Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

या डाळींचे आरोग्य विषयक फायदे तुम्हांला माहित आहेत का ?


रोजच्या जेवणात आपण तुरीच्या आणि मुगाच्या डाळीपेक्षा जास्त डाळींचा वापर होत नाही पण या इतर विविध डाळी आरोग्यविषयक फायदेशीर असतात. या डाळींमध्ये असणारे डाळीत प्रथिने शरीरातील स्नायूंना बळकटी देतात. डाळी या काही प्रमाणात पचायला जड मानण्यात येतात. परंतु योग्य प्रमाणातील या डाळींचे सेवन हे फायदेशीर ठरते

मूगडाळ

 

ही डाळ अगदी हलकी, आणि सर्वप्रकारच्या आजारात उत्तम आहार ठरते या डाळीतील घटकांद्वारे सेवनाने प शरीरात प्रथिने शोषली जातात. या डाळीत आढळणारे तंतुमय पदार्थ शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात. मूगडाळीतला ‘आयसोफ्लॅवॉन’ हा घटक ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकासारखा परिणाम देतो. त्यामुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या वेळी मूगडाळ उपयुक्त ठरते. ही डाळ प्रतिकारशक्तीसाठीही चांगली असते.

तूरडाळ

तूरडाळीत फॉलिक अ‍ॅसिड, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कोलिन हे घटक असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी ही डाळ पोषक मानण्यात येते. ही डाळ पचायला मध्यम असते. परंतु ती अति प्रमाणात खाल्ली गेल्यास पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.

मसूर डाळ
 मसूर डाळ आहारातील समावेश हा पोटविषयक आणि पचनविषयक समस्यांमध्ये उपयुक्त ठरते. पचनानंतर आतडय़ांची हालचालही वाढवते . ही डाळ सतत खाण्याची होणारी इच्छा कमी होते. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अ‍ॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. वजन कमी कारण्याकरत या डाळीचे सार,पाणी प्यावे.
हरभरा डाळ

या डाळीतील घटक हे विविध कारणांनी शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थापासून शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांचे रक्षण करायला मदत करतात. या डाळीचे सेवन कॅल्शियम हाडे, दात, नखे मजबूत करते. या डाळीत पोटॅशियम प्रमाण भरपूर असते. शरीरातील ‘होमोसिस्टेन’ या द्रव्याची पातळी योग्य राखण्यास या डाळीच्या सेवनाने उपयोग होतो. परंतु ही डाळ काही प्रमाणात ही डाळ काही प्रमाणात वातूळ मानण्यात येत त्यामुळे या डाळीचे सेवन योग्य प्रमाणात करणे आवश्यक असते.

उडीद डाळ

ही डाळ पचायला जड, पण पौष्टिक असते. त्यामुळे शरीराच्या पोषणासाठी ती चांगली. चमकदार, मऊ केसांसाठी उडीद डाळ आहारात घेतल्यामुळे फायदा होतो. लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तीसाठी उपयुक्त असते. कावीळ, डेंग्यू, मलेरिया किंवा यकृताच्या आजारांमधून पूर्ण बरे झाल्यानंतर यकृताचे कार्य सुधारण्यासाठी या डाळीचा आहारात समावेश . या डाळीतही पोटॅशियम चांगले आहे. ‘सी’ आणि ‘बी’ जीवनसत्त्वे, कॅल्शियम, जस्त आदी या डाळीतून प्राप्त होतात. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना  एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा  

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon