Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

या पाच गोष्टी तुमची मुलं तुम्हाला शिकवतात

आई-वडील म्हणून आपण मुलांना चालणं बोलणं,खेळणं अश्या सगळ्या गोष्टी शिकवत असतो. त्यांना आपण पण हेच निरागस छोटंसं बाळाकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. ते आपल्या वागण्यातून आपल्याला शिकवत असतात. आपण आपल्या एवढ्याश्या बाळाकडून कोणत्या गोष्टी शिकू शकतो ते पाहणार आहोत.

१. आनंद शोधणे.

बागेत उडणारे फुलपाखरू, रंगीबेरंगी कागदी चक्र, कुत्र्याचं हलणारे शेपूट किंवा तुम्ही केलेलं वेडेवाकडे चेहरे अश्या छोट्या-छोट्या बघून लहान बाळ हसतं,आनंदी होतं. बाळाला खुश होण्यासाठी या छोट्याश्या गोष्टी पुरेश्या असतात. जर त्यांच्याकडून आपण हीच एक गोष्ट शिकलो आणि लहान-लहान गोष्टींत आनंद मानायला शिकलो तर आपलं आयुष्य नक्कीच सुखी आणि आनंदी होईल. आनंदाचे क्षण हे तुमच्या आसपासच असतात ते तुम्ही लहान मुलांसारखे छोट्या-छोटया गोष्टींतून शोधणे गरजेचे आहे.

२.हार मानू नका.

माणसाची खरी हार त्यावेळी होते ज्यावेळी तो प्रयतन करणे सोडतो. पण लहान मुल याबाबत फार जिद्दी असते. आपल्याला हे केल्यावर इजा होईल का नाही होणार. आपण हे केलं तर काय होईल या कसल्याच गोष्टींचा विचार न करता ते आपलं प्रयन्त करत असतं. त्याला उठून उभं राहायचे असेल तरते अनेक वेळा पडतं त्याला अनेक वेळा लागतं पण ते उठून उभे राहण्याचे प्रयन्त सोडत नाही. हीच गोष्ट आपण आपल्या बाळा कडून शिकणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट करताना अनेक वेळा अपयश येईल पण आपण बाळासारखी जिद्द न सोडता प्रयन्त करत राहणे गरजेच आहे

३. जसे आहात तसे राहा.

तुम्ही कसेही वागा चांगले किंवा वाईट लोक तुम्हांला मागून नावे ठेवणाराच आहेत. त्यामुळे लोक काय म्हणतील याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसे राहा आणि वागा. तुमचे बाळदेखील हेच करते.त्याला हवे तेच करत असते आसपास असणारी माणसं काही म्हणो ते त्याला पाहिजे तेच करत असते स्वतःच्या स्वभावानुसार वागत असते. बाळ जसे एखादी गोष्ट आवडली नाही की नाही म्हणते एखादी गोष्ट हवी असल्यास सरळ मागून घेते. भीड-भाड काय हे त्याला माहीतच नसते अश्याप्रकारे आपल्या आवडी-निवडी सांगायला व्यक्त करायाला भीड बाळगू नये. आपण आहोत तसे राहावे वागावे. ही गोष्ट बाळाकडून शिकण्यासारखी असते.

४. कुतूहल जागृत ठेवा.

जसे लहान मुलांसाठी त्यांच्या आसपासच्या सगळ्याच गोष्टी नवीन असतात आणि ते त्याला प्रत्येक गोष्टीविषयी सतत कुतूहल वाटत असते. पण आपण जसं-जसे मोठे व्हायला लागतो तसं -तसे तुम्ही आपल्यातले गोष्टीविषयी असणारे कुतुहूल कमी होत जाते. लहान मुलांकडे बघूनत्यांच्या सारखे कुतूहल जागृत ठेवणे आवश्यक असते. ही तुम्हांला नवनवीन गोष्टी विषयक माहिती मिळवण्यास प्रोहत्साहन देत असते.आणि यामुळे आपण समृद्ध होत जातो.

५. पूर्वग्रहदूषितपणा ठेऊ नका.

बाळं ही निःपक्षपाती असतात.त्यांच्या समोर जसं-जश्या गोष्टी येतील तास-तसं ते त्याच्यावर मात करत पुढे जात असते. समाज त्यांना एखादी झाकण न उघडणारी बाटली दिलीत तर ते त्याला शक्य त्या उपायांनी बाटलीचे झाकण उडण्याचा प्रयन्त करतं. याआधी ही बाटली बालकडून उघडली गेली नसेल तरी ते आधीचा अनुभव लक्षात न ठेवत आता झाकण उघडण्याचा प्रयन्त करणे सोडणार नाही. म्हणजेच डोक्यात म्हणजेच पूर्वग्रहदूषितपणा न ठेवता ते आपले प्रयन्त चालूच ठेवते. हीच गोष्ट आपल्याला आपल्या मुलाकडून शिकायची आहे. एखाद्या गोष्टीत अपयश आले असेल तर दुसऱ्यांदा प्रयन्त करताना पुन्हा अपयशच येईल असे मनात न ठेवता प्रयन्त करणे गरजेचे आहे.

आहेत की नाही या गोष्टी आपल्या बाळाकडून शिकण्यासारख्या ?

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon