Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

या गोष्टी तुमच्या गरोदर होण्यास अडथळा तर ठरत नाही ना ?


गरोदर होणे आणि मुल जन्माला येणे या गोष्टी टिव्ही सिरीयल मध्ये दाखवतात तश्या किंवा सिनेमात दाखवतात तास सोप्पं आणि सहज नसते. तसेच आजकालचे बदलेले राहणीमान याचा देखील या गोष्टींवर याचा परिणाम होतो. काही जोडप्यांसाठी ही गोष्ट स्वप्नवत असते. गरोदर राहणे हे जोडप्यांच्या आरोग्यावर मुख्यतः अवलंबून असते. तसेच गर्भारपण हे जोडप्याच्या रोजच्या काही सवयींवर देखील अवलंबुन असते. आपण अश्या काही सवयी पाहणारा आहोत ज्या गरोदर राहण्यास अडथळा ठरू शकतात आणि त्या बदलणे आवश्यक असते. 

१. पिण्याचे पाणी 

विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण ही  गोष्ट खरी आहे रोजच्या पिण्याचे पाणी हे जर प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा इतर कोणत्याही कमी प्रतीच्या प्लॅस्टिकच्या भांड्यात साठवले तर प्लॅस्टिकचे काही घटक जसे बीपीए हे पुरुषांच्या स्पर्म काऊंट वर म्हणजेच शुक्राणूंवर परिणाम करते. तसेच स्त्रीबीजावरदेखील याचा वाईट परिणाम होतो. 

२.  रोजच्या वापरातील स्वच्छतेच्या गोष्टी किंवा प्रसाधने 

केमिकलयुक्त टूथपेस्ट, शॅम्पू  लोशन्स,क्रीम, परफ्युम या गोष्टी देखील गरोदर होण्यावर परिणाम करतात. त्या केमिकलयुक्त टूथपेस्ट व्यवस्थित न धुतल्यामुळे पोटात जाणारे तसेच  काही परफ्युमचे सुगंध देखील आरोग्यास घातक  ठरू शकतात. त्यामुळे  नैसर्गिक घटक असलेले प्रॉडक्टचा वापरावर भर द्यावा. 

३. नॉनस्टिक भांडी 

प्रत्येक घरात नॉनस्टिक भांडी असतातच कारण ती वापरायला आणि  त्याची स्वच्छता करायला इतर भांड्यापेक्षा सोप्पी असतात. परंतु नॉनस्टिक भांडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल किंवा घटक हे पुरुषांमधील शुक्राणूंवर वर घातक  परिणाम करतात. तसेच नॉनस्टिक भांड्यांचा वापर हा गरोदर असताना देखील घातक ठरू शकतो. तसेच नॉनस्टिक भांड्यांचा वापर हा स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर देखील घातक परिणाम करते आणि त्यामुळे गरोदर होण्यास वेळ लागतो. तसेच सामान्य व्यक्तीच्या आरोग्यावर देखील नॉनस्टिक भांड्याचा घातक  परिणाम होण्याची शक्यता असते. 

४. लॅपटॉपचा वापर 

विशेषतः पुरुषांसाठी  लॅपटॉपचा सततचा वापर आणि वापरताना लॅपटॉप मांडीवर ठेवल्यास अतिरिक्त उष्णता वाढवतो त्यामुळे शुक्राणूंचा ह्रास होतो. आणि पुरुषांचा स्पर्म काऊंट कमी होतो. 

५. केमिकलयुक्त पदार्थ घरच्या स्वच्छतेसाठी वापराणे 

घरगुती स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे घटक जसे फारशी पुसण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, बाथरूम टॉयलेटची स्वच्छता करताना वापरण्यात येणारे केमिकल्स याचा वाईट परिणाम देखील आरोग्यावर होतो. तसेच गरोदर राहण्यावर देखील परिणाम होतो.

६. अति गरम पाण्याने अंघोळ करणे 

अति गरम पाण्याने दररोज अंघोळ केल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon