Link copied!
Sign in / Sign up
37
Shares

हिरोईन अशा प्रकारे वजन कमी करतात....

 


           या अभिनेत्रीने आपल्या गरोदरपणात वाढलेले वजन कश्याकप्रकारे कमी केले याची त्यांनी सांगितलेली गुपिते आपण जाणून घेणारा आहोत.

      १. ऐश्वर्या राय -बच्चन

या अभिनेत्रींना गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी इतर सिनेतारकांपेक्षा जास्त वेळ घेतला. तिने आपले बाळंतपणा छान पद्धतीने अनुभवले. प्रसूतीच्या काही महिन्या नंतर तिने आपल्या वजनात आणि शरीरयष्टीत असा काही बदल केला आणि आपल्या चाहत्यांना थक्क केले. त्यानंतर तिने आपल्या बदलाचे गुपित सगळ्यांना सांगितले. तिने वजन कमी करण्यासाठी फॅट फ्री डाएट केला. यामध्ये तिने तिच्या आहारात उकडलेल्या भाज्या, ब्राऊन राईस, आणि ताज्या फळांचा समावेश केला. तसेच तिने आपल्या दिवसाची सुरवात गरम पाणी लिंबचा रस आणि मध या पेयांनी केली. ज्यामुळे तिची पचनशक्ती सुधारण्यात तीला मदत झाल्याचे तिने सांगितले.

२. करीना कपूर

या अभिनेत्रीने वजन कमी कारण्याबाबत सकारत्मक विचारचा तिला खुप उपयोग झाल्याचे तिने सांगितले तसेच तिला वजन कमी कारण्याबाबत काही घाई नव्हती असे तिने सांगितले. तीचे मैत्रिणी बरोबर आणि जिमला जातानाचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. तिने व्यायामावर , चालण्यावर आणि संतुलित आहारावर भर देऊन आपले गरोदरपणात वाढलेले वजन कमी केले.

३. शिल्पा शेट्टी

ही अभिनेत्री ग्रोदार असताना आणि त्या आधी आणि त्यानंतर नेहमीच आपल्या शरीरयष्टीची काळजी घेताना दिसून आली आहे. शिल्पा आपल्या गरोदरपणात वाढलेले वजन कमी कसे केले हे गुपित सांगताना तिने सांगितले की तिने तिच्या आहारामध्ये तिने आपल्या आहारातून जंक फूड एकदम हद्दपार केले. तसेच आपल्या आहारात प्रथिनांचा संतुलित प्रमाणात सेवन करत मर्यादित कर्बोदकांमधे आणि फळे आणि भाज्या यांचा समावेश केला होता.तिने २१ किलो वजन साडे तीन महिन्यात कमी केले. तसेच तिने आपल्या दिनचर्येत योगा वर देखील भर दिला.

४. काजोल

दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर काजोलने स्वतःला पुन्हा पूर्वी सारखे दिसायचे असा निर्धार केला. तिने व्यायाम प्रशिक्षकांच्या मदतीने आपल्या शरीरातील अतिरिक्त मेद (फॅट) कमी करण्यावर भर दिला. तिने व्यायामा बरोबरच योगावर भर दिला.तसेच आहारबाबत देखील ती खूप काटकोर होती. तिने आपल्या आहारात अंडी,पनीर,मासे आणि चरबी नसलेले चिकन, यांचा समावेश केला. या सगळ्यांच्या आधारे तिने तिचे १८ किलो वजन ५ महिन्यात कमी केले.

५. लारा दत्ता

या अभिनेत्रीने आपले गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्याकरता खूप काटेकोरपणे सगळ्या गोष्टीचा अवलंब केला. आठवयातले ५ दिवस व्यायाम,आहारात कच्ची फळे, फळांचे रस, ऑम्लेट यांचा समावेश केला तिने या काळात कॉफी संपूर्णरीत्या बंद केली. तिची गरोदरपण सुखकर जावे याकरता असणाऱ्या आसनाची एक डीव्हीडी देखील आहे जयंत तिने सगळ्या आसनाचे प्रात्येक्षिक दाखवले आहे.

७. मलायका अरोरा-खान

दोन मुलांची आई असणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या दिनचर्येत ५ आहाराचा समावेश केला ज्यामध्ये तिने फक्त पौष्टिक पदार्थाचा समावेश केला. तसेच २० मिनिटाचे व्यायाम प्रकार तसेच किक बॉक्सिंगआणि कधी-कधी स्विमिंग ला जाणे या गोष्टींचा समावेश केला .

तुम्ही आई झाल्यानंतर वजन कमी करण्याचा प्रयन्त करत असाल तर वरील तारका असून त्यांनी केलेली मेहनत नक्कीच प्रोहत्साहित करेल. आणि तुमचे वजन कमी होण्यास वेळ लागत असेल तरी.,काही वाईट वाटून घेऊ नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आई होणं ही खुप सुंदर अनुभव असतो. म्हणून या अनुभवाचा आनंद घ्या. आणि डॉक्टरच्या सल्यानुसार वजन कमी करण्याचा मार्ग निवडा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon