Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

हे आहेत सतत एसी मध्ये बसण्याचे दुष्परिणाम

 सध्या वातावरण उष्णता वाढत असल्यामुळे एसी शिवाय पर्याय राहिला नाहीये परंतु या एसीमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात ते कोणते ते आपण पाहणार आहोत

१.अवयवांच्या क्षमतेवर परिणाम 

तापमानातील बदलांमुळे अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होत नाही, ज्याने शरीराच्या अवयवांचा क्षमतेवर परिणाम होतो. 

२. अति कमी तापमानामुळे डोकेदुखी 

एसीचा तापमान खूप कमी असल्यास मेंदूच्या पेशींचे आकुंचन होते ज्याने मेंदूची क्षमता प्रभावित होते. डोकेदुखी आणि त्याने चक्कर येण्याची शक्यता असते.

३. अंगदुखी आणि सांधेदुखी

सतत एसी मध्ये बसल्याने अंगदुखी आणि सांधे दुःखीच समस्या निर्माण होते. तसेच पुढे जाऊन अंग आखडणे हात-पाय आखडणे अश्या समस्या निर्माण होतात 

४. ताप 

दिवसभर एसीत बसल्यानंतरबाहेर पडल्यावर एकदम जास्त तपमानात गेल्यामुळे ताप  येण्याची शक्यता असते.  बऱ्याचदा दुपारच्या वेळी  एसीतून निघून सामान्य तापमानात आल्यावर ताप येण्याची शक्यता वाढते.

५. त्वचेविषयक समस्या 

एसीचा दुष्परिणाम हा त्वचेवर देखील होतो. सतत एसी मध्ये त्वचेचा नैसर्गिक ओलावा हरवतो आणि त्वचा हळू-हळू कोरडी पडायला लागते. 

६. लठ्ठपणात वाढ 

एसी मध्ये सतत बसल्यामुळे शरीरातील ऊर्जेचा वापर योग्य प्रमाण होत नाही. त्यामुळे लठ्ठपणात वाढ होण्याची शक्यता असते. 

 काय करावे

ऑफिस मध्ये शक्य नसले तरी घरी एसीचा कमीतकमी वापर करावा अतिशय उकडत असेल तर अश्यावेळी झोपायच्या खोलीमध्ये एसी झोपायला जाण्यापूर्वी काही वेळ चालू करावा आणि झोपायला गेल्यावर बंद करून कमी स्पीड वर पंखा लावावा त्यामुळे खोली  त्रास देखील होत नाही. 

ऑफिस मध्ये जॅकेट घालावे तसेच पायासाठी मोठे मोजे घालावे वाटल्यास या गोष्टी ऑफिसमध्येच ठेवाव्या.

कमी तापमानातून एकदम जास्त तपमानात जाणे टाळावे 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon