Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

या गोष्टींना देखील एक्सपायरी डेट असते

साधारणतः आपण औषधे खाण्याचे पदार्थ पेये, दुग्धजन्य पदार्थ या पदार्थंची एक्सपायरी डेट तपासतो पण तुम्हांला माहिती आहेत का काही गोष्टी अश्या आहेत ज्यांची आपण एक्सपायरी डेट तपासणे आवश्यक असते. या गोष्टी पुढील प्रमाणे

१. टूथब्रश

आपला दिवस ब्रशने सुरु होतो आणि आणि संपतो देखील ब्रशनेच, हा ब्रश आपण वेडा -वाकडा होई पर्यंत वापरतो पण तुम्हांला माहिती आहे की हा ब्रश वापरण्याची देखील एक मुदत असते आणि नंतर ब्रश बदलणे आवश्यक असते. साधारणतः तीन महिन्यांनी ब्रश बदलणे आवश्यक असते. सहा महिण्यापेक्षा जास्त एक ब्रश वापरू नये

२. कंगवा किंवा केसांचा ब्रश

हा देखील रोजच्या वापरातील महत्वाचा घटक आहे. हा आठवड्यतून एकदा धुवावा . अनेकांचा आपला असा एक आवडता कांगावा असतो आणि तो ते अनेक वर्ष वापरात असतात. परंतु कंगवा हा एक ते दीड वर्षपेक्षा जास्त वापरू नये आणि प्रत्येक आठवड्याला कंगव्याची स्वच्छता राखणे गरजेचे असते.

३. ब्रा

अनेक महिला त्याचे अंतर्वस्त्र ब्रा हे अनेक वर्ष बदलत नाही परंतु साधारणतः ९ ते १२ महिन्यांनी ब्रा बदलणे आवश्यक असते कारण साधारणतः वर्षभरात तुमच्या कपड्यांची साईज बदलण्याची शक्यता असते. तसेच ते सैल देखील होतात. तसेच जर वर्षच्या आत तुम्हांला कपडे घट्ट झाले तर लगेच कपडे बदलणे आवश्यक असते.

४.टॉवेल

टॉवेल हा देखील रोजच्या वापरण्यात घटक आहे हा टॉवेल देखील २ वर्षा पेक्षा जास्त वापरू नये. आणि दार दोन दिवसा आड टॉवेल स्वच्छ धुवून वाळवणे आवश्यक असते.

५.स्वयंपाक घरातील पुसायची कापडे/ स्पंज

स्वयंपाक घरात ओटा, जेवायचे टेबल असे पुसायला घेण्यात येणारे स्पंज किंवा कपडे ही दार सहा महिन्याने बदलणे गरजेचं असते अन्यथा आजार पसरवायला ही कपडे पुरेशी असतात

६. लोफ

अंघोळीच्या वेळी अंग स्वच्छ करायला वापरण्यात येणारे लोफ्स हे देखील जास्तीत-जास्त सहा महिने वापरावे अन्यथा त्वचेविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच हे लोफ्स वेळच्या-वेळी स्वच्छ करावे.

७.व्यायामाचे बूट

व्यायामाचे कपडे आणि बूट हे देखील दोन वर्षांनी बदलावे कारण साधारणतः पायाचे आकारमान वयानुसार बदलत असते किंवा कमी जास्त हॊत असते जर तुम्ही बूट बदलेले नाही तर पाय दुखणे चालताना-पाळताना त्रास होणे अश्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon