Link copied!
Sign in / Sign up
75
Shares

विविध प्रकारच्या (धातूच्या) भांड्यांची काळजी आणि स्वच्छता .

काचेची, चांदीची, स्टीलची तांब्याची नॉनस्टिक अश्या विविध प्रकारच्या भांड्यांची स्वच्छता ही काळजीपूर्वक केल्यास ही भांडी बराच काळ टिकतात आणि नव्यासारखी दिसतात. त्यामुळे या भांड्यांची स्वच्छता कशी करावी हे आपण पाहणार आहोत.

१. काचेची भांडी (क्रोकरी)

आपण रोजच्या वापरात काचेच्या भांड्यांचा वापर कमी करतो कधीतरीच अश्या भांड्यांचा उपयोग करतो अशी सतत वापरात नसलेली काचेची चिनी मातीची काचेची भांडी वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळू ठेवा. किंवा हल्ली बबल बॅग्स किंवा बबल पेपर सहज उपलब्ध होतो त्यात गुंढाळून ठेवा. यामुळे या भांड्यावर ओरखडे उठणार नाही आणि तडे देखील जाणार नाही. ठेऊन-ठेऊन धुळीमुळे पडणारे डाग देखील पडणार नाही. 

काही काचेच्या भांड्यावर चमकदार पारदर्शक थर असतो ज्यामुळे अशी भांडी चकाकतात, अश्या भांड्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. ही भांडी नेहमी हलकेच सावकाश पुसा खसखसून पुसल्याने हा चमकदार ठार जाण्याची शक्यता असते. तसेच अशी चमकदार थर असणार भांडी मायक्रोवेव्ह मध्ये वापरू नका.  

काचेच्या भांड्यावर कोणतेही डाग पडले असतील तर ती प्रथम कोमट पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ती स्वच्छ करा. 

२. चांदीची भांडी 

 चांदीची भांडी आणि दागिने हे वापरून-वापरून काळी  पडतात. यासाठी कोणताही फ्लेवर नसलेली टूथपेस्ट घ्या आणि आणि त्याने ही  भांडी चोळून धुवा. काळपटपणा निघणं जाईल. तसेच  सहज बुडतील असे स्टेनलेस स्टीलचे खोलगट पसरट  भांडे घ्या. त्यामध्ये  भांडी बुडेल एवढे पाणी घ्या,  त्याच्या आकाराची अ‍ॅल्युमिनियम फॉइल घ्या.  ज्या भांड्यात  भांडी स्वच्छ करायची त्याच्या तळाशी अ‍ॅल्युमिनियम फॉइल पसरा. स्वच्छ करायच्या चांदीची भांडी अ‍ॅल्युमिनियम फॉइलवर टेकली पाहिजेत. एका भांड्यात एक लिटर पाणी उकळी येईपर्यंत तापवा. त्यात दोन चमचे खाण्याचा सोडा घाला. पाणी फसफसून बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. आता सोडामिश्रित गरम पाणी चांदीच्या भांड्यावर ओता. भांडी या मिश्रणात बुडली पाहिजेत.काही मिनटात तुम्हांला भांडी स्वच्छ झाल्याचे आढळून येईल. तुम्हांला  याबाबत शंका असेल आधी हा प्रयोग छोट्या वस्तूंच्या बाबत करून पहा. 

३. स्टीलची भांडी 

हल्ली जास्त करून स्टीलच्याच भांड्यांचा वापर करण्यात येतो. स्टीलची भांड्यांची स्वच्छता करणे हे इतर धातूंच्या भांड्यांची स्वच्छता करण्यापेक्षा जास्त सोप्पे असते.  स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी डिश बार किंवा लिक्विडचा वापर करावा. कधी -कधी अति वापराने य भांड्यावर डाग पडतात,हे डाग घालवण्यासाठी कांद्याच्या रसात व्हिनेगर घाला असे मिश्रण या मिश्रणाने भांडी पुसून घेऊन लगेच धुवून घ्या. स्टीलच्या भांड्यामध्ये खूप वेळ व्हिनेगर टाकून ठेवू नये. असे केल्यास रंग कमी होतो.

४. नॉनस्टिक भांडी

नॉनस्टिकची भांडी साफ कऱण्यासाठी पातळ साबण आणि नायलॉनची घासणीच वापराली. ही भांडी धुतल्यानंतर लगेचच सुकवावी. ती अधिक वेळ ओलसर राहिल्यास त्यांवर पाण्याचे डाग पडतात. या भांड्याना जास्त डाग पडणार नाही किंवा जास्त जोर देऊन घासावी लायनर नाही याची काळजी घ्या. जास्त जोर देऊन घासल्यामुळे भांड्यांचे कोटींग जाण्याची शक्यत असते.

 

५. पितळ्याची भांडी 

पितळ्याची भांडी देखील फार कमी प्रमाणात वापरण्यात येतात पण काही ठिकाणी काही पदार्थ हे पितळ्याच्या भांड्यातच करतात. सारख्या वापराने ही  पितळ्याची भांडी काळी होण्याची शक्यता असते. अशी काळी आणि डाग पडलेली भांडी आधी गरम पाण्यात टाकावी. मग लिंबू किंवा चिंचेच्या पाण्यात थोडे व्हिनेगर घालून ही भांडी साफ करावीत मग पुन्हा गरम पाण्याने धुवावीत

६. तांब्याची भांडी

हल्ली तांब्याच्या भांड्याचा फार कमी प्रमाणात वापर होतो. हल्ली स्वयंपाकात कॉपर बॉटम भांड्याचा वापर होतो भांड्याचा वापर होतो, अश्यावेळी तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवताना गॅसची मंद ठेवावा. तसेच तांब्याचे रिकामे भांडे कधीच गरम करायला ठेवू नये. त्यामुळे भांड्यावर डाग पडतात. ही भांडी साफ करण्यासाठी त्यात चिंचेचा रस किंवा आमसूलाच वापर करावा. त्यानंतर कोरड्या मीठाने भांडी साफ करावी. 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon