Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

वंध्यत्व /इन्फर्टिलिटी म्हणजे काय ?


स्वतःच मुल असणे हि एक सुंदर कल्पना आहे आपल्यासारखा आणि आपल्या आवडत्या व्यक्ती सारखं दिसणारं एकी कोणतरी आपल्या आयुष्यात असणे हि खूप सुंदर कल्पना आहे. परंतु काही कारणास्तव अनेक जोडप्यांसाठी ही एक कल्पनाच असते. स्वतःच मुल असणे स्वत:चं मूल असणं ही कित्येकांची मानसिक आणि सामाजिक गरज असते. ज्यांना कोणतेही वैद्यकीय उपचार न करता मुलं होतात त्यांना निसर्गाने आपल्याला दिलेली ही केवढी मोठी देणगी आहे याचा अंदाज येत नसेल कदाचित.बऱ्याच दिवसांच्या सहजीवन नंतर वर्षभर गर्भनिरोध साधनाचा वापर न करता नियमित शरीरसंबंधानंतर जर स्त्रीला गरोदर राहणे जमले नसेल तर त्यास वंध्यत्व म्हणता.

 

स्त्रीमधील वंध्यत्वाची करणे

 

गर्भधारणा होण्यासाठी शुक्राणूंचे स्त्रीबीजाशी मिलन होणे गरजेचे असते. शुक्राणूं स्त्रीबीजापर्यंत पोहचून गर्भधारणा वयास शुक्राणूला स्त्रीबीजाशी करण्याकरता योनी पासून स्त्रीबीजा पर्यंत जाताना बराच वेळ लागतो आणि स्त्रीबीजापर्यंत जाताना जर काही अडथळे आले तर गर्भधारणा होत नाही. वंध्यत्वाची करणे पुढील प्रमाणे

 

१) काही स्त्रियांमध्ये जन्मजात प्रजन अवयवांमध्ये काही त्रुटी अथवा समस्या असतात त्यामुळे गर्भधारणा होत नाही

२) अनियमित मासिकपाळी पीसीओसी मुळे स्र्त्रीबीज तयार करण्यास अक्षम असणे.

३) हायपोथायरॉडिझम.

४) संप्रेरकांचे असंतुलन.

५) गर्भनिरोधक औषधांचा सततचा वापर.

६) गर्भधारणेचे वाढते वय ३५ च्या पुढे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणे.

७) स्थूलता

८) गर्भाशयासंबधी आजार

९) मधुमेह

पुरुषांमधील वंध्यत्वाची करणे

 

१) जन्मजात प्रजनन अवयवांसंबंधी असणारी तक्रार

२)स्थूलता

३) वृषणावर आघात होणे, किंवा काही कारणास्तव वृषणास रक्त पुरवठा करणारी वाहिनी दबली जाणे

४) वीर्य तयार होण्यास अडथळा असणे

 

५)संप्रेक्रकांचे असंतुलन

६) पौरुषग्रंथीमधील समस्या

७) अति व्यायाम करणे, घट्ट पॅन्ट घालणे

८) अति उष्ण ठिकाणी काम करणे, अति ग्राम पाण्याने अंघोळ करणे यामुळे ( शुक्राणू अकार्यक्षम होतात)

९) सकस आहाराचा अभाव अति व्यसन

इत्यादी पुरुष वंध्यत्वाची करणे आहे

 

स्त्री वंधत्वचे निदान कोणत्या तपासण्यांद्वारे करण्यात येते

१)क्युरेटिंग

२) लॅप्रोस्कोपी

३)हवा भरणे गर्भाशयात हवा भरून ही तपासणी करण्यात येते

४) गसंप्रेरकांच्या पातळीची तपासणी

५) गर्भाशयाचा फोटो

पुरुष वंधत्वाचे निदान  कोणत्या तपासण्यांद्वारे करण्यात येते

१)वीर्य तपासणी

२) संप्रेरकाची पातळी तपासणी रक्त तपासणी द्वारे

३)व्हासोग्राफी

४) टेस्टिक्युलर बायोप्सी

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon