Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

या १० गोष्टी दर्शवतात की तुमचे पालकत्व कसे मजेदार असणारा आहे

पालकांचे आयुष्य हे  एखादी व्यक्ती विचार करते त्यापेक्षा मजेदार असते. लहान मुले अश्या मजेदार गोष्टी करत असतात ज्याचा तुम्ही विचार देखील करत नाही. ऐनवेळी सगळ्यांसमोर कसं काहीतरी विचित्र निरागसपणे  बोलतील याचा नेम नसतो. क्षणांत हसतील क्षणात रडतील..काहीही मजेदार प्रश्न विचारतील आम्ही अश्या काही १० गोष्टी सांगणार आहोत, ज्यावरून तुम्हांला  नक्कीच अंदाज येईल तुम्ही विचार केला होता त्यापेक्षा तुमचं  पालक  झाल्यानंतरच आयुष्य कसं अनपेक्षित गोष्टींचं आणि मजेदार असणार आहे. 

१. लहान मुलांचे महत्वाचे आणि मजेदार प्रश्न 

सुरवातीला लहान मुलांना प्रत्येक गोष्टींचे खूप कुतूहल असते. हे असे का, ते तसे का नाही मग असं केलं  तर काय होईल आणि नाही केलं तर काय होईल. अश्या प्रश्नांना उत्तर देणे म्हणजे तुमच्या पुढेच मोठा प्रश्न असतो. कधी-कधी असे काही प्रश्न विचारतात कि त्याची उत्तरं  आपण कशी द्यावी किंवा काय द्यावी हे कळतंच नाही कधी-कधी हे बदमाश  पाहुण्यांसमोर असे प्रश्न विचारतात कि  आपण निरुत्तर होतो.

२. त्यांची त्रासदायक प्रमाणिक उत्तरे 

Image source: Reddit

जर तुम्ही त्यांना एखाद्या गोष्टीबाबत काही मत विचारलं, जसं  मी कशी दिसत आहे  किंवा खाऊ कसा झाला आहे तर ते प्रामाणिकपणे  तू घाणेरडी किंवा घाणेरडा दिसतोयस /दिसते असं सांगून मोकळे होतात किंवा मला खाऊ  अजिबात नाही आवडला असं आई-बाबांना  काय कोणालाच सांगायला मुले घाबरत नाही. ते कधी-कधी काही गोष्टींची उत्तरे घरातल्यांना किंवा पाहुण्यांना पण अशी देतात जी कोणीच देण्याची हिंमत केलेली नसते. अशी ती नको त्यावेळी अति प्रामाणिक होतात. 

३. नजर हटी दुर्घटना घटी...

 

Image source: Reddit

हे वाक्य आपण रस्त्याने प्रवास करताना नेहमी वाचत असतो.. पण लहान मुल  घरात असताना हे वाक्य कायम लक्षात ठेवणे अवश्यक असते. कारण जरा का तुमचं तुमच्या मुलांकडे  दुर्लक्ष झाले तर तर ते काय गोंधळ घालून ठेवतील याचा काही नेम नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. 

४.बऱ्याचदा तुम्हांला ते या अवस्थेत सापडतील 

Image source: bored panda

कोणी काही सांगू शकत नाही कधी काय घडेल. मुलं  इतकी निरागस पण उठाठेवी करणारी असतात ना त्यांना करावंसं वाटलं म्हणून ते काहीही करू शकतात. 

५. मुलं घरात आल्यावर कोणती गोष्ट गुपित राहू शकत नाही.

Image source: Reddit

जर तुम्ही कोणती गोष्ट गुपित ठेवायचा प्रयन्त करत असाल तर लहान मुले नको त्यावेळी ही गुपितं उघड करत असतात. त्यामुळे त्यांच्या पासून कोणतीही गोष्ट लपवताना तुम्हांला काळजी घ्यावी लागते किंवा त्यांच्या समोर काही गोष्टी टाळणेच योग्य असतात. 

६. बाबा त्यांच्यासाठी बाहुली किंवा सुपरमॅन असतात 

ज्यावेळी मुले बाबांबरोबर एकटीच असतात त्यावेळी  ते आईच्या मेकअप किट मधल्या गोष्टी काढून बाबांना छान बाहुली बनवतात तरी कधी पॅन्टवर चड्डी घालून पाठीला टॉवेल बांधून सुपरमॅन  बनवतात. ते इतके उपद्व्याप करत असतात की  झोपले असले तरी त्यांचा मेकअप चालेले असतो 

७. ते इतके निरागस आणि प्रेमळ असतात ना....

Image source: Pinterest

मुलांच्या मानत एवढे प्रेम साठे आणि ते एवढे निरागस असतात ना आता वरच्याच फोटो मध्ये बघा ती मुलगी किती  निरागस आहे कि मासा पाण्यात बुडू नये म्हणू तिने त्या माश्याला बाहेर काढले. 

८. ज्यावेळी त्यांना भूक लागते.किंवा त्यांचा आवडता पदार्थ केलेला असतो 

Image source: Imgur

ज्यावेळी मुलांना भूक लागते किंवा त्यांचा आवडत पदार्थ बनवलेला असतो त्यावेळी ते ते मिळवण्यासाठी वाटेल ते करतात त्यांना कसलीच भीती नसते 

९. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये रडणे 

Image source: Parents Magazine

लहान मुलांना कोणत्या गोष्टींचा राग येईल आणि कोणत्या गोष्टींचं वाईट वाटले हे सांगता येणे काठीण  आहे आई -बाबांशी  बोलत असेल आणि मुलांकडे लक्ष देत नासेलत तरी त्यांना रडायला येऊ शकते 

१०. निरागसपणे गोष्टींचं  अनुकरण करतात

 प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकत असतात आणि त्याचे अनुकरण करायचा प्रयत्न करत असतात. जसं या मुलीने टीव्हीवर एका कार्टूनला अश्याप्रकारे खिडकी स्वच्छ करताना पहिले आणि आणि तिने देखील खिडकी स्वच्छ करायला  सुरवात केली.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon