Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

या गोष्टी माझ्या पतीने माझ्यासाठी केल्या : पत्नींचे अनुभव

कोणत्याही विवाहितेला आपल्या नवर्‍याने दिलेले सरप्राईज खूपच आवडते. याचा अर्थ त्याने दिलेली फुले, चॉकलेट्स किंवा एखादी शाररिक गोष्ट, वस्तुरुपातील भेट इतकाच मर्यादित नसते. ही सरप्राइज म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी की, त्याने कधी काळजीपूर्वक, प्रेमाने आपल्यासाठी केलेली कृती, वक्तव्य जे आपण कधीच अपेक्षित करत नसतो. या गोष्टी जरी दिसायला लहान असल्या तरी आपल्यासाठी नीतीमूल्यांच्या दृष्टीने भावनिक दृष्टया, प्रेमाच्या भावनेने खूप महत्वाच्या असतात. नवर्‍याच्या या कृतीमुळे आपण त्याच्यासाठी किती महत्वाचे आहोत आणि तो खरंच आपल्याला किती प्रोत्साहन देतो हे समजते. ही भावना प्रत्येक नवरा वेगवेगळ्या पध्दतीने, प्रकारे मांडू शकतो. असे काही अनुभव अनेक महिलांनी आमच्यासोबत शेअर केले आहेत. त्यापैकी सात महिलांचे अनुभव जे त्यांच्यासाठी खूप खास आणि प्रेमाचे आहेत.

१. चहाची वेळ आणि रात्रीचे जेवण ते ही आयतं

“एक दिवस मी खूप आजारी पडले होते आणि घरी बसून त्या दिवशी काम करत होते. माझ्यात अजिबातच ताकद नव्हती उठून काही करण्याची. मी घरातले एकही काम करू शकत नव्हते. भांडी घासली नव्हती, वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले नाहीत, स्वयंपाकदेखील केला नाही. संध्याकाळी माझा नवरा घरी आल्यावर खूप थकलेला दिसत होता. मला किंचित बरे वाटत होते. तर मी विचार केला की, त्याच्यासाठी जरा चहा करावा. तेव्हा मी दिवाणावरून उठून तोंड, हात-पाय धुवण्यासाठी गेले. जरा आवरून मी बाहेर येईपर्यंत टेबलवर माझा चहा तय्यार होता. माझा नवरा चक्क स्वयंपाक घरात मुलांना घेऊन स्वयंपाक करत होता. गॅसवर काही तरी शिजायला ठेवले होते आणि तो माझ्या दुपारच्या जेवणाची भांडी घासत होता.

एकीकडे मुलांची मदत घेऊन त्यांना तो शिकवतच होता. मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने अजून पायातले मोजे, गळ्यातला टाय सुद्धा काढले नव्हते आणि तसाच कामासाठी उभा राहिला होता. मी स्वयंपाक घराकडे जात असताना तो माझ्याकडे बघून छान स्माइल देत होता. माझ्या आगमनाने त्याला एकक्षण भिती वाटली आणि त्यानेे माझा हात धरून पुन्हा मला स्वयंपाक घराच्या बाहेर काढले आणि दिवाणावर बसविले. थोड्या वेळानी माझी मुले बेडरूम मध्ये सर्व स्वयंपाक घेऊन आली आणि आम्ही सर्वांनी मिळून पिकनिकला करतात तसे मस्त जेवण केले.

- रंजीनी

२. दिवसभराचा चालक

सुमारे एक आठवडा माझा हात मुरगळला होता. तो आठवडा माझ्यासाठी खूपच कठीण गेला. त्या आठवड्यात मला प्रचंड काम होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी माझी आई आजारी पडली. आईला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केले आणि मला कामावर रुजू व्हावे लागले. अर्थातच सर्व घराचा ताबा माझ्या प्रिय नवर्‍याने घेतला. त्या आठवड्यात दररोज सकाळी मुलीला शाळेत सोडून मला कार्यालयात(ऑफिस) सोडत असे, जेव्हा गरज होती तेव्हा माझ्या आईला घेऊन तो दवाखान्यात जात-येत असे. अशा प्रकारे तो आमचा हक्काचा चालकच जणू झाला होता.

- सीमा

३. माझा सुपरहिरो !

“आम्ही एक गोष्ट नेहमी ठरवतो की, आमच्या पालकांसोबत आणि नातेवाईकांसोबत इतरांच्या सांगण्यावरून आम्ही भांडण करणार नाही.” यावेळी माझ्या नणंदेकडे सर्व नातेवाईक जमले होते, या सर्वांनाच मी यापूर्वी बरेचवेळा भेटले होते. पण त्यावेळी त्याच्या एका काकूला मी तिथे आलेले आवडले नाही. माझा पती मला नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष कर असे सांगायचा. पण त्यादिवशी त्या खूपच खोचकपणे टोमणे मारत होत्या. मी त्यावर काही प्रतिकि‘या देण्यापूर्वीच तो माझ्या बाजूने उत्तर देत होता. मला खरंच आश्चर्य वाटले की, त्याने हा सर्व प्रकार माझ्या पर्यंत पोहोचू न देता परस्पर त्यांना सुनावले होते. या प्रसंगातून येणारे नैराश्य माझ्यापर्यंत पोहचू दिले नाही.

-नलिनी

४. केसाळ फॅमिल मेंबर 

गेल्या व्हॅलेंटाइन डे ला माझा नवरा मला न सांगता एका ठिकाणी घेऊन गेला. मी अत्यंत श्वानप्रेमी आहे. मला कुत्र्यांची अगदी लहानपणापासून खूप आवड आहे. जेव्हा आम्ही प्राण्यांच्या आश्रयस्थानाकडे जाऊ लागलो तेव्हा मला खूपच आनंद झाला.

घरी जाण्यापूर्वी त्याने मला सरप्राइज सांगितले की, त्याने एक कुत्र दत्तक घेतले आहे. ते थोडे वयाने मोठे होते पण खूप लाघवी होते. हे तेच कुत्र होते ज्याच्यासोबत आम्ही दोन-तीन तास खेळत होतो. जेव्हा आम्ही त्याला घरी नेले, तेव्हा आमचा मुलगा कुत्र्याला बघून खूप आनंदी झाला. हा अनुभव म्हणजे जणू पहिल्या भेटीत प्रेमाचा साक्षात्कार व्हावा असाच होता. हा व्हेलेंटाइन डे खूपच संस्मरणीय ठरला. पण मला माझ्या नवर्‍याच्या अशा सरप्राइज देण्याच्या सवयी माहिती आहेत आणि मी माझे प्रेम व्यक्त करते. पण त्या दिवशी माझ्या मुलाला इतके खूश, आनंदी बघून दिवस एकदम सार्थकी लागला.

- सोनाली

----

५. एक नंबर वडील

मी एक गृहिणी असून,माझा सर्व दिवस दोन्ही मुलांसोबत

व्यतित करते.एक गोष्ट मी खात्रीने सांगते,ते त्यांच्या वडीलांना खूप मानतात. आणि का मानू नये. तो आहेच खरं असा.दोन वर्षापूर्वी जेव्हा माझी मुले जरा लहान होती. तेव्हा तो मानसिक दृष्टया थोडा खचला होता. तेव्हा आम्ही तिघांनी त्याची काळजी घेतली होती, त्याने पण अशी काळजी घेतली होती की, त्याच्या समस्येचे परिणाम मुलांवर होऊ दिले नाहीत. तो ऑफिसला थोडा उशीरा जात असे आणि घरी सुद्धा वेळेपूर्वी येयचा कारण स्वत:वरचा ताण वाढू नये. हा अतिरिक्त मिळालेला वेळ तो मुलांसोबत खेळण्यात घालवायचा. त्यावेळी त्याला जर कोणी पाहिले असते तर कोणीही असेच म्हटले असते की, हा जगातील सर्वांत सुखी बाप आहे.

- रोज

६.  माझा नवरा उत्कृष्ठ मसाजर !

जगातील सर्वांत आवडणारी गोष्ट म्हणजे पाठीचा मसाज. मला खरंच खूप आवडती प्रकि‘या आहे. मी माझ्या नवर्‍याचे खरंच खूप कौतुक करते की,तो रोज रात्री मसाज करतो.जेव्हा आम्ही सुट्टीवर असतो, कोणा नातेवाईकांकडे गेलो असलो,तरी तो न चुकता माझ्या पाठीचा मसाज करून देतो.

आमच्यात जरी भांडणे झाली तरी तो माझ्या जवळ येऊन मसाज करतो. हे सर्व सांगण्याचा प्रपंच असा की, आम्ही किती जरी भांडलो,चिडलो,रागावलो तरी सुध्दा तो माझी तितकीच काळजी घेतो, प्रेम करतो.हेमी माझे खरंच भाग्य समजते की, मला त्याच्यासारखे प्रेम करणारा आणि सुखाची काळजी करणारा नवरा मिळाला आहे.

- निती

---

७. माझ्यासाठी निशाचर होतो. 

हे माझे वैयक्तिक मत आहे की, कोणत्याही नात्यात संवाद असणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा मी कोणा बरोबर असते तेव्हा मी कोणत्याही विषयावर बोलू शकते. बबऱ्याचदारात्री घरी आल्यानंतर माझा नवरा कितीही कंटाळलेला असला तरी जेवणानंतर माझ्या शेजारी बसून दिवसभरातील घडामोडींविषयी बोलतो. हा संवाद साधताना तो मला बोलायला प्रोत्साहन देत असतो.

बर्‍याचदा हा संभाषण माझ्या कामाबद्दल असते. तो मला नेहमी त्या कामामध्ये आणखी काय करायला हवे याविषयी सांगतो. काही वेळा हे संभाषण यासाठी असते की, तो मला पटवून देतो की, मी एक चांगली आई आहे,बाळाचे सुद्धा माझ्यावर किती प्रेम आहे हे सांगत असतो.

कधी-कधी हे संभाषण स्वप्नवत अशा पर्यटनस्थळांविषयी असते, जिथे आम्हाला जायचे आहे. तो कितीही त्रासलेला असला तरी तो तासन तास माझ्याशी या विषयांवर बोलत बसतो.

हे सर्व बघून मला माझे कॉलेजमधील नात्याची आठवण होते. त्यावेळी तुम्हाला एकमेकांचे खूप घट्ट मित्र होयचे असते आणि एकमेकांना वेळ द्यायचा असतो. असे राहिल्याने लग्नानंतर नात्यात येणारा तोच-तोच पणा नाहीसा होतो

-अश्विनी

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon