुक्तच आहार घ्या
आई झाल्यानंतर बाळाच्या सदृढ आरोग्यासाठी योग्य जीवनसत्त्वयुक्त घरचाच आहार घ्यावा. जीवनसत्व, कर्बोदकेयुक्त आहाराने चरबीही वाढत नाही, आणि चेहराही उजळतो .जेवणात पालेभाज्या समावेश करावा,त्यामुळे पोटावरील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते .
३) केसांची निगा
प्रसूतीनंतर केसांची गळती ही बहुतांश महिलांची समस्या आहे. तेव्हा केसांसाठी जीवनसत्व ब व क घ्यावे. शक्य झाल्यास बाळ मोठे होईपर्यंत केस थोडे आखूड ठेवावे. रात्री खोबऱ्याच्या तेलाने केसांना मालिश करावी. त्याने केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह वाढून केसांची वाढ होते. त्याचबरोबर रासायनिक द्रव्य वापरून केसांचे आरोग्य बिघडवू नका.
४) चेहऱ्यावर पुन्हा तजेला आणा
प्रसूतीनंतर स्वतःचे व बाळाचे आरोग्य व्यवस्थित ठेऊन तुम्हाला त्वचेची काळजी घ्यावी लागेल.त्यासाठी दिवसातून दोन तीन वेळा चेहरा स्वच्छ धुवावा. खोबऱ्याच्या तेलाने पूर्ण शरीराची मालिश करावी, उजळपणा येईल.
५) स्वतः मध्ये उत्साह निर्माण करा
दिवसभर सळसळता उत्साहाने कामे करीत राहा. जर वाटले तर पार्लर मध्ये जाऊन केसांना स्पा किंवा मसाज करा. सर्व गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघा, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा . या सगळ्याने तुमचा चेहरा खुलेल.
६) व्यक्तीमत्वानुसार कपडे घाला
स्त्रीच्या सौंदर्यामध्ये कपड्यांची भूमिका महत्वाची आहे. प्रसूतीनंतर घट्ट कपडे घालण्यापेक्षा शरीराच्या रचनेनुसार सुटसुटीत कपडे परिधान करावीत. तुमच्या आवडीच्या रंगाचे कपडे घालून बघावे . वजन वाढले असे जाणवत असेल तर त्याची काळजी करू नये . शरीरातील बदलांवरील कोणाच्या वक्तव्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका .
७) चालायला जा
चालण्याने काहीतरी सर्जनशील असे काही सुचत असते, आणि ते तुम्हाला उत्साही बनवते. दिवसभर बाळाची काळजी घेतल्याने थोडा थकवा जाणवतो; तेव्हा संध्याकाळी फिरायला जावे. जमल्यास बाळाला व पतीला सोबत घ्यावे. पतीसोबत काही गप्पाही होतील. व काही वेळा सासूला घेऊन यावे, जेणेकरून चालणे होईलच सोबत कुटुंबातील नातीही घट्ट होतील.
