Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

विविध समस्यांवर गुणकारी लवंग आणि लवंग तेल

       आपल्या स्वयंपाक घरात अनेक अश्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या अनेक आरोग्यविषयक समस्यांवर उपयुक्त असतात.असंच प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात आढळणारी लवंग आणि लवंग तेल हे विविध आरोग्यविषयक समस्यांवर उपयुक्त असते. ते कसे ते आपण पाहणार आहोत.

१. लवंग तेलामध्ये अँटीसेप्टिक गुण असतात. यामुळे जखम, ईजा, संसर्ग यामध्ये लवंग खुप उपयोगी असते. किडा चावल्यावरही याचा वापर केला जाऊ शकतो. हे जास्त सेन्सिटिव्ह स्किनवर लावू नये.

२. लवंगाच्या तेलामध्ये मीठ मिसळून कपाळावर लावल्याने गारवा मिळतो. खोब-याच्या तेलामध्ये लवंगाच्या तेलाचे 8-10 थेंब टाकून डोक्याची मालिश केल्याने डोकेदुखी दूर होते 

३. दाढ दुखत असल्यास लवंग तेलात कापसाचा बोळा बुडवून दाताखाली धरल्यास अराम पडतो. 

४. लवंगाच्या तेलाचा वापर खोकला, सर्दी, दमा, फुफ्फूसांवरील सूज या आजारांमध्ये फायदेशीर असतो. घश्यातील खवखव दूर करण्यासाठी लवंग चघळावी

५. लवंग तोंडात धरून त्याचा रस चोखल्यास खोकला बरा होतो.

६. लवंग तोंडात धरून त्याचा रस चोखाल्यास श्‍वासाची व तोंडाची दुर्गंधी येत नाही.

७. लवंगाचे तेल कपड्यावर टाकून त्याचा वास घेतल्यास सर्दी जाते. जर सर्दीमुळे नाक बंद झाले तर लवंगाच्या तेलाने तेही मोकळे होते.

८. लवंगाला पाण्यासोबत बारीक करून 100 ग्राम पाण्यात मिसळून त्यात साखर घालून प्यायल्यास हृदयात होणारी जळजळ दूर होते. पोटात होणारी जळन बंद होते.

९.  वात तसेच सांधेदुखीला लवंगाचे तेल खूप फायदेशीर आहे.

१०.  लवंगाच्या तेलाचे एक दोन थेंब बत्ताशेवर टाकून खाल्यास कॉलराच्या आजारावर आराम मिळतो

 लवंग आणि आणि लवंगाचे तेल अश्या अनेक प्रकारे गुणकारी असले तरी त्याचा वापर हा योग्य त्या प्रमाणातच करावा अन्यथा लवंग उष्ण पडू शकते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon