Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

जाणून घ्या वयाचा गरोदर होण्याशी असणारा संबंध


       वयानुसार स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात आणि दर दहा वर्षानंतर हि प्रक्रिया अधिक मोठ्या बदलांसोबत घडून येत असते. मुलाच्या जन्मासाठी कोणते वय योग्य आहे यावर कोणतेही ठोस एकमत आढळत नाही. वयाच्या २०, ३० आणि ४० या वर्षांत मूल होऊ देण्याचे काही फायदे आणि तोटे आज आपण पाहूया :

जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा मुलांच्या मागे धावपळ करण्यासाठी खूप ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात असतो पण पुरेसे पैसे नसतात. वय वाढत जाते तसतसे आयुष्याचा अनुभव आणि पैसे ही येतात पण वाढत्या वयात मुलाला जन्म देण्याची शरीराची क्षमता खूपच कमी होते आणि मुलाची योग्य वाढ आणि विकास करण्यात तुम्ही काहीसे मागे पडता.
२० ते २४ वर्ष  

तुमची शरीरक्षमता :

२० ते २४ वर्ष स्त्रीच्या आयुष्यातील ही सर्वात जास्त प्रजननक्षम वर्षे असतात. तुमची मासिक पाळी नियमित असते आणि प्रजनन क्षमता खूप जास्त असते, यामुळे या वयात स्त्रीला अगदी सहज गर्भधारणा होऊ शकते. 

तुमची भावनिक अवस्था :

या वयात स्त्रिया स्वतःच्या करियर मध्ये प्रगती करण्याबाबत अधिक जागरूक असतात.भविष्यावर जास्तीजास्त लक्ष केंद्रित करता यावे यासाठी अनेक महत्वकांक्षी महिला या वयात लग्न करणे टाळतात. अनेकदा, स्त्रिया या वयात लग्न करण्याची ईच्छा नसतांनाही केवळ सामाजिक दबावापोटी लग्न करतात आणि कमी वयात आई झाल्याचं तर याचा आनंद ही उपभोगू शकत नाहीत.

धोके :

२० ते २४ या वयात स्त्रियांमध्ये गर्भपाताचा धोका ९. ५% इतका असतो कारण तुमचे बीज कोवळे असते ज्यात कोणतेही व्यंग नसलेले आणि सुदृढ बाळ जन्माला येण्याची जास्त शक्यता असते.

२५ ते २९ वर्ष :

तुमची शरीरक्षमता :

गर्भावस्थेदरम्यान तुम्ही नियमिपणे व्यायाम आणि पोषक आहार घेत असाल तर या काळात तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही, तसेच प्रसूतीनंतर तुमच्या शरीराला लवकरच पूर्वीचा आकारात आणि बांधा प्राप्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे, वयाच्या विशीत मुलाला जन्म दिल्याने स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.

 

तुमची भावनिक अवस्था :

वयाच्या विशीनंतर जेव्हा तुमच्याकडे मिळकतीचा निश्चित स्रोत असतो आणि तुम्ही तुच्या कार्यक्षेत्रात एका यशस्वी टप्प्यावर पोहचता तेव्हा तुम्ही जास्त अनुभवी आणि परिपक्व झालेल्या असता आणि आयुष्याच्या या टप्प्यावर एका बाळाचे पालन पोषण करण्यासाठी तुम्ही अधिक तत्पर असता.

 

३० ते ३४ वर्ष :

तुमची शरीरक्षमता

वयाच्या तिशीनंतर प्रजनन आणि पुनरुत्पादन क्षमता कमी व्हायला सुरुवात होते आणि यासाठी काही उपचार घेत असाल तर हे उपचार यशस्वी होण्याची शक्यता पस्तिशी ओलांडलेल्या महिलांपेक्षा जास्त ३० ते ३४ वर्षांच्या महिलांमध्ये असते. वाढत्या वयासोबत, उपचारानंतर ही मूल होण्याची शक्यता कमी होत जाते.

तुमची भावनिक परिपक्वता :

ज्या स्त्रियांनी वयाच्या विशीत स्वतःच्या कार्यक्षेत्रात भरपूर काम केलेले असते त्या एका मुलाची जबादारी घ्यायला पूर्णपणे तयार असतात. व्यावहारिक जगाची त्यांना अधिक चांगली समज आलेली असते आणि कोणताही प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि संयम त्यांच्यात असतो. अशा महिला अधिक स्वावलंबी आणि समजूतदार माता असतात. पण त्यांना स्वतः काम करणे जास्त आवडत असेल तर बाळ झाल्यानंतर त्या लवकरच कामावर रुजू होतात.

 

स्वतः काम करणे जास्त आवडत असेल तर बाळ झाल्यानंतर त्या लवकरच कामावर रुजू होतात.

 

३५ ते ३९ वर्ष :

पस्तिशी पार केल्यानंतर स्त्रियांची प्रजनन क्षमता वेगाने कमी होऊ लागते आणि मूल होण्याची शक्यता ओसरते. यामागचे साधे कारण म्हणजे,सरणाऱ्या प्रत्येक वर्षासोबत स्त्रीबीजांची संख्या कमी होत जाते. वयाच्या ३८-३९ वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात स्त्रीबीज नाश पावतात आणि शिल्लक असलेले कमकुवत आणि जुने स्त्रीबीज फलन पावणे कठीण असते.

३५ आणि त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांना किमान एक वर्ष कोणते ही गर्भनिरोधक साधन न वापरता पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि या नंतर वंध्यत्वनिवारणा साठी उपचार सुरु केले जातात. तर याउलट, ३५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना गर्भनिरोधकांविना केवळ ६ महिन्यांच्या शरीरसंबंधानंतर उपचार सुरु करण्याचा सल्ला दिला जातो.

उच्च रक्तदाब, सिझेरिअन प्रसूती तसेच होणाऱ्या जन्मतः व्यंग असण्याची शक्यता खूप जास्त असते तर या वयातील महिलांना गरोदर असतांना मधुमेह होण्याचा धोका तिपटीने वाढतो. वयस्क मातांच्या मुलांमध्ये गुणसूत्रीय दोष किंवा आजार असू शकतात आणि जुळी अथवा तिळे होण्याची शक्यता असते.

वाढत्या वयासोबत, स्त्रियांच्या अंडाशयामधून स्त्रीबीजनलिकेत एकाचवेळी दोन स्त्रीबीज सोडली जातात आणि पुरुषाकडून सोडले शुक्राणू दोन किंवा तीन बीजांचे फलन एकत्र करतात

 

४० आणि त्यापेक्षा जास्त

सामाजिक, मानसिक आणि भावनिक बदल

औषध उपचारांच्या मदतीने महिला उतार वयातही आई होण्याचा आनंद घेऊ शकतात ही दिलासा देणारी गोष्ट आहे. स्त्री स्वतःचे आरोग्य उत्तम राखून एका सुदृढ बाळाला जन्म देऊ शकते कारण आईचे आरोग्य चांगले असेल तरच बाळाची प्रकृती उत्तम असते. या वयात स्त्री दुसऱ्यांदा आई होत असेल तर तिच्या आरोग्यावर मोठा ताण येत असतो आणि दुसऱ्या गर्भावस्थेदरम्यान तिला पोटाच्या आणि गर्भाशयाशी संबंधित तक्रारी, मूळव्याध आणिपोट आणि गर्भाशयाशी संबंधित तक्रारी आणि मूत्राशयावर ताण येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon