Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

(व्हिडीओ) राजगिरा - पराठा असाच बनवा.


राजगिऱ्याची बरीच पदार्थ तुम्हाला माहिती असतील पण राजगिऱ्याच्या पराठा बनवून बघा. किती याम्म्मी आणि चटकदार लागतो तर.

त्यासाठी कोणते साहित्य घ्यावे

दोन वाटय़ा राजगिऱयाचे पीठ, तूप, आणि चवीसाठी मीठ.

पराठा कसा बनवायचा कृती, व्हिडीओ

 

भाजीचे साहित्य काय घ्यावे

पाव किलो बटाटे, चार मिरच्या एक, इंच आलं, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, थोडं आलं, खोबरं, रिफाइंड तेल, मीठ, साखर, लिंबू.

करायची कृती

बटाटे उकडून सोलून कुस्करावे. मसाला वाटावा, बटाटय़ात वाटलेला मसाला, ओलं खोबरं, चवीसाठी साखर, मीठ व लिंबाचा रस घालून कालवावं. रिफाइंड तेलाची हिंग, जिरं घालून फोडणी करावी. त्यात तयार भाजी घालून चांगलं मिसळून घ्यावी. भाजी करण्यापूर्वीच दोन वाटय़ा राजगिऱयाच्या पिठात गरम तूप व चवीपुरतं मीठ घालून गरम पाण्यानं पीठ भिजवावं व नीट मळून त्याच्या दोन पुऱया लाटाव्यात. एका पुरीवर भाजी कडेपर्यंत पसरावी. त्यावर दुसरी पुरी ठेवून त्याच्या सर्व कडा दाबून पुन्हा पराठा अलगद लाटावा. दोन तवे तापवावेत. एका तव्यावर पराठा भाजावा, दुसऱ्या तव्यावर तूप टाकून खमंग करावा.

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon