Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

वारंवार होणाऱ्या गर्भपाताचे दुष्परिणाम

बाळ होणे हे बहुतांश स्त्रियांचे स्वप्न असते पण काही वेळा मात्र गर्भधारणा हे दुःस्वप्नासारखे वाटते. काही वेळा मात्र सर्वच गोष्टी जुळून येत नाहीत आणि त्यामुळे गर्भपात होतो. त्यासाठी विविध कारणे असतात. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर गर्भपात म्हणजे बळाच्या वापराने काढून टाकलेला गर्भ असतो. अर्थात प्रत्येक वेळी मानवी हस्तक्षेप असतोच असे नाही तर काही वेळा त्यासाठी काही वैद्यकीय कारणेही असतात. सलग तीन वेळा गर्भपात झाल्यास वैद्यकीय भाषेत त्याला वारंवार गर्भपात होणे असे म्हटले जाते. एखाद्या स्त्रीला या प्रसंगाला सामोरे जावे लागले तर ही qचतेची बाब असू शकते.

गर्भपातामुळे गुंतागुंत आणि दुष्परिणामही होतात. स्त्रीने स्वतःहून जरी मनाची तयारी केली तरीही तिला याच्या परिणामांची जाणीव करुन द्यायला हवी. गर्भपाताचा निर्णय घेणे स्त्रीसाठी अवघड असते त्यातूनही तिला गर्भपातानंतर काही परिणामांना सामोरे जावे लागणाच असते.

परदेशाच्या तुलनेत भारतामध्ये गर्भपाताचे प्रमाण निश्चितच जास्त आहे. त्यातही सामाजिक स्तरांप्रमाणे ते वाढत जाते. भारतात शंभर गर्भवती स्त्रियांमागे १० -१५ टक्के स्त्रियांचे गर्भपात होतात. त्यातही मुलीचा गर्भ पाडण्याची संख्या खूपच जास्त आहे.

वारंवार गर्भपाताची कारणे

पीसीओडी किंवा हार्मोनल समस्या आणि रक्ताचे विकार

गर्भवती स्त्रिला पीसीओडी, थायरॉईड अशा समस्या असल्यास वारंवार गर्भपात होऊ शकतात. तसेच काही रक्ताच्या विकारांमध्येही रक्ताची गुठळी झाल्याने गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

शारिरीक समस्या-

गर्भाशयाचे आरोग्य चांगले नसेल तर गर्भाशयाचे मुख शिथिल होते आणि गर्भपात होऊ शकतो. काही वेळा गर्भाशयात फायब्रॉईडस असल्यानेही गर्भपात होऊ शकतो. तसेच मधुमेह, रक्तदाब किंवा मूत्रपिंडाचा विकार असल्यास गर्भाशयावर ताण आल्याने गर्भपात होतो.

त्या व्यतिरिक्त गर्भवतीचे कुपोषण, अपुरे पोषण, अति शा़िररीक कष्ट, मानसिक ताण, धूम्रपान, अति मद्यपान, इत्यादी व्यसनांमुळेही गर्भपात होऊ शकतात. स्त्रीच्या शरीराची ताकद भरून न आल्याने गर्भपाताची शक्यता अधिक असते.

सर्व स्त्रियांबाबतीत हे परिणाम होतील असे नाही परंतू काही दुष्परिणाम निश्चितच होतात.

गर्भपाताचे दुष्परिणाम

१. सतत रक्तस्राव

गर्भपातानंतर प्रामुख्याने आढळणारा हा दुष्परिणाम आहे. गर्भाशयाची जोडलेली नाळ काढून टाकावी लागते तेव्हा या रक्तस्राव अधिक होतो. त्यानंतर गर्भाशय नीट होण्यासाठी काही कालावधी लागतो त्यामुळे गर्भपातानंतर काही दिवस सतत जास्त किंवा नेहमीसारखा रक्तस्राव होतो. मात्र गर्भपातानंतर आलेली ही मासिक पाळी नाही. काही दिवस रक्तस्राव होऊन हळुहळु कमी होतो. मात्र अनेक दिवस रक्तस्राव न थांबल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

२. बेडरेस्ट

गर्भपातानंतर लगेचच दैनंदिन कामाला सुरुवात करता येत नाही. गर्भपाताचा शारिरीक आणि मानसिकही आघात झालेला असतो त्यातून बरे होण्यासाठी स्त्री ला काही कालावधी लागतो. कामाला सुट्टी देऊन आराम करावा लागतो. सर्व परिस्थिती उत्तम असेल तर काही दिवसांची बेडरेस्ट उपयुक्त असते.

३. कर्करोगाची शक्यता

वारंवार गर्भपात झाल्यास त्या स्त्रीला कर्करोग होण्याचा धोका वाढतो. स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता २.३ पटीने वाढते. यकृत, ओव्हेरियन कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

४. गर्भाशयाचे नुकसान

वैद्यकीय कारणाने गर्भपात करुन घ्यावा लागला तर शस्त्रकर्म करताना गर्भाशयाच्या रक्तवाहिन्यांना इजा होऊन त्यातून रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रक्त गेल्याने अशक्तपणा येऊ शकतो तसेच इतर शरीरक्रिया जसे पचनसंस्था यांच्यावपरही परिणाम होऊ शकतो. अतिरक्तस्राव झाल्यास जिवितास धोकाही निर्माण होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त महत्त्वाचा परिणाम म्हणजे गर्भाशयाच्या नसांना झालेल्या इजेमुळे पुन्हा गर्भ राहण्यावर परिणाम होतो.

५. गर्भाशयमुखाची समस्या

सततच्या गर्भपातामुळे गर्भाशमुख ताणले जाते. सर्वसाधारणपणे गर्भाशय मुख घट्ट आणि बंद असते. वैद्यकीय गर्भपात करताना गर्भाशय मुख ताणावे लागते. तेव्हा त्याला अगदी सूक्ष्म चिराही पडतात किंवा ते फाटते. त्यावर योग्य उपचार झाले पाहिजेत. मात्र गर्भपातामुळे मुखाला झालेल्या दुखापतीमुळे भविष्यात गर्भधारणा आणि प्रसुती कळा येण्यास त्रास होतो.

६. नाळ गर्भाशयाच्या मुखाशी येणे

या अवस्थेत नाळ गर्भाशयाच्या मुखाशी येते. असा परिस्थितीत बेड रेस्ट घ्यावी लागते.

७. भविष्यात मुदतपुर्व प्रसुती

वारंवार गर्भपात झाल्याने गर्भाशय आणि गर्भाशय मुख दोन्हींना इजा झालेली असल्याने मुदतपुर्व प्रसुति होण्याची शक्यता असते. गर्भधारणेवर सततच्या गर्भपातांचा परिणाम झाला नाही तरीही शरीराच्या गर्भधारण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करु शकता.

८. पोस्ट ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसॉर्डर

गर्भपात होणे हा स्त्रीला धक्काच असतो. त्यामुळे त्या तणावात जाऊ शकतात. त्याला पोस्ट ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हटले जाते. याची लक्षणे गर्भपातानंतर तीन महिन्यांनी दिसू शकतात. झोप न लागणे,चिंताग्रस्त असणे, मनाचा कल बदलत राहणे. ह्या सर्व मानसिक त्रासांवर वेळीच उपचार आवश्यक आहेत. तसेच या स्त्रियांच्या मनात सतत भीती असते. गर्भपातानंतर महिलांना कुठेही सुरक्षित वाटत नाही.

९. अपराधभाव आणि पश्चाताप

काही स्त्रियांना त्यांनी स्वतःच एक जीव घेतला असल्याच्या भावना निर्माण होत रहातात. त्यामुळे त्यांना अपराधीभाव जाणवत राहतो. मात्र वैद्यकीय दृष्ट्या पहिल्या तीन महिन्यांपर्यंत गर्भात जीव नसतो असे म्हटले जाते. पण हा अपराधगंड मनात राहातो तर काही महिलांना नको असलेल्या गर्भापासून सुटका मिळते पण काही वर्षांनी त्याबाबत पश्चातापाची भावना निर्माण होते.

१०. एकटेपणा

काही महिला वारंवार गर्भपात झाल्याने निराश होतात आणि एकट्या राहू लागतात. त्यांना लोकांमध्ये मिसळावे असे वाटत नाही. पण अशा वेळी स्त्रीला आधार देऊन तिला पुन्हा प्रवाहात आणले पाहिजे अन्यथा एकटेपणाचा मानसिक परिणाम होऊ शकतो. त्यासाठी कुटुंबिय, मित्रपरिवार नक्कीच मदत करु शकतो.

११. नैराश्य

वारंवार गर्भपात झाल्याने नैराश्याने ग्रस्त होण्याची शक्यता अधिक असते कारण हा आ़युष्य बदलून टाकणारा प्रसंग असतो. त्यामुळे नैराश्य येते आणि त्यातून स्त्रीमध्ये बदलही होतो. त्यांना आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात रस वाटत नाही. त्यामुळे अर्थातच वैयक्तिक आयुष्यावर आणि कुटुंबावरही त्याचा परिणाम होतो.

१२. गुणसुत्रांमधी विकृती-

गर्भ तयार होताना आई वडिल दोघांची गुणसुत्रे एकत्र येतात. काही वेळा अनुवांशिक समस्या असल्यास त्याला गुणसुत्रांमधील विकृती असे म्हणतात. अनुवांशिक समस्येमुळे गर्भपात होण्याची शक्यता ३-४ टक्के असते. पालकांपैकी एकाच्या गुणसुत्रांमध्ये विकृती असेल तर गर्भपात होऊ शकतो. काही वेळा पालकांची गुणसुत्रे सर्वसाधारण असली तरीही गर्भात काही विकृती निर्माण झाल्यास गर्भपात होऊ शकतो.

१३. कमजोर रोगप्रतिकारक क्षमता  -

वारंवार होणाऱ्या गर्भपातासाठी हे महत्त्वाचे कारण आहे. गर्भार स्त्रीच्या रक्तातील अँटीबॉडीज मुळे रक्त चिकट आणि घट्ट होते. त्यामुळे रक्तात गुठळ्या निर्माण होऊ शकतात. यामुळे काही वेळा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि गर्भाशयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे गर्भपात होतो. अर्थात मातेला काही आरोग्यविषयक समस्या भेडसावत नाही. काही चाचण्या करुन याचे निदान करता येते.

या सर्व परिणामांची तीव्रता वाढू नये म्हणून गर्भपातानंतरच्या शारिरिक किंवा मानसिक बदलांना योग्य पद्धतीने हाताळले पाहिजे. त्यावर वेळीच उपचार केले पाहिजेत. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon