Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

वॅक्सिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या.

    तुम्ही पार्लरमध्ये आणि विशेषतः घराच्या-घरी वॅक्सिंग करत असताना खालील गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते 

१. वॅक्सिंग घरच्या-घरी देखील करता येते,परंतु पहिल्यांदा वॅक्सिंग करताना पार्लर मध्ये करणे उत्तम  

२. काही खास करणा निमित्त पहिल्यांदा वॅक्सिंग करणारा असाल तर दोन दिवस आधीच वॅक्सिंग करावे कारण कदाचित पहिल्यांदा वॅक्सिंग करताना ऍलर्जीं किंवा पुरळ येण्याची शक्यता असते.

३. वॅक्सिंग करण्याअगोदर त्वचेवर बर्फ फिरवला तर त्वचा थोडी बधीर होते व त्यामुळे वेदना कमी होतात. 

४. घरात वॅक्सिंग करताना त्वचा, हातपाय स्वच्छ करा व मगच वॅक्सिंग करा. त्यामुळे जंतूसंसर्ग होणार नाही. 

५. वॅक्स केल्यावर कोमट पाण्यात ठेवले म्हणजे ते लगेच घट्ट होत नाही 

६. वॅक्सिंग झाल्यावर पुन्हा एकदा त्वचा कोमट पाण्याने सुती  कापडाने पुसून घ्या  व मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे. 

७. पायावर हातावर लावताना वॅक्स वरून खाली लावा व स्ट्रीप ओढताना केसाच्या वाढीच्या विरूद्ध बाजूने ओढा.

८. ओठावर अथवा हनुवटीवर वॅक्सिंग करताना काळजी घ्या, या भागाची त्वचा फार नाजूक असते तसेच वॅक्सिंग केलेली जागा कापसाने स्वच्छ पुसून कोरडी करावी.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon