Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

या घरगुती उपायांनी डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवा.

सध्याच्या जीवन पद्धतीमुळे तसेच कामाचा ताण, अपुरी झोप किंवा वेळी-यावेळी झोप आणि जागरणे तसेच सतत लॅपटॉप वर काम करणे, सतत फोन मध्ये बघणे. संतुलित आहार न घेणे अश्या विविध कारणांनी डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. या साठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.त्याच बरोबर वेळच्या-वेळी झोपणे आवश्यक तेवढा वेळ लॅपटॉप आणि मोबाईल फोनचा वापर संतुलित आहार आणि ताण काम करणे या गोष्टी कराव्यात 

१. काकडी आणि बटाट्याच्या चकत्या 

काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.

२. चंदन आणि जायफळाची पेस्ट 

रात्री झोपताना चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

३. टोमॅटो आणि लिंबाचा रस

 

टोमॅटो आणि डोळ्यांच्या खाली लावून तो  चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात.

४. बदामाचे तेल 

बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा.

५. पुदीन्याचा रस

पुदिन्याचा रस लावल्याने देखील काळी वर्तुळे कमी होतात.

६. टी बॅग्ज 

साध्या थंड टी बॅग्ज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी बॅग्ज वापरू नका.

७. गुलाबपाणी 

डोळे बंद करून गुलाबपाण्यात कापसाचे बोळे बुडवून ते बोळे डोळ्यांवर काही वेळ ठेवून डोळे मिटून पडून राहावे डोळ्यांना बरे वाटते आणि काली वर्तुळे कमी होण्यास मदत होते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon