Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

हात का स्वछ धुवायला हवेत ?


तुम्हाला माहिती असेलच की, तुमचे हाथ प्रत्येक वेळी धुवायला हवे. पण ज्यावेळी तुमच्या घरात लहान बाळ असते तेव्हा ही खबरदारी घ्यायलाच हवी. कारण तुम्ही जर अचानकपणे शिळ्या जेवणाला हात लावला किंवा इतर घाण नसलेलं पण खूप बॅक्टरीया असलेल्या ठिकाणी हात लावल्यावर बाळाला खाऊ घातले किंवा त्याच हाताने त्याला तुम्ही भरवले तर बाळाला अतिसार होण्याची लक्षणे होतात. आणि इतरही समस्या येतात. म्हणून ह्या ब्लॉगमधून tinystep मराठी तुम्हाला सांगू इच्छिते की, बाळासाठी हात प्रत्येक वेळी धुणे का आवश्यक आहे.

१) ह्या ट्रिक साठी फक्त २० सेकंड्स लागत असतात.

भारत सरकारची जी रोग प्रतिबंधक संस्था आहे तिच्या म्हणण्यानुसार, तुम्ही तुमचे हात २० सेकंड्स पर्यंत चांगल्या साबणाने धुवायला हवे. त्याच्याने हातामधली सर्व पॅथॉजनिक बॅक्टरीया निघून जातील. नाहीतर तुम्हाला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात आणि बाळाची तब्येत बिघडू शकते. ह्या गोष्टीमुळे त्याला आळा बसून तुमचे व कुटुंबाचे आरोग्य निरोगी राहील. म्हणजे घरात कुणीच आजारी पडणार नाही.

२) पण ह्या २० सेकेंडच्या वेळात काय करायला हवे ?

* हाताच्या पुढच्या आणि मागच्या बाजूची चांगले घासून घ्या. आता दोन्ही हाताचा तळवा घेऊन एकमेकांना घासून स्वच्छ करा. आणि ह्या क्रिया करताना ५ सेकंड प्रत्येक क्रियेला द्या. आणि नखे आणि बोटे व्यवस्थित घासून पुसून घ्या. आणि नखे जर वाढली असतील तर त्यातली घाण काढून घ्या. आणि स्वच्छ करा.

३) साबण आणि हॅन्ड सॅनिटायझर ह्यामध्ये कोणते योग्य ?

ह्यात पहिली गोष्ट म्हणजे हॅन्ड सॅनिटायझर ची सवय खूप धोकादायक ठरते. कारण ह्यामुळे इम्युनिटी कमी होते. इतकेही स्वच्छ करण्याची सवय नको की, तुमची नॅचरल इम्युनिटी नष्ट होईल.

* गावाकडच्या व डोंगर - दऱ्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांची इम्युनिटी इतकी असते की, त्यांना हवा - पाण्याचा शहरी लोकांसारखा त्रास होत नाही.

तर ज्यावेळी तुम्ही घरी असणार त्या वेळी साबण च वापरा. कारण साबणाने हातही स्वच्छ होतो आणि सहज सोपे आहे.

आणि हॅन्ड सॅनिटायझर हे प्रवास करताना तुम्ही जरूर वापरा.

४) खूप सॉरी की, आता tinystep मराठी लोकांना हात कसे धुवावे हे सांगायला लागला. ह्याविषयी काहींना राग वाटू शकेल. पण हात धुणे हे निरोगी आणि स्वस्थ आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे विशेषतः ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांच्यासाठी. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon