Link copied!
Sign in / Sign up
33
Shares

चविष्ट आणि आरोग्यास उपयुक्त अश्या कोशिंबिरी /रायता रेसिपी

आपल्याकडे केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कोशिंबिरी या त्या ज्या पद्धतीने करतात त्यामुळे त्या चविष्ट होतातच आणि त्या योग्य प्रमाणात खाल्यास त्या आरोग्यास देखील चांगल्या असतात.

१.  बिटाची कोशिंबीर

 

 

बीट कुकरला उकडून घ्या. सालं काढून बारीक चिरा किंवा जाडसर किसून घ्या. त्यात दही, जिरे पूड, थोडंसं तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. दही नको आल्यास लिंबू पिळू शकता पण दही घालून बीटाची कोशिंबीर चांगली लागते. 

२. गाजर-कांदा कोशिंबीर 

जाड किसणीनं गाजरं किसा. कांदा बारीक चिरा. साखर, मीठ, दाण्याचं कूट घाला. कोथिंबीर घाला. वरून हिंग, मोहरीची फोडणी द्या. कांदा आवडत नसल्यास नुसत्या गाजराची कोशिंबीर देखील चांगली लागते 

३. मुळ्याची आणि त्याच्या पानांची कोशिंबीर 

मुळा किसून घ्यावा  तसेच मुळ्याची कोवळी पानं बारीक चिरून घ्या. त्यात साखर, मीठ, दाण्याचं कूट, लिंबाचा रस घाला. वरून हिंग, मोहरीची फोडणी घालवी मुळा आणि त्याच्या पानांची एकत्रित कोशिंबीर करताना मुळा कमी घेतला तरी चालतो. तसेच या दोन्हीची वेगळी वेगळी कोशिंबीर देखील करता येते. मुळ्याची कोशिंबीर करताना दह्याचा वापर केल्यास चव चांगली लागते.

४. टोमॅटोची कोशिंबीर 

 टोमॅटोमधील बिया काढून टोमॅटो बारीक चिरून घ्या आणि त्यात अशी दाण्याचे कूट आणि वरून फोडणी घाला मीठ आणि साखर आयत्यावेळी घालावी नाहीतर टोमॅटोला पाणी सुटते.

५. कांद्याची कोशिंबीर 

कांदा बारीक चिरून घ्यावा त्यात तिखट-मीठ तेल आणि मसाला घालवे आणि वरतून तेल घालून मिक्स करून घ्यावे. 

भाजी नसल्यावर देखील या कोशिंबीर उपयोगी ठरतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon