Link copied!
Sign in / Sign up
125
Shares

या सात गोष्टी, दर्शवतात गरोदरपणात तुमचा पती तुमच्या पाठीशी असतो

 

गरोदर असताना स्त्री किती गोष्टींमधून जाते हे तिलाच ठाऊक असते. गरोदरपणात हार्मोनस मध्ये बदल होतात, मग त्या वेळेला  स्वतःला सावरणे अशक्यच होते. नेहमीचं रुटीन संभाळणे कठीण जाते. तुम्हाला भूक लागते पण जेवण समोर आलं की  जेवू नये असं  वाटत.  या दिवसात तुम्हाला थोडे नैराश्य सुद्धा येते. असे असले तरी, स्वतःला या वेळेला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत तुमचे पती तुम्हाला साथ देतो, प्रत्येकक्षणी तुमच्या पाठीशी असतो. पुढील ७ गोष्टी दर्शवतात की कश्याप्रकारे तुमच्या पतीने तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मदत करण्याचा प्रयत्न केला

१) थकलेला असतानाही मदत करणे

गरोदरपणात गाढ झोप मिळणे किती कठीण असते. एक स्थितीत  जास्त वेळ न झोपता येणे , मळमळणे ह्यामुळे तुम्ही झोपू शकत नसतात. आणि त्यातच तुम्ही जर कुठे जॉब करत असाल . ही अवस्था तुमचे पती बघतात आणि आणि त्यांनाही याचे स्वतःहून तुम्ही निजलेले असताना पायांना मसाज करून देतो. जरी ती व्यक्ती दमलेली असेल तरीही तुमची राहिललेली बाकीचे कामे करून देतो. कारण तो तुमचा मदतशील मित्र असतो आणि भविष्यातला जागरूक पिता.

२) तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाणे

ते त्यांच्या ऑफिसच्या किंवा इतर कामात खूप व्यस्त असतील तरी ते प्रसूतीच्या चेक-अप साठी येतात . वेळच्या वेळी तुमची नियमित तपासणी करण्यासाठी स्वतः येतात  कारण त्यांचे तुमच्यावर व बाळावर प्रेम आहे.

३) तुमच्या खाण्याच्या इच्छा पूर्ण करतात

एक गोष्ट तर जाणली असेलच की, प्रसूतीच्या दरम्यान खाण्याच्या बाबतीत खूपच भूक लागते व नंतर खाण्याविषयी तिरस्कार पण वाटतो. सतत नवीन खावेसे वाटते, तेव्हा तुमचा पती खूप समजूतदारपणे ही गोष्ट ओळखून तुमच्या आवडीचे पदार्थ घरी आणतो. तुमच्यासाठी ४ पदार्थ ४ ठिकाणी जाऊन आणतात मग त्यासाठी कितीही त्रास झाला तरी घेतो, पण गरोदरपणात तुमच्या इच्छा पूर्ण करतो. कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. मान्य आहे ना तुम्हाला !

४) झोपेच्या कुशी बदलताना

रात्री बऱ्याचदा तुमचा संघर्ष चालू असतो की, कोणत्या कुशीच्या अँगलने तुम्हाला झोप लागेल. तुम्ही रात्रभर तशी बेडवरच इकडे सरकून तिकडे सरकून कुशी बदलत असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुमचा नवरा बघत असतो, आणि गुपचूपणे तुम्हाला जास्त जागा होईल तसा सरकत असतो. आणि कोणताच आवाज करत नाही की, तुम्हाला त्रास होईल व तुमच्या झोपेत अडथळा येईल. बऱ्याचदा रात्रभर तुमचा नवराही तुमच्यासाठी जागाच असतो.

५) तुमच्यासाठी सिगारेट सोडणे

तुमचा नवरा खूपच सिगारेट घेतो का ? किंवा मागे सिगारेट पीत  होतो आणि तुम्ही गरोदर झाल्यावर त्यांनी तुमच्या काळजीसाठी सोडून दिली. खरंच, सिगारेटची सवय सोडणे खूप कठीण गोष्ट आहे. पण त्याला वाटले की, आपल्या गरोदर पत्नीसाठी आणि गर्भातल्या बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी आपण सिगारेट सोडायला हवी. किंवा काही पती असेही असतील ते तुमच्या समोर पीत नसतील, तुम्हाला त्रास व्हायला नको. ही गोष्टही मोठीच आहे.

६) तू किती सुंदर दिसतेस

तुम्हाला या काळात शारीरिक न्यूनगंडत्व येते. कारण तुमच्या हार्मोन्सच्या बदलामुळे, चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स येतात, तुमचे स्तन खाली येतात, हे सर्व तुम्हाला स्वतःलाही त्रासदायक वाटते. ह्यामुळे तुम्हाला असे वाटायला लागते की, ‘माझा नवरा पहिल्यापेक्षा कमी इंटरेस्ट घेतोय’. पण असे काहीच वाटू न देता तुमचा नवरा सांगत असतो, ‘अरे व्वा खूप सुंदर दिसत आहेस, अशी प्रशंसा करून तुमच्या दिवसाची सुरुवात करून देत असेल.  

७) तुमच्यासोबत जास्तीजास्त वेळ व्यतीत करणे

तुमच्या पतीला रविवारी कामाच्या निमित्ताने बाहेर जायचे होते, पण तुमच्या आनंदाखातर त्यांनी ते नियोजन रद्द करून तो दिवस तुमच्यासोबत व्यतीत करण्याचे ठरवले. यावरून लक्षात येते की, त्याला तुमची काळजी आहे. आणि त्या व्यक्तीला तुमच्याकरीता  खूप वेळ नक्कीच द्यायला आवडत असेल.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon