Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

या आठ वर्षांच्या मुलीने प्रसूतीमध्ये आईला मदत केली!

आठ वर्षांची ब्रुक ही तेव्हा अवघ्या तीनच वर्षांची होती; जेव्हा तिच्या आईचा पहिला गर्भपात झाला होता. ती तिच्या नव्या भावंडाची आतुरतेने वाट पाहत होती आणि जेव्हा तिला कळाले की, तिची त्या भावंडासह भेटच होणार नाही; तेव्हा तिच्या दुःखाला पारावार राहिला नाही. तिला रडू कोसळले; कारण तिच्याकडे हे का झाले, या प्रश्नाचे उत्तरच नव्हते! तिची आई केल्सी हिने 'देवाने ते बाळ त्याच्याजवळच राहू द्यायचे ठरवले आहे; कारण ते बाळ हे त्याच्यासाठी खूपच अमूल्य आहे आणि तो ते पृथ्वीवर पाठवणार नाही' असे म्हणून तिचे सांत्वन केले.

जरी तिच्या आईच्या शब्दांनी तिला आधार मिळाला असला; तरी केल्सीला त्या २०१४ च्या गर्भपातानंतर आणखी दोन गर्भपातांचा सामना करावा लागला. तिने २०१६ च्या अखेरीस एका मुलीला जन्म दिला; ज्यामुळे ब्रुकला आभाळ ठेंगणे झाले होते. त्यावेळी ब्रुकने ठरवले होते की, या प्रसूतीवेळी ती तिच्या आईच्या बाजूलाच असेल. मग तिची बहीण जेव्हा जन्माला येईल, तेव्हा तिची नाळ ब्रुककडूनच कापली जाईल; अशी व्यवस्था केली गेली. जेव्हा तिच्या वडिलांनी ही कल्पना सुचवली; तेव्हा ब्रुकने उत्साहाने आपला होकार दर्शवला आणि मग डॉक्टरांनाही याची कल्पना दिली गेली.

केल्सीला अजुनही तो प्रसंग लख्खपणे आठवतो! ती म्हणते,"हे करण्यासाठी तयारी दर्शवल्याबद्दल सुईणी आणि परिचारिका तेव्हा ब्रुकच्या धाडसाची वारंवार प्रशंसा करीत होत्या. मी दोनदा अतिशय जोर लावला आणि बाळाचे डोके बाहेर आले. ब्रुक तिच्या वडिलांसोबत आपल्या नवीन बहिणीला पकडण्यासाठी तयार झाली. आणि डोके बाहेर येण्याच्या जवळपास एका मिनिटाच्या आत बाळाचे नाजूक शरीर बाहेर आले. ब्रुकचा आनंद गगनात मावेनासा झाला."

आपल्या लहान बहिणीला पाहताच ब्रुकला आनंदातिशयाने रडू कोसळले. हा तिच्यासाठी खरोखर एक अर्थपूर्ण आणि भावनिक अनुभव होता. त्यांनी त्या बाळाचे नाव 'समर' ठेवले. जेव्हा केल्सीने समरवरून आपली नजर वर केली; तेव्हा तिला ब्रुकची नजर आपल्या बहिणीवरच खिळलेली दिसली. "ती छान आहे ना?" असे विचारले असता, ती आईकडे जाताना अडखळली आणि म्हणाली,"होय, ती खूपच परिपूर्ण आहे!"

जग ह्या बातमीने आश्चर्यचकित झाले आहे! परिवारांना अशाप्रकारे एकत्र येणे आणि एकमेकांशी बांधले गेलेले पाहणे नेहमीच आनंदपूर्ण असते, नव्हे का?

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon