Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

या गोष्टी जोडीदाराला मनाविरुद्ध करायला भाग पडू नये

प्रत्येक व्यक्तीची आपल्या जोडीदाराबाबत काही कल्पना आणि स्वप्ने असतात. लग्न करताना बहुतांश जण आपल्याला अनुरूप असाच जोडीदार निवडतात. पण काही सवयी काही वागण्याच्या पद्धती आवडी-निवडी या लग्नानंतर किंवा एकमेकांबरोबर वेळ घालवल्यानंतरच कळतात. या काळात बऱ्याच जणांना आपल्या जोडीदारात काही उणीवा भासू लागतात आणि ती व्यक्ती आपल्या आवडीनुसार त्या गोष्टीमध्ये बदल करण्याचा प्रयन्त करायला लागते. अश्यावेळी तुमच्यातील नटे टिकवून ठेवण्यासाठी जर तुमच्या जोडीदारला ती गोष्ट मान्य असेल तर ठीक आहे. परंतू जोडीदाराच्या मनाविरुद्ध करायला भाग पडू नका यामुळे तुमच्या नाते संबधात दुरावा येऊन नाते तुटण्याची शक्यता आहे.

१. वागण्या-बोलण्याची पद्धत बदलणे

     प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तित्व असते. त्यानुसार त्या व्यक्तीची वागण्या-बोलण्याची पद्धत असते. या पद्धती बदलणे म्हणजे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व बदलायला सांगण्यासारखे आहे. जसे- असेच बसू नको , हे करू नको ते करू नको असे चाल तसेच चाल इत्यादी

२. राहणीमान बदलायला सांगणे

आपण जसे कपडे घालतो ती आपली आवड आणि ओळख असते तुम्हांला आवडतो म्हणून त्या प्रकारचेच कपडे घालायला सांगणे, त्याच रंगाचे कपडे घालायला सांगणे. तुम्हांला आवडते तशीच केशरचना करायला सांगणे किंवा या हे हे चुकीचे आहे. तुम्हांला आवडते म्हणून जोडीदाराचे राहणीमान बदलू नका. त्यांना त्यांची आवड जपू द्या.

३. करियर बाबत तडजोड करायला भाग पाडणे

तुमच्या महत्वकांशासाठी जोडीदाराला स्वप्नांचा त्याग करण्यास भाग पडू नका. किंवा तुम्हांला आवडत नाही म्हणून किंवा तुम्हांला काही खटकले म्हणून करियरबाबत तडजोड करायला लावणे हे जोडीदाराचा अपमान करण्यासारखेच आहे. ही गोष्ट साधारणतः महिलांच्या बाबतीत घडून येते

४. मुल जन्माला घालणे

जर दोघांना मुलं हवे असेल तरंच मुलांचा विचार करावा हा निर्णय एकमेकांवर लादू नये. जर तुम्ही दोघं निर्णयांवर ठाम असाल तर आपले म्हणणे जोडीदाराला त्याला समजावून सांगा. जोडीदाराची बाळासाठी काही वर्ष थांबण्याची तुमची इच्छा असेल तर तसे करा. बाळाला जन्म देणे, वाढवणे ही खूप मोठी जबाबदारी असल्याने तुम्हाला त्याबद्दल जोडीदारावर अपेक्षांचे ओझे लादू नका

५. संभोगा करायला लावणे

याबाबतची इच्छा होणे हे वैयक्तिक आहे. संभोग किती आणि कशाप्रकारे करावा हा दोघांनी मिळून घेण्याचा निर्णय आहे. त्यामुळे यावर कोणाची एकाची मनमानी चालणार नाही. त्यामुळे ज्यावेळी एकाची इच्छा नसल्यास स्वतःच्या त्याच्या इच्छापूर्तीसाठी मनाविरुद्ध भावनिक करून किंवा जबरदस्तीने संभोग करायला लावू नये. यामुळे एकमेकांच्या मानत घृणा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon