Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

रंग खेळल्यानंतर रंग कसा घालवाल

रंग खेळायला कोणाला आवडत नाही पण रंग खेळल्यानंतर तो रंग चेहऱ्यावर अंगावर तसाच राहतो आणि ते दिसायला विचित्र तर दिसतेच परंतु त्यामुळे त्वचेची देखील हानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. यासाठी काही उपाय आम्ही सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हांला धूळवड आणि रंगपंचमी खेळता देखील येईल आणि त्वचेवर काही हानिकारक परिणाम पण होणार नाही. (शक्यतो होळी नैसर्गीक रंगानी आणि अत्यल्प पाण्यात खेळा )

रंग जास्त वेळ राहू नये म्हणून हे करा.  

१. रंगपंचमी किंवा धुळवड खेळायला जायच्या आधी सनस्क्रिन आणि मॉश्चराईझर लावावं. 

२. चेहऱ्यावर आणि हात-पायांना खोबरेल तेल, ऑलिव्हचे तेल , बदामाचे तेल लावावे. 

३. केसांना ऑलिव्ह,किंवा खोबरेल तेलाचा मसाज केल्यास त्यांचा रसायनं, धुळीपासून बचाव होईल. आणि रंग  जास्त वेळ केसांवर  टिकणार नाही. 

४. ओठांना लिप बाम लावा.

५. नखांना नेलपॉलीश  लावा जेणेकरून नखांवर आणि नखांजवळ रंग साचणार नाही

रंगून आल्यावर हे करा. 

१. रंगून आल्यावर रंग घालवण्यासाठी चेहऱ्यावर आणि त्वचेवर वेगवेगळे प्रयोग करू नका त्याऐवजी क्लिनसिंग क्रीम किंवा लोशनचा वापर करा. त्यामुळे त्वचा मऊसूत राहील. त्वचेला हलकंसं मालीश करून ती सुती कपडय़ानं साफ करा. तसेच क्लिन्झर नसल्यास  खोबरेल तेलाचा वापर करू शकता. तेल लावल्यामुळे रंग तर निघेलच आणि त्वचेचा  पोतही नीट राहील.

२. भरा -भरा केस धुवू नका.  आधी केसांवर बरेचसे  पाणी ओता. म्हणजे कोरडा रंग आणि काही रसायने निघून जातील. त्यानंतर शाम्पूने केस व्यवस्थित धुवा.

३. केस धुवून झाल्यावर थोड्या पाण्यात लिंबाच रस घ्यावा आणि त्याने केस धुवावे. त्यानंतर थोड्या कोमट पाण्याने पुन्हा केस धुवा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon