Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

तुम्ही या पाच गोष्टी चेहऱ्यासाठी वापरत नाही ना ?

    चेहरा हा तुमची ओळख असतो, चेहरा हा तुमच्या अनेक भावना व्यक्ती करत असतो. व्यक्तिमत्वामध्ये चेहरा हा महत्वाची भूमिका बजावतो. अश्या या चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक असते. प्रत्येकाचा त्वचेचा प्रकार वेगळा असतो. त्यानुसार त्याची काळजी घेणे आवश्यक असते. आम्ही अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या चेहऱ्याची काळजी घेताना चेहऱ्यासाठी वापराने शक्यतो टाळावे.

१. बॉडी लोशन

चेहऱ्यांची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा वेगळी असते. हात-पायच्या त्वचेपेक्षा चेहऱ्याची त्वचा पातळ आणि नाजूक असते. चेहऱ्यासाठी बॉडी लोशन पेक्षा सौम्य लोशनची आवश्यकता असते. त्याचा तुलनेत बॉडी लोजन हे थोडेसे जाडसर आणि खूप सुगंधीत असते. बॉडी लोशन चेहऱ्यावर वापररल्यास चेहऱ्याच्या त्वचेची सूक्ष्मछिद्रे बंद होतात आणि त्यामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते.

२. टूथपेस्ट

अनेकजण चेहऱ्यावरचे मुरुमं घालवण्यासाठी त्या मुरमांवर टूथपेस्ट लावण्याचा सल्ला देतात, हा उपाय कधीतरी एखाद्यावेळी वापरण्यास हरकत नाही. परंतु सतत टूथपेस्टचा चेहऱ्यावर आणि मुरमांवर वापर केल्याने ते त्वचेस हानिकारक असते. टूथपेस्ट चेहऱ्यावर वापरल्याने चेहऱ्याच्या त्या भागात काळे डाग पडण्याची शक्यता असते. तसेच त्या भागात कायमचे व्रण निनिर्माण होऊ शकतात किंवा त्या भागात खाज येणे किंवा त्या भागाची आग होणे अश्या समस्या निर्माण होऊ शकतात.

३. शॅम्पू

आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी कधीही शाम्पू वापरू नका आपले केस आणि चेहरा पूर्णपणे भिन्न पेशींच्या संरचनांपासून बनलेले आहेत आपले तोंड स्वच्छ करण्यासाठी आपण जे काही वापरता ते आपले केस धुण्यास आणि त्याउलट करता येणार नाही. शाम्पू आपण आपल्या केसांमधील मळ तेल काढून टाकण्यासाठी वापरतो. त्यामुळे जर शाम्पू आपण आपल्या चेहऱ्यावर वापरला तर आपली त्वचा कोरडी करतो.

४. अति गरम पाणी

तुम्हांला माहितीच आहे की अति गरम पाण्यामुळे शरीराची त्वचा कोरडी पडते तर नाजूक चेहऱ्याची त्वचाची काय अवस्था होईल. गरम पाणी त्वचेतील ओलावा कमी करतो. त्वचेतील स्निग्धांत कमी होऊ नये म्हणून अति गरम पाणी चेहऱ्यासाठी वापरू नका. तसेच थंडीत सतत साबणाने किंवा तीव्र फेसवॉशने चेहरा धुवू नये

५.स्पंज (लोफॅह स्पंज)

जरी आपल्या शरीरच्या त्वचेवर स्क्रॅबिंग करण्यासाठी स्पंज उत्तम आहे, तरी आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर तो फारच खरखरीत आणि कठीण ठरू शकते. त्यामुळे त्वचेवर या स्पंजाचा वापर केल्यामुळे त्वचा खरखरीत आणि रुक्ष होण्याची शक्यता असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon