Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

या काही बाबी ज्या तुमच्या बाळाची नैसर्गिक वाढ रोखू शकतात!

आपण सर्वांनीच बाळांसाठीच्या शॉपिंगचा अनुभव घेतला असेलच.... बाजारात विक्रीस असणाऱ्या काही वस्तू जरी तुमची पालकत्वाची जबाबदारी सुलभ करतात; पण त्यातल्या काही गोष्टी शिशुच्या नैसर्गिक वाढीवर नकारात्मक  परिणाम करू शकतात. यातील काही बाबी तर फक्त सामाजिक प्रतिष्ठेच्या  असतात. त्यामानाने त्यांची उपयुक्तता फार कमीच असते आणि मुलांच्या नैसर्गिक वाढीला त्या कदाचित अडथळा ठरू शकतात. अश्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत. 

१. पॅसिफायर्स 

पॅसिफायर्सचा उपयोग करावा की करु नये यावर शतकानुशतके वाद चालत आलेला आहे; आणि तरी अजून एकमताने निष्कर्ष येऊ शकलेला नाही. परिणामी, यावरचा निर्णय सर्वस्वी तुमच्या हातात आहे. पॅसिफायर्स हे तुमच्या बाळाचे रडणे दीर्घकाळा पर्यंत दुर्लक्षित करण्यासाठी वापरले जाते. काही लोकांच्या समजुती नुसार, बाळाला रडण्यापासून थांबवणे हे अनुचित आहे ; कारण असे करण्याने त्या बाळाच्या आगामी व्यक्तिमत्वावर वाईट प्रभाव पडू शकतो. अशा बालकांचा भविष्यामध्ये आपल्या भावना दडपून राहण्याकडे कल वाढू शकतो. म्हणून तुमच्या बाळाला कधी कधी झोप येईपर्यंत रडू देण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा नंतर त्यांना स्वतःकडे लक्ष खेचून घेणे आणि फाजील लाड हे अंगवळणी पडू शकते आणि प्रत्येक वेळी रडताना ते तुमच्याकडून तशीच अपेक्षा करु शकते.

२. स्ट्रॉलर्स 

ही गोष्ट या यादीमध्ये असणे हे किंबहुना विचित्र वाटू शकते! कारण प्रत्यक्षात ही वस्तू पालकांसाठी वरदान ठरलेली आहे. याचे कारण उघड आहे - तुम्ही तुमच्या तान्हुल्याला सर्वत्र कुशी मध्ये घेऊन फिरु शकत नाही. परंतु अलीकडे याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. तुमच्या बाळाला दीर्घ काळासाठी अशा बंदिस्त जागेत खिळवून ठेवणे टाळले पाहिजे. जर त्यांची वाढ चालू शकण्यायोग्य झाली असेल, तर त्यांना तुमच्या बरोबर चालायची संधी द्या. जरी ते धीम्या गतीने चालत असेल तरी उत्तम! जेव्हा ते थकून जाईल, तेव्हा त्याला तुम्ही स्ट्रॉलर मध्ये परत ठेऊ शकता. पण जेव्हा तुमची कामासाठी धावपळ चालू असेल तेव्हा बाळाला खूप वेळासाठी स्ट्रॉलर मध्ये सोडू नका. निष्क्रिय आणि जखडलेले राहणे हे त्यांना अस्वस्थ करते आणि त्यांच्या शारीरिक वाढीत अडथळा निर्माण करु शकते.

३. खेळणी आणि खेळाची साहित्ये

 खेळणी आणि खेळाची साहित्ये यांसारख्या पुष्कळ बाळांसाठीच्या वस्तू; तसेच बाळांशी बोलणे, अंगाईगित गाऊन झोपवणे आणि गुदगुल्या करुन अस्वस्थता नाहीशी करणे अशा वेगवेगळ्या पद्धतींवर 'रिसोर्सेस फॉर इंफॅण्ट एज्युकेरर्स' (REI) या नामांकित शिशुपालनाचे शिक्षण देणाऱ्या संस्थेने नापसंती व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, आपण सहकारी प्रौढ व्यक्तीला जशी वागणूक देतो; अगदी तशीच वागणूक नवजात बालकाला देखील दिली पाहिजे.

अशी वृत्ती त्यांना स्वतःसाठी विचार करण्याची मोकळीक देते आणि त्यांच्या बुद्धीला स्वतःच्या गतीने विकसित होण्याचे स्वातंत्र्य देते. अशाने पौगंडावस्थेत त्यांच्या सर्जनशीलतेचा विकास होण्यास आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकारात येण्यास मदत होते. तसेच त्यांना सामाजिक चालीरीतींपासून वेगळा विचार करण्यास सहाय्यक ठरते.

थोडक्यात सांगायचं झालं, तर वर उल्लेखलेल्या वस्तू आवश्यकच आहेत. तरी पालकांनी आपल्या बाळाच्या सुयोग्य वाढीकरिता त्यांचा किती प्रमाणात वापर करावा, हे सुजाणतेने ठरवायची गरज आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon