Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

या चार गोष्टी गर्भधारणेवर परिणाम करतात.

प्रत्येक स्त्रीच्या शरीराची रचना वेगळी असते आणि प्रत्येक स्त्री ही नैसर्गिकरित्या गर्भधारणेसाठी वेगळा वेळा घेतात. ज्या जोडप्यांना अपत्य प्राप्तीस काही समस्या निर्माण होत असतात. त्यांची देखील कारणे वेग-वेगळी असतात. पुढील काही गोष्टी गर्भधारणेवर खूप परिणाम करतात. त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. तुमचं वय

हे असे काहीतरी आहे जे आपण खरोखर नियंत्रित करू शकत नाही, परंतु निश्चितपणे आपल्या गर्भधारणेच्या शक्यतांवर याचा प्रचंड प्रभाव आहे. वयाचा स्त्री बीजांची संख्या आणि आणि त्याच्या गुणवत्तेवर प्रभाव असतो. जसे वय वाढते तसतसे ही गुणवत्ता आणि संख्या कमी होते.गर्भधारणेसाठी स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात उत्तम काळ म्हणजे. वयाचे २० ते ३० वर्षे. वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रजनन क्षमता कमी होण्यास सुरुवात होते, आणि 35 वर्षानंतर प्रजनन क्षमता फारच कमी होते.

२. समागमाचे प्रमाण

तुम्हांला या गोष्टीबाबत आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे, परंतु गरोदर राहण्यासाठी तुम्हांला नियमित समागम करण्याची गरज आहे. आठवड्यतून २ ते ३ वेळा समागम करा. मासिकपाळी नंतर ओव्हुलेशनच्या दिवसांमध्ये, निश्चितपणे समागम करणे गरजेचं आहे . यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता नक्कीच वाढेल. 

३. आरोग्य आणि जीवनशैली

जास्त वजन किंवा कमी वजन असणे आपल्या हे गर्भधारणेवर परिणाम करू शकते. ते आपल्या हार्मोन्सला प्रभावित करतात. आणि म्हणूनच याचा स्त्रीबिजांचा देखील परिणाम होतो. नियमितपणे व्यायाम आणि वेळेवर संतुलित आहार आणि पुरेशी झोप या साध्या दिनक्रमामुळे आपल्या प्रजननक्षमतेत सुधारणा होऊ शकते.

गर्भधारणा होण्यासाठी धुम्रपान,मद्यपान या सारखी आणि इतर व्यसने टाळणे आवश्यक आहे. मद्यपानामुळे स्त्रीबीज आपल्या तग धरण्याची क्षमता गमावतात आणि ही गोष्ट केवळ महिलांनाच मर्यादित नाही, धुम्रपान आणि मद्यपानामुळं पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर देखील वाईट परिणाम होतो. 

४. प्रजनन क्षमता समस्या

जर एखादे जोडपे बराच काळ प्रयन्त करून देखील त्यांना अपत्यप्राप्ती होत नसेल तर, कदाचित त्यांच्या मध्ये काही प्रजनन क्षमतेविषयी काही समस्या असण्याची शक्यता असते. कदाचित पुरुषाचा स्पर्म काऊंट किंवा त्याची गुणवत्ता बाबत काही समस्या असू शकते. किंवा स्त्रियांमध्ये पीसीओसी सारखी समस्या असण्याची शक्यता असते. जर तुमचे वय ३५ पेक्षा कमी असेल आणि ६ महिन्यापेक्षा जास्त वेळ कोणत्याही निरोधा शिवाय प्रयन्त करून देखील गर्भधारणा होत नसेल,तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon