Link copied!
Sign in / Sign up
30
Shares

या गोष्टी फ्रिजमध्ये ठेऊ नयेत.

 १. कांदा

आपण कोणतंही अन्नपदार्थ, भाज्या फळे ही खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ढकलत असतो. परंतु काही गोष्टी थेट फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे किंवा कोणत्याही पद्धतीने फ्रिज मध्ये ठेवल्याने खराब होतात किंवा त्यातील पोषणमूल्ये कमी होतात. अश्या गोष्टी कोणत्या आणि त्या का फ्रिजमध्ये ठेवू नये हे आपण पाहणार आहोत.

 

कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील ओल्याव्यामुळे ते लवकर खराब होतात. कांदे आणि बटाटे हे नेहमी अंधा-या आणि थंड जागेव ठेवावे. कांदा बटाटा एका ठिकाणी ठेवला तरी एकत्र ठेवू नये कारण बटाट्यामधील गॅसमुळे कांदा खराब होण्याची शक्यता असते

२. बटाटा 

बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याच्यातील स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होते. यामुळे बटाट्याच्या चवीवर परिणाम होतो. बटाटे उन्हापासूनही लांब ठेवायला हवेत. घरातील कोणत्याही थंड ठिकाणी ठेवावे. उघडे ठेवावे.

३. ब्रेड

ब्रेड हे 2-3 दिवसाच्या आत संपवून टाकावी. ब्रेड हे फ्रिजमध्ये ठेवल्याने सुकून जाता.

४. लिंबू

लिंबू आणि संत्री हे सिट्रीक अॅसिड असणारे फळं आहेत. हे जास्त काळ थंड्या ठिकाणी चांगलं राहू शकत नाही. फ्रिजमध्ये ठेवल्याने यांच्यातील रस आटून जातो आणि ती काळी पडतात. आणिफ्रिज मध्ये ठेवायचे असल्यास एखाद्या डब्ब्यात घालून ठेवावे.

५. सफरचंद

सफरचंद हे योग्य पध्दतीने ठेवले नाही तर लवकर खराब होऊ शकता. हे फळ फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास कागदात गुंडाळून भाज्या ठेवण्यासाठी असलेल्या खालच्या भागातच ठेवावे. बिया असणारे फळही फ्रिजमध्ये ठेऊ नये.

६. केळी

केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर काळी पडते. केळीच्या देठातून इथाईलीन नावाचा गॅस बाहेर पडत असतो. जो फ्रिजमधील इतर गोष्टीही खराब करू शकतो. यापासुन वाचण्यासाठी तुम्ही केळीच्या देठावर प्लास्टिक लावू शकता.

७. काकडी

काकडी २ ते ३दिवसापेक्षा जास्त फ्रिजमध्ये टिकू शकत नाही. ती वळून जाते. आणि त्यातील पोषणमूल्ये निघून जातात.

८.टोमॅटो

खरे तर टोमॅटो हे भाजी नाही तर फळ आहे.जास्तीत जास्त लोक टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवण्याची चुकी करता. हे उन्हामुळे वाढणार फळ आहे. टोमॅटोला पाणी आणि सामान्य तापमानाची गरज असते. गार वातावरण असेल तर टोमॅटोचे उत्पन्न होत नाही त्यामुळे टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यास मऊ पडून खराब होण्याची शक्यता जास्त असते. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon