Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

तुमच्या मेंदूवर प्रभाव पाडणाऱ्या काही गोष्टी

आपल्या शरीरातील सर्व अवयवांपैकी मेंदू हा सर्वाधिक औत्सुक्याचा राहिलेला आहे. याचे कारण म्हणजे आपल्या भावना आणि इच्छांपासून, आपल्या झोपण्याचा क्रम आणि शारीरिक आरोग्यापर्यंत सर्व मेंदूमार्फत नियंत्रित होते. गंमत म्हणजे एका लोकप्रिय समाजाच्या विसंगत, आपण आपल्या मेंदूचा १००% वापर करत असतो आणि तेही त्याचे सर्व भाग दिवसभर कार्यरत असतात; जरी आपण झोपलेलो असलो तरी! आणि नुकतेच शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे की, आपल्या आयुष्यातील काही विशिष्ट गोष्टींचा मेंदूवर विशेष प्रभाव पडतो. यातील काही गोष्टी पुढीलप्रमाणे:

१. खेळ

खेळामुळे व्यक्तीच्या ज्ञानेंद्रियांचे कार्य, माहितीवर प्रक्रिया करणे, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचा विकास होतो. बाळांमध्ये ते वर्तणुकीमध्ये आणि शालेय कामगिरीमध्येही चांगला बदल घडवून आणते. त्याचबरोबर निष्क्रियतेमुळे मेंदू आणि ज्ञानेंद्रियांच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून शालेय जीवनात आणि तसेच आपल्या दैनंदिन जीवनात खेळाला योग्य महत्त्व देणे महत्त्वाचे आहे.

२. वाचन

एका अभ्यासानुसार वाचनामुळे आकलनशक्तीचा विकास होतो. एका प्रयोगामध्ये लक्षपूर्वक वाचनामुळे मेंदूला रक्‍ताचा पुरवठा वाढल्याचे आढळून आले, जे आकलनशक्ती आणि एकाग्रतेमध्ये सुधारणा करते. शाब्दिक रचनेवर लक्ष द्यायला मेंदूमध्ये विविध गुंतागुंतीच्या कार्यांचा समन्वय जरुरी असतो; हे त्यामागचे कारण असू शकते. म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही पुस्तक वाचण्यास घ्याल; तेव्हा तुम्ही फक्त पाने चाळत नाहीय ना, याचे भान ठेवा.

३. भरपूर साखरेचे सेवन

भरपूर साखरेचे सेवन हे तुमच्या आकलनशक्ती आणि मानसिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. खूप साखर खाण्याने आकलनशक्ती, विशेषतः स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्तीचा ऱ्हास होतो; असे मानले जाते. तथापि, यामागचे नेमके कारण अज्ञात आहे. तसेच साखरेच्या अतिसेवनामुळे डिप्रेशनसारखे मानसिक आजार होऊ शकतात.

४. प्रेम

अभ्यासानुसार जे लोक प्रेमात पडण्याअगोदर सामाजिकदृष्ट्या बुजरे होते; त्यांच्या सामाजिक कौशल्यांमध्ये प्रेमानंतर कमालीची सुधारणा होते! यामागचे कारण 'ऑक्सिटोसिन' नामक नैसर्गिक हार्मोन असू शकते; जे लोकांना अधिक सहानुभूतीपूर्ण आणि समजूतदार बनवते.

५.  गरोदरपणा

आपण सामाजिक कौशल्यांबाबत बोलतच आहोत; तर गरोदरपणाचाही उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. संशोधनानुसार गरोदरपणामुळे मेंदूच्या 'ग्रे मॅटर' चा ऱ्हास होतो; जे स्मरणशक्ती, भावना, स्नायू नियंत्रण, इंद्रियांचे अवलोकन, भाषण शक्ती, निर्णय शक्ती आणि स्वयंनियंत्रण यांवर मोठा प्रभाव पाडते. या ऱ्हासामागचे कारण म्हणजे मातृत्वविषयक संवेदनांचा आणि सामाजिक कौशल्यांचा विकास होणे हे असू शकते. आणखी एका संशोधनानुसार हे बदल दोन वर्षांपर्यंत टिकू शकतात.

६.  तणाव

तणाव हे वेगवेगळ्या व्याधी जडण्यामागचे प्रमुख कारण असते. तसेच त्याचा मेंदूवर लक्षणीय प्रभाव पडतो. एका अभ्यासानुसार ते वयोमानानुसार होणाऱ्या आकलनशक्तीच्या ऱ्हासास गती देते. याचे कारण म्हणजे तणावाच्या दीर्घ काळामुळे न्यूरॉन्स (विशेषतः हिप्पोकॅम्पस मधील) नष्ट होतात, जे अल्पकालीन स्मरणशक्तीपासून दीर्घकालीन स्मरणशक्तीपर्यंतच्या ग्रहणशक्तीत मोठा प्रभाव पाडते.

७. निर्जलीभवन

रोज आठ ग्लास पाणी पिणे हे फक्त तुमची त्वचा आणि शारीरिक आरोग्यच उत्तम ठेवते; असे नव्हे! एका अभ्यासानुसार निर्जलीभवनामुळे मेंदूचा ऱ्हास होतो. याचा परिणाम नंतर स्मरणशक्ती नष्ट होणे आणि आकलनशक्ती दुबळी होण्यामध्ये होऊ शकतो. आणि द्रवाचा अगदी प्रमाणापुरता ऱ्हासदेखील ही क्रिया घडवू शकतो. म्हणून नेहमी पाणी पीत राहण्याची सतर्कता बाळगा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon