Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

जाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते ? त्याबाबत सर्व काही

गर्भाच्या योग्य विकासासाठी त्याने ९महिने ९ दिवस आईच्या पोटात राहणं सुरक्षित आणि फायद्याचे असते. पण काही बाळं हि नियोजित वेळेच्या आधी जन्माला येतात, अश्या बाळांना प्रिमॅच्युअर बाळ किंवा अपुऱ्या दिवसाचे बाळ म्हणतात.

साधारणतः बाळाची वाढ होण्याचा जो एक कालावधी मानण्यात आल आहे, तो कालावधी पूर्ण होण्याच्या आत म्हणजेच निर्धारित वेळच्या आधी ज्या बाळांचा जन्म होतो त्या बाळाला अपुऱ्या दिवसाचे किंवा प्रिमॅच्युअर बेबी असे म्हणतात.

बाळाची संपूर्ण वाढ ही २८० दिवसात होते असे वैद्यकीय शास्त्रानुसार मानण्यात आले आहे. स्त्रीचे मासिकपाळी ज्यावेळी चुकते. त्या आधीचे २८ किंवा ३० दिवस आणि त्यानंतर २५० दिवस म्हणजेच ९ महिने हा बाळाची संपूर्णतः वाढ होण्याचा कालावधी मानण्यात आला आहे. सुरवातीचे तीन महिने हे जोखमीचे असतात. या तीन महिन्यामध्ये गरीब रुजणे आणि गर्भाच्या महत्वाच्या अवयवाची निर्मिती होत असते. यानुसार प्रिमॅच्युअर बाळाच्या जन्माबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

१. प्रिमॅच्युअर बाळ जन्माला येणाऱ्या प्रसुतीचे प्रकार

२. बाळ बाळ प्रिमॅच्युर जन्माला येण्याची कारणे

३. बाळ बाळ प्रिमॅच्युर जन्माला येण्याची साधारण लक्षणे

४. प्रिमॅच्युअर बाळाची काळजी

या प्रकारच्या प्रसुतीचे देखील ३ प्रकार आहेत

१. एक्सट्रीमली प्रिटर्म -२८ आठवड्याच्या आधी प्रसूती झाल्यास

२. व्हेरी प्रिटर्म -२८ते ३२ आठवडे प्रसूती झाल्यास

३. मॉडरेट ते लेट प्री टर्म ३२ ते आठवड्याच्या दरम्यान प्रसूती झाल्यास

बाळ प्रिमॅच्युर जन्माला येण्याची कारणे

बाळ प्रिमॅच्युर जन्माला येण्याची विशिष्ठ आणि खात्रीशीर अशी कोणती करणे सांगता येणे काठीण आहे परंतु पुढील काही परिस्थिती आणि आईला असणाऱ्या समस्या या अश्या प्रकारे बाळाचा जन्म होण्यास कारणीभूत ठरू शकतात

१. आईला मधुमेह असल्यास

२. आईला हृद्यासंबंधी काही समस्या असल्यास

३. आईला किडनीविषयक काही समस्या असल्यास

४. आईला रक्तदाबाविषयक काही समस्या असल्यास

तसेच गरोदरपणात खालील काही समस्या असल्यास बाळ बाळ प्रिमॅच्युर म्हणजेच मुदतपूर्व जन्मला येऊ शकते.

१. गरोदरपणात योग्य पोषणयुक्त आहार न घेणं

२. गरोदर होण्या अगोदर धूम्रपान करणे, नशा करणे किंवा त्यासारखी औषधे घेणे,दारू पिणे अश्या सवयी असल्यास किंवा गरोदरपणात या गोष्टी केल्यास.

३. कोणत्याही प्रकारचा संक्रमण जसे मूत्रमार्गातील संसर्ग,गर्भाशयसंदर्भात कोणतेही संक्रमण होणे

४. या आधीच्या गरोदरपणात बाळाचा जन्म मुदतपूर्व झाला असल्यास किंवा तसा काही कौटूंबिक इतिहास असल्यास

५.असामान्य गर्भाशय असल्यास किंवा गर्भाशयासंदर्भात काही गुंतागुंत असल्यास

६. गर्भाशयाचे मुख हे कमकुवत असल्यास

७. दोन गरोदरपणात कमीतकमी १८ महीन्यांपेक्षा कमी अंतर असल्यास कारण शरीराला विशेषत: गर्भाशयाला प्रसुती नंतर आरामाची गरज असते.त्या मुळे १८ महिन्यांच्या आधी पुन्हा गरोदर राहिल्यास प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका निर्माण होतो. जाणून घ्या

८. उशिरा गरोदर राहणे हे देखील या प्रकारच्या प्रसुतीचे एक कारण असतो. साधारणतः गरोदर होण्याचे योग्य वय २२ ते ३० असते. त्यामुळेकमी वयाच्या आणि ३० पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना प्रिमॅच्युअर प्रसूतीचा धोका असतो.

वरील काही सर्वसाधारण करणे मुदतपूर्व बाळ जन्माला येण्याची असू शकतात.

 

बाळ प्रिमॅच्युर जन्माला येण्याची लक्षणे

सर्वसाधारणपणे पुढील लक्षणे आढळल्यास बाळाचा जन्म नियोजित वेळे पूर्व होण्याची शक्यता असते.

१. दबाब

९ महिने पूर्ण होण्याआधीच ओटीपोट, जन्ममार्ग आणि गुदद्वार यावर प्रसूती जवळ आल्यावर वाढणारा दबाब जाणवत असल्यास.

२. रक्त आणि इतर स्त्राव

अंगावरून पांढरा आणि लालसर स्त्राव वाढल्यास आणि जन्ममार्गतून सतत स्त्राव होत असल्यास हे पाण्याची पिशवी फाटली असल्याचे लक्षण असू शकते म्हणजे प्रसूती जवळ आली किंवा गर्भाशयाच्या मुखाशी असणारा म्युकस प्लग सुटला असल्यास जो गर्भशयाचे मुख बंद ठेवतो.

३. वेदना

मासिकपाळी दरम्यान ओटीपोटात आणि कमरेमध्ये होणाऱ्या वेदना सतत होत असल्यास

४. आकुंचन

वेळेच्यापूर्वी प्रसुती होण्याचं एक लक्षण आकुंचन म्हणजे . सतत जाणवणारी आकुंचने, हि आकुंचन सतत होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नये

वरील लक्षणे ९ महिने पूर्ण व्हायच्या आधी जाणवल्या बाळाचा जन्म लवकर होण्याची शक्यता असते.. खात्रीशीर सांगता येत नाही त्यामुळे वरील लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क साधावा.

प्रिमॅच्युअर बाळाची काळजी

या बाळांना वाढवणे, हे सामान्यपणे जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत वेगळे असते. त्यांच्या पोषण, काळजी आणि सेवा यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते.

मुदतपूर्व प्रसूतीत जन्मलेल्या बाळांचं वजन हे पूर्ण वाढ होऊन जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत खूप कमी असतं. त्वचा अतिशय नाजूक असते. त्वचेखालील मेदांचे प्रमाण अतिशय कमी असल्याने त्यांचे शरीर किमान आवश्यक तपमान स्थिर ठेवण्यास असमर्थ असते. त्यांच्या अवयवसंस्था पूर्णपणे विकसीत झालेल्या नसल्याने जन्मल्याबरोबरच अश्या मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते म्हणूनच अशी बाळे जन्मल्यापासून त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची, बहुतेक वेळा अश्या बाळांना जन्मांनंतर लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (NICU) ठेवण्यात येते

१. कावीळ

या बाळांच्या मूत्रपिंड आणि यकृतचा विकास पूर्ण न झाल्याने त्याचे नीट चालत नाही त्यामुले रक्तात यकृताकडून स्रवल्या जाणार्‍या बिलिरुबीन या घटकाचे प्रमाण वाढल्यास बाळाला काविळ होवू शकते.

२. श्वसनाचे समस्या

अशा बाळांमध्ये फुफ्फुसांचा नीट न झाल्याची शक्यता असते त्यामुळे मुख्यतः श्वसनासंबंधीच्या समस्या आढळून येतात त्यामुळे त्यांची काळजी या गोष्टी महत्वाच्या असतात

३. स्तनपान

या काळात बाळाला स्तनपान करणे बहुतांश वेळा अशक्य होते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सहाय्याने बाळाला स्तनपान किंवा बाटलीने दूध पाजावे

४. वजन आणि तापमान

या बाळांचे वजन हे कमी असते तसेच त्यांना विशिष्ठ तापमानात ठेवण्याची आवश्यकता असते त्यामुळे हि देखील काळजी डॉक्टर सुरवातीच्या काही महिन्यात घेतात

अशी बाळे रडू लागल्यास काय कराल हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

वरील माहिती वाचून घाबरून जाण्यासारखे काही नाही सुरवातीच्या काही महिन्यात बाळाला योग्य उपचार चांगल्या वैद्यकीय सोयी आणि पालकांनी योग्य पद्धतीने लक्ष दिल्यास हे बाळ काही महिन्यात सामान्य बाळासारखे होते..परंतु सुरवातीची काही वर्षे त्याच्या आरोग्यवर योग्य लक्ष ठेवणे आवश्यक असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon