Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

या दोन प्रकारे करा वांग्याची चटणी

आपल्याला वांग्याची भाजी, वांग्याची रस्सा भाजी, वांग्याची भजी, वांग्याचे भरीत वांग्याचे काप असे वांग्याचे साधारण पदार्थ पहिले आहेत. पण आज आम्ही तुम्हाल वांग्यांची चटणी कशी करायची याच्या दोन कृती सांगणार आहोत. 

कच्च्या वांग्याची चटणी

साहित्य

१. एक मध्यम वांगे

२. लिंबू, किंवा आमसूल आणि कैरीचे दिवस असतील तर कैरी 

३. एक मोठा कांदा, 

४. एक चमचा लाल तिखट, किंवा जर सुक्या लाल मिरच्या  असतील तर त्या 

५. चवीनुसार मीठ

५. एक छोटा चमचा हळद,  थोडेसे हिंग,  एक माध्यम आकाराचा गुळाचा खडा किंवा साखर गूळ  असल्यास उत्तम ,

६. भाजलेले आणि  किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी

७. दाण्याचं कूट 

कृती 

एका पसरट भांड्यात कांदा,व वांगे कच्चे किसून घ्यावे. त्यात एक चमचा लाल मिरचीचे तिखट, चवीनुसार मीठ, गूळ किसलेले सुके खोबरे तसेच आमसूल बारीक करून त्यात घाला किंवा लिंबाचा रस आणि कैरीच्या दिवसात किंवा कैरी उपलब्ध असल्या कैरी किसून घाला.त्यानंतर दाण्याचा कूट घाला. हे सगळं नीट मिक्स करून घ्या. हे सगळे मिश्रण मिक्सर मधून काढले तरी चालेल. त्यानंतर जर मिश्रण मिक्सरमधून काढले असेल तर  छोट्या लोखंडाच्या कढईत फोडणी करून ती या मिश्रणावर घाला. अन्यथा जर मिश्रण मिक्सर मधून न काढता किसलेले असेल तर मिश्रण योग्यप्रकारे कालवून कढईत फोडणी करून  ते मिश्रण त्या फोडणीत घालून अगदी थोडे परतून घ्या. त्याच्या कच्चेपणा जाणार नाही याची काळजी घ्या. परतून झाल्यावर आवडत असेल तर या चटणीवर दही घालून खा. 

भाजलेल्या वांग्याची झटपट चटणी 

साहित्य

१. १ मध्यम आकाराचे वांगे,

२.  ५-६ लाल सुक्या मिरच्या

३. २ चमचे तीळ, किंवा दाण्याचे कूट 

४. लिंबू, मीठ, साखर चवीप्रमाणे.

कृती 

थोड्याश्या तेलावर वांग्याच्या फोडी व मिरच्या परतवून घ्याव्यात.

नंतर मिक्सरला मध्ये बारीक करावे.

शेवटी चवीप्रमाणे लिंबू पिळावे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon