Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

वारंवार गर्भपात का होतो ?

गर्भपात होणे ही स्त्रीच्या आणि त्या जोडप्याच्या  आयुष्यातील एक खूप त्रासदायक घटना असते. आणि हीवारंवार घडणे म्हणजे त्या त्रासच सतत अनुभव घेणे. यात शाररिक आणि मानसिक त्रासातुन जोडप्याला जावे लागते. जर अशी गर्भपाताची घटना वारंवार होत असेल तर का होते. या मागची कारणे  जाणून घेऊया.

तीन किंवा अधिक गर्भपात एका पाठोपाठ झाले तर या प्रकाराला वारंवार गर्भपात होणं असं म्हणतात. वारंवार होणाऱ्या गर्भपात पैकी बहुतांश गर्भपात हे पहिल्या त्रैमासिकात होतात. या वारंवार होणाऱ्या गर्भपारपैकी बहुतांश गर्भपात गर्भातील गुणसूत्रांच्या बिघाडामुळे होतात. यातील बहुतांश गर्भांचा पहिल्या महिन्यातच गर्भपात होतो. हे त्या स्त्रीला कळतही कारण ही प्रक्रिया मासिकपाळी सारखेच असते. मासिकस्त्रावासारखेच भासते. नियमित मासिकपाळी येणाऱ्या स्त्रीला चौदाव्या दिवशी गर्भनिमिर्ती होते आणि त्यानंतर सहाव्या किंवा सातव्या दिवशी गर्भाशयात गर्धधारणा होते.

१.गुणसूत्रांमधील विकृती

दोन्ही पालकांचे जीन्स अथवा गुणसूत्र त्या गर्भामध्ये असतात.पण काही केसेसमध्ये आनुवंशिक समस्या असू शकतात ज्यांना असे गुणसूत्रांमधील विकृती असे म्हणतात. यामुळे वारंवार गर्भपात होण्यामागे समस्या असण्याची शक्यता ३ ते ४ टक्के असू शकते. यामुळे वारंवार होणाऱ्या गर्भपाताला अपंग किंवा जन्मतः दोष असलेले मुल जन्मला येऊ नये म्हणून निसर्गानी केलेली व्यवस्था म्हणू शकतो.

२. पस्तिशीनंतरची गर्भधारणा

वयाच्या पस्तिशीनंतर स्त्रीची प्रजननशक्ती कमी होऊ लागते. आणि यानंतर बीजीडांची निरोगी स्त्रीबीज बनवण्याची शक्ती क्षीण होत जाते. पस्तिशीनंतर अशा कमी प्रतीच्या स्त्रीबीजापासून निर्माण झालेल्या गर्भारपणात गर्भपाताचे प्रमाण वाढते.

३. काही आजारांमुळे

मधुमेहमी थाईरॉईड, पीसीओएस आणि सिस्टमिक लुपस इरिथमॅटोसीस आणि अॅण्टीफॉस्फोलिपीड अॅण्डीबॉटी सिंड्रोम यासारख्या आजारांमध्ये बिघडलेली प्रतिकारशक्तीच शरीरातील अवयवांना क्षीण करते आणि अशा आजारांमध्ये गरोदरपणांमध्ये गर्भाशयातील वारेमध्ये (प्लॅसेन्टा) गुठळ्या होऊन वारंवार गर्भपात होऊ शकतो. तसेच उचरक्तदाब देखील गर्भपात मागचे कारण असू शकते.

४. जन्मताच अपुऱ्या गर्भाशयाची वाढ

काही स्त्रियांमध्ये जन्मत: गर्भाशयाची अपुरी वाढ झाल्यामुळे वारंवार गर्भपात होऊ शकतात. गर्भाशयात होणाऱ्या फायब्रॉइड नावाच्या गाठी काही वेळा वारंवार गर्भपात घडवू शकतात.गरोदरपणाच्या सोळा ते अठरा आठवड्यानंतर गर्भपात होऊ शकतो.

५. योनी संसर्ग

सारखे संसर्गजन्य आजार एखाद्या गर्भपाताचे कारण असू शकतात. परंतु शरीराने बनवलेल्या प्रतिजैवकांमुळे वारंवार गर्भपाताचे कारण हे आजार असू शकत नाहीत.काही ठिकाणी झालेल्या संशोधनात सध्या योनिमार्गातील जंतुसंसर्ग हे देखील वारंवार होणाऱ्या गर्भपाताचे कारण दिसून आले आहे

६.गर्भारपणात रोगांची झालेली लागण

मलेरिया, टायफॉइड, क्षयरोग (टीबी) यासारख्या आजारांनी जर गदोरपणामध्ये गंभीर स्वरूप धारण केले तर ते गर्भपाताचे कारण होऊ शकते.

७. पोषक द्रव्यांची कमतरता

कॅल्शियम, लोह, फॉलिक अॅसिड, व जीवनसत्व, क जीवनसत्व यासारख्या सुक्ष्म पोषण दव्यांची गरोदरपणात कमतरतानिर्माण झाल्यास गर्भपात होऊ शकतो.

८. रोगप्रतिकार संबधित समस्या-

रोगप्रतिकार संबधित हा देखील वारंवार गर्भपात होण्यामागचे एक महत्वाचे कारण आहे.या स्थितीत आईच्या रक्तातील अॅन्टीबॉडीज मुळे तिचे रक्त चिकट व घट्ट होते.ज्याच्यामुळे रक्तामध्ये क्लॉट अथवा गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.खरंतर गर्भाशयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत झाल्यास गर्भ गर्भाशयामध्ये पोहचतो.पण या आरोग्य समस्येमुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.त्यामुळे गर्भाशयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.ज्याचा परिणामामुळे गर्भाशयातील गर्भ मृत पावतो.

१५ ते २० टक्के जोडप्यांच्या बाबतीत हा प्रकार घडण्याची शक्यता असते. वारंवार होणारे गर्भपात ही समस्या जरी गंभीर असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. अश्यावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि उपचार आणि धीर यांच्या आधारे गोष्टींमुळे या समस्येशी तोंड देणे शक्य आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon