Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

चेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या


आपण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी काय-काय करत नाही,हे क्रीम लाव हा लेप लाव सगळं करतो..पण आज तूम्हाला आम्ही अश्या काही युक्त्या सांगणार आहोत ज्या थोड्या विचित्र आहेत पण उपयुक्त देखील आहेत

१. दही भातावर नाही तर चेहऱ्यावर लावायचे आहे 

प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी उन्हामुळ चेहऱ्याच्या त्वचेला काहीतरी समस्या निर्माण झालेल्या असतात. आणि ज्यांची तत्वचा फारच नाजूक आहे असल्यानं तर हा त्रास  नक्कीच होतो. अश्यावेळी चेहऱ्यावर दही लावा आणि १० मिनटे तसेच ठेवा, आणि नंतर धुवून टाका. नंतर चेहऱ्याला कोरफडीचे जेल लावा त्यामुळे तुम्हांला उन्हामुळे झालेल्या त्रास कमी होतो आणि त्वचेचा पॉट सुधारतो.  

२. अंतर्बाह्य स्वच्छतेसाठी ग्रीन टी 

सगळ्यांना माहिती आहे ग्रीन टी शरिरातील विषारी घटक घालवण्यास जशी मदत करतो  पण हाच ग्रीन टी  तुम्हांला सुंदर देखील बनवू शकतो हे तुम्हांला माहिती आहे का?जर तुमची त्वचा फुटली असेल आणि त्यामुळे लाल झाली असेल तर ग्रीन टी ची टी बॅग गरम कोमट पाण्यात बुडवून हलकेच फुटलेल्या भागाला लावा. त्यामुळे त्वचा फुटल्यामुळे त्वचेला आलेला लालसरपणा कमी होईल आणि त्वचा मधील फोड हे तुम्हाला वरती आणण्यास मदत होईल ज्यावर तुम्ही उपाय करू शकता.  

३.ब्लकहेड्स आणि व्हाईटहेडसाठी लिंबू आणि टोमॅटो 

ज्यावेळी तुम्ही स्वतःचा चेहरा फार जवळून आरशात बघता त्यावेळी तुम्हांला तुमचे ब्लॅकहेडस आणि व्हाइटहेड्स तुम्हांला दिसतात विशेषतः नाकाजवळ हे ब्लॅकहेड्स जास्त प्रमाणत आदळून येतात. बहुतेक स्त्रिया हे ब्लॅकहेडस नाकावर दाब देऊन किंवा बाजारात मिळणाऱ्या स्ट्रिप्सने काढतात. परंतु अश्या पद्धतीने ब्लॅकहेडस काढल्याने नाकाजवळील भाग हा ओढल्यामुळे आणि दाब दिल्यामुळे लाल किंवा विचित्र दिसतो. असा दिसू नये म्हणून एक वेदनारहित असा एक उपाय सांगणार आहोत. लिंबू कापून त्यावर थोडी पिठीसाखर किंवा साखर टाकाआणि ते लिबू हळुवारपाणे ब्लॅकहेड असणाऱ्या भागावर फिरवा. असे दोन दिवस आड करा. तसेच टोमॅटोचा रस देखील अश्याप्रकारे ब्लॅकहेड असलेल्या भागावर लावल्यास देखील ब्लॅकहेड्सच्या समस्यांवर फायदा होतो. 

४.लहान मुलांची क्रीम्स 

जर तुम्ही लहान बाळाच्या आई आहेत आणि जर तुमच्याकडे बाळाच्या डायपर रॅशेसवरच क्रीम असेल तर ते तुम्ही लावू शकता बाळाच्या त्वचेसाठी असलेली क्रीम तुम्ही चेहऱ्याला मऊ करण्यासाठी वापरू शकतात ( हि क्रीम्स साधारणतः मॉश्चराझर किंवा साधी क्रीम्स असावी कोणतीही क्रीम्स लावू नये)

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon