Link copied!
Sign in / Sign up
46
Shares

तुमच्यातल्या या क्षमतांची जाणीव तुम्हांला लग्नानंतर होईल

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यतील महत्वाचे वळण असते. मग हा प्रेम विवाह असू द्या किंवा ठरवून केलेला विवाह. मुलगी सासरी जाणार असेल किंवा दोघे वेगळा संसार थाटणार असाल. लग्नानंतर दोघांचे आयुष्य थोड्या-फार प्रमाणात बदलते. आणि हे बदल तुम्हांला लग्नानंतरच कळतात.

१. लग्न आणि तडजोड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

    अनेकांना वाटते कि,नात्यांमध्ये तडजोडी करण्याने ते मजबूत होण्याऐवजी तुटण्याची शक्यता जास्त असते पण सत्य काही वेगळेच आहे, पती-पत्नी दोघांकडून केली गेलेली थोडी- फार तडजोड हे तुमच्या नात्यासाठी पोषक असते आणि तुम्ही तुमच्या नात्याचा किती आदर करता याचे द्योतक म्हणजे या तडजोडी असतात. तुमच्या स्वतःच्या सुखाला नक्की प्राथमिकता द्या पण इतरांची कजोडीदाराच्या सुखाचा देखील विचार करा . वैवाहिक नाते जपत असतांना फक्त तुम्हालाच तडजोडी कराव्या लागत आहेत का हे ही तपासून घ्या. आणि जर असे असेल तर जोडीदाराशी बोलून यावर तोडगा काढा.

२.नव्या जबाबदाऱ्या

लग्नानंतर तुम्ही नवीन घरात प्रवेश करताच नव्या जबाबदाऱ्या तुमच्या समोर उभ्या ठाकतात.सासू-सासऱ्यांसोबत जुळवून घेणे नव्या नवरीसाठी सोपे नसते कारण बहुतेक सासू -सासरे समजूतदार असले तरीही सर्व जण असे नसतात आणि यामुळे तुम्हाला बऱ्याच समस्याचा सामना करावा लागतो. तसेच तुम्ही दोघंच जर नवीन संसार थाटणार असाल तर त्यामध्ये येणाऱ्या जबाबदाऱ्या देखील खूप असतात.

३. अनुरूपता परिपूर्ण नात्याचा पाया असतो

एखादी व्यक्ती सुंदर आहे किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे म्हणून तिच्या /त्याच्या शी लग्न करू नका.परस्पर विश्वास आणि अनुरूपता नसलेले नात्यातला जिवंतपणा हरवून जातो .सर्व अडथळयांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी हवे असणाऱ्या ऑक्सिजन चे काम विश्वास आणि अनुरूपता करतात.

४. तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करु शकता

लग्न होण्याआधी तुम्हाला घरगुती कामात क्वचितच लक्ष घालावे लागते कारण रोजच्या जेवणाचा मेनू ठरवण्यापासून ते कपडे सर्वच गोष्टींची अगदी नीट काळजी घेण्यासाठी आई हजर असते. लग्नानंतर हे समीकरण वेगाने बदलते विशेषतः सासू-सासरे तुमच्या सोबत राहत नसतील तर!घर व्यवस्थित संभाळण्यापासून ते व्यावसायिक जबाबदाऱ्या दोघांनाच पार पाडाव्या लागतात ,तुमच्या लक्षात ही येणार नाही तुम्ही कधी एकाच वेळी अनेक कामे कुशलतेने करू लागला आहात.

५. भांडणे आणि वाद वैवाहिक आयुष्याचा अविभाज्य भाग असतो

जेव्हा दोन भिन्न व्यक्ति एकत्र येतात तेव्हा भिन्न मत आणि दृष्टिकोन असणे साहजिक आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हि छोटी-छोटी भांडणे आणि वाद जोडप्याना अजून जवळ आणतात. तुम्ही परिस्थिती कशी हाताळता हे जास्त महत्वाचे असते. भांडण जास्त ताणणे तुमच्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुमच्या दोघांत काही समस्या असल्यास जोडीदारासोबत चर्चा करा आणि यातून मार्ग काढा. तुमच्या भांडणात तिसऱ्या व्यक्तीला सामिल करू नका अगदी तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या आई-वडील आणि भावंडानाही! याचे परिणाम चांगल्यापेक्षा नक्कीच जास्त वाईट ठरू शकतात.

६. कोणतीही व्यक्ती जन्मतः परिपूर्ण नसते

आपल्या सर्वांत उणिवा आणि दोष असतात, अगदी तुमच्या जोडीदारात हि . या गोष्टींची वाच्यता तुमच्या मित्रपरिवारात ,नातलगात किंवा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीसमोर करण्याची चूक कधीही करू नका कदाचित नकळत पणे किंवा मस्करीत तुम्ही असे केले असेलही पण लक्षात ठेवा,तुमच्या जोडीदारासाठी हे अपमानास्पद आणि अवघडलेपणाचे असू शकते.

या  सगळ्या गोष्टी असल्या तरी हे नाते खुप सुंदर असते. एकमेकांच्या साथीने एकमेकांना समजून घेत,काळजी घेत हे नाते फुलवायचे असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon