Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

तुम्हांला वेगन (व्हिगन )डाएट म्हणजे काय माहिती आहे का?

व्हिगन डाएट म्हणजे सगळ्या प्रकारचा मांसाहार टाळणे तसेच कोणत्याही प्रकारचे प्राणीजन्य पदार्थ खाणे टाळणे. यामध्ये सगळ्या प्रकारचा मांसाहार आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळण्यात येतात. आणि त्याला पर्यायी पदार्थांचा वापर करण्यात येतो.

कोणते पदार्थ खाण्यास परवानगी असते.

सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, सर्वप्रकारचे धान्य कोणत्याही स्वरूपात तुम्ही पाहू शकतात. तुमच्या आहारातील कोणत्याही पदार्थात प्राणीजन्य पदार्थचा वापर नसावा. अगदी दूध, दही, ताक, लोणी आधी, अंडे याचा समावेश नसावा.

 

दुध आणि दुग्धजन्य पदार्थांना पर्याय

गाईच्या, म्हशीच्या किंवा इतर कोणत्याही प्राणीजन्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना पर्याय म्हणून नाळाचं दूध, बदामापासून तयार केलेलं दूध, सोयाबीनचे दूध याचा वापर करता येईल. सोयाबीनचे दूध स्त्रियांच्या आरोग्यास उपयुक्त मानण्यात येते.  परंतु असे असले तरी थायरॉइड आणि गर्भाशय आणि अंडाशयाचा त्रास असलेल्या स्त्रियांनी याचं सेवन कटाक्षाने टाळावे. तसेच पुरूषांनी याचा वापर अत्यल्प प्रमाणात करावा.

घ्यावयाची काळजी

व्हिगन डाएट करताना शरीराला पोषक आणि परिपूर्ण आहार मिळतो ना याची काळजी घेणं अत्यंत अवश्यक असते. बहुतांश व्हिगन डाएट करणाऱ्यांमध्ये बऱ्याचदा ब 12 आणि ड जीवनसत्वाची कमतरता आढळते. या जीवनसत्वाची कमतरता असणाऱ्या व्यक्तीमध्ये स्नायू दुखणे, हाडे दुखणे, अशक्त वाटणे, जाड कामे न होणे सतत झोप येणे अश्या समस्या जाणवू शकतात.

 

या डाएट मध्ये पण प्रथिन्यांची कमतरता जाणवू शकते. म्हणून आहारात डाळ, उसळी यांचं प्रमाण योग्य राखणे गरजेचे असते. प्रथिने हा शरीरासाठी महत्त्वाचा अन्नघटक आहे.

हा डाएट का कश्यासाठी करतात ?

याबाबतीत अनेक जणांची अनेक मते आहेत. परंतु सर्वसाधारणरित्या हा डाएट निवडण्यामागे सर्वात सामान्य कारणांपैकी एक कारण वजन कमी करणे आणि दुसरे आरोग्यविषयक समस्या आहेत. तसेच बऱ्याच लोकांना पशु अधिकार आणि पर्यावरण जतन करण्याच्या हेतूने देखील या प्रकारचा डाएट करतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon